Friday, 30 December 2011

‘थर्टी फस्ट’चा बेभान जल्लोष करण्यापूर्वी. हे पत्र वाचा.!

‘थर्टी फस्ट’चा बेभान जल्लोष करण्यापूर्वी. हे पत्र वाचा.! आणि मग हिंमत असेल, तर चालवा दारू पिऊन गाडी.!

आई,
तू म्हणाली होतीस,
पार्टीला जायचंय, तर जा..
पण ‘पिऊ’ नकोस.. !

आई,
खरं सांगतो. मी नाही प्यायलो.
मी फक्त सॉफ्टड्रिंक प्यायलो.
सोडा असलेलं..!

आई,
खूप आग्रह केला मित्रांनी.
म्हणाले पी रे. पी रे.
पण नाही प्यायलो मी.
सगळ्यांनी चिडवलं मला,
भरीस पाडलं.
पण मी नाहीच ग्लासला हात लावला.
तुला दिलेलं प्रॉमिस पाळलं. न पिण्याचं.!

आई,
कोणी काहीही म्हणो.
न पिता एन्जॉय करता येतं
हे तुझं वाक्य माझ्या लक्षात होतं.
मला गरजच नाही वाटली नशेची.!

आई,
पार्टी संपत आली आहे आत्ता.
जो तो घराकडे निघालाय.
खूप पिऊन ‘टाईट’ झालेले
माझे मित्र
स्वत ड्राईव्ह करत घराकडे निघालेत.
मीही माझ्या कारजवळ पोहोचलोय.
निघालोय. पूर्ण शुद्धीत..!
मी येईन घरी धडधाकट.
नशेत गाडी ठोकण्याचा,
काहीबाही होण्याचा प्रश्नच नाही
मी प्यालोच नाही.
तर बेभान होण्याचं काही कारणही नाही.

आई,
मी निघालो.
गाडी काढतच होतो बाहेर.
पण पाहतो तर काय
समोरून एक गाडी सुसाट
येताना दिसतेय.
माझ्या जवळ अगदी जवळ येतेय ती. माझ्या गाडीवर..आदळतेय..

आई,
मी पडलोय गाडीबाहोर..
काहीच कळत नाहीये.
अंगातून काहीतरी
कारंजं फुटल्यासारखं उडतंय.
कोणीतरी हवालदार ओरडतोय जोरजोरात.
दारू पिऊन बुंगाट गाडी चालवत होती ती पोरं.
त्यांच्या गाडीनं ठोकलं याला.
मरणार हे पोरगं हकनाक.

आई,.
मला वेदना होताहेत गं खूप.
तू जवळ असावीस असं वाटतंय.
मी. मी.? आई.
मला का ठोकलं गं त्यांनी.
रक्ताच्या थारोळ्यात पडलोय मी.
जमलेत इथे सगळं जण.
डॉक्टर, पोलीस, .
ते डॉक्टर म्हणताहेत..
काही चान्सेस नाही,
संपलंय सारं.
काहीच उपाय नाही.
नाही वाचणार हा.

आई,
तुझी शपथ.
मी ‘प्यायलो’ नव्हतो गं.
त्या गाडीतली मुलं नशेत होती.
खूप प्यायली होती.
दारू पिऊन गाडी चालवत होती..

आई,
ती मुलंही माझ्याच बरोबर
त्या पार्टीत होती बहुतेक
फरक इतकाच..
की प्यायले ते आणि मरतोय मी.!
का पितात गं आई हे लोकं.?
सगळं आयुष्य नासवतात..
स्वत:चं.
आणि दुसर्‍यांचंही. !

आई,
मला आता असह्य वेदना होतायंत.
आतल्या आत काहीतरी चिरत, कापत जातंय.

आई,
ज्या मुलाने माझी ही अवस्था केली
तो शुद्धीत येतोय आता.
मी कळवळतोय आणि
तो फक्त पाहतोय. सुन्नपणे. !
आई,
माझ्यासारखंच त्यालाही कुणीतरी सांगायला हवं होतं.
दारू पिऊन गाडी चालवू नकोस.
त्यानं ते ऐकलं असतं तर
आज मी जिवंत राहिलो असतो गं.

आई,
मला आता श्‍वास लागायला लागलाय.
तुटायला लागलोय मी अख्खा. आतल्या आत.
पण
तू नाही रडायचंस माझ्यासाठी.
मला जेव्हा जेव्हा तुझी गरज होती.
तेव्हा तेव्हा होतीस तू माझ्या बरोबर.
माझ्यासाठी.!
पण मरताना मला फक्त
एक शेवटचा प्रश्न पडलाय.
जर मी दारू पिऊन गाडी चालवत नव्हतो तर मग मी का मरायंचं?
दुसर्‍याच्या चुकीची शिक्षा
मीच का भोगायची..?
आई. का लोक दारू पिऊन गाडी चालवतात गं.?

स्त्रोत : मयूर आर. पाटील

Saturday, 24 December 2011

छत्रपती शिवाजी महाराज की जय .........


छत्रपती शिवाजी महाराज की जय .........फक्त जय म्हणून काय होणार....  हीच वेळ आहे काही तरी करून दाखवायची ........... मातीत मरणारे कैक असतात ,पण मातीसाठी मरणारे फक्त मराठेच असतात...!!! आजचा वर्तमानकाळ आपल्याला सांगतो तरी काय ?? इतिहासाच्या पुस्तकामधील शिवाजी महाराजांच्या गाथा वाचाव्या,ऐकाव्या,पाहाव्या आणि उत्तरपत्रिकेत लिहाव्या आणि मार्कांचे धनी व्हावे एवढच..??? शिवजयंतीच्या निम्मित्ताने राजेंची मिरवणूक काढावी,जयजयकार करावा ,गुलाल उधळावा फक्त एवढच ??? याच्या पलीकडे आमच्याकडे काय झाल..!! महाराष्ट्राची अस्मिता आता आहे तरी कुठे ?? आजच्या वर्तमानकालीन जगण्याला राजेंचा महाराष्ट्राला कुठला अर्थ देता येईल ?? आता एखादा तानाजी ,आता एखादा बाजी ,आता एखादा मुरार बाजी का भेटत नाही कुठ आता ?? इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निधड्या छातीने समोर जाणारा साम्हजी का भेटत नाही कुठ आता ?? दुष्मनाचे हत्यार वार काळजावर झेलता झेलता स्वराज्यासाठी स्वताला दफन करून टाकणारा एकेक छावा का उभारत नाही इथ आता ?? कधी आळंदीला गेला तर ज्ञानेश्वरांच्या पादुकावर लखलखत दिसेल पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा ज्ञानोबा भेटत नाही कुठ आता .......!! आता गाड्या भरपूर आल्या तवेरा आली,बोलेरो आली ,स्कोर्पिओ आली,आल्तो आली,इंडिगो आली पण समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारा एकही नामदेव का दिसत नाही आता ??? आता बागायतदार भरपूर आले पण कांदा मुळा भाजी ,अवघी मिठाई माजी म्हणणारा सावतामाळी कुठल्या शेतात गवसत नाही आता ........!! राजे कैक झाले पण रयतेच्या डोयिवर सुखाचा छत्र धरव यासाठी स्वताच्या आयुष्याचा रणकंदन करणारा राजा शिवाजी भेटत नाही कुठ आता............!!!!! अब्जोवधी ,करोडपती खूप झाले इथ पण एक फुट्क घाडग आणि एक झाडू ज्याची एस्तेत पण गावागावाना स्वच्छतेची श्रीमंती बहाल करणारा गाडगे बाबा कुठ दिसत नाही आता ......!! आता तुकड्या तुकड्यात जगणार आम्ही पण समाजाला पूर्णत्व बहाल करणारा संत तुकडोजी दिसत नाही आता.....!!! आमची पोर रशिया,चीन ,आफ्रिका ,अमेरिका ला जाऊन येतात पण माज्या भारतीय संस्कृतीचा पताका खांद्याला घेऊन अमेरिकेच्या शिकागोच्या धर्मापरीश्ध्ये मध्ये माज्या संस्कृतीचा तेजोमय निर्माण करणारा विवेकानंद बोलत नाही कुठ आता .........!!!!!! आता देवी खूप झाल्या पण समाज्याला पुण्य बहाल करणारे पुण्यश्लोक आहिल्यादेवी कुठ दिसत नाही आता.......!! आता घराघरात आया आहेत पण शिवाजी पैदा करणारी जिजाऊ दिसत नाही कुठ आता ............???? ...................म्हणजे माणसं तर काल हि जन्माला येत होती माणसं आज हि जन्माला येत आहेत ....माणसांची गर्दी काल हि होती माणसांची गर्दी आज हि आहे ....पण कालच्या गर्दीत माणसं होती पण आजच्या माणसांच्या गर्दीत आम्हाला माणसं शोधावी लागतात हि आमची सगळ्यात मोठी अडचण आहे...................!!!!!! मग आमच्या महाराष्ट्राची कूस वांज झाली कि काय ....???? या सगळ्या गोष्टीना आपणच कारणीभूत ठरलो आहोत.........आणि आपणच ठरत राहतो......!!! एक काळ असा होता आम्ही स्वाभिमानी संस्कृतीचे पैक होतो आता श्वान संस्कृतीचे पैक झालो आहोत..........!!!!! पूर्वी आमच्या घरावर पाटी असायची "अतिथी देवो भवं ..!!!" पण आता ती पाटी बदलून त्या ठिकाणी दुसरी पाटी लागली आहे "कुत्र्या पासून सावधान..........!!!!" महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले ........इतर प्रांतांना भूगोल आहे पण महाराष्ट्राला इतिहास आहे...........!! मराठे जन्माला येतात तर संघर्ष करायला जन्माला येतात आयता त्यांना इथ काही मिळाल नाही ........... महाराष्ट्रात जन्माला आला न म्हणजे खांद्यावर संकट घेऊनच पैदा झाला ............!! एकीकडे मेजवानी झाडणारी माणसं ,तर एकीकडे कुपोषणात मारणारी माणसं ......... एकीकडे गाड्यांची रेलचेल,तर एकीकडे पायात एक तुटका वाहन नाही .......... एकीकडे फटाके वाजवून दिवाळी साजरी होते तर दुसरीकडे त्यांच्या फटक्यावर आवाज.....!! हे शिवाजी महाराज्यांच स्वराज्य आहे का ??? राजेंनी स्वराज्य निर्माण केल पण आम्ही सुराज्य नाही .......... एकीकडे लचके तोड चाललेली ,कुणी विदर्भ वेगळा मागायचा ,कुणी बेळगाव सीमा भाग आमचा म्हणायचा........तुकड्या तुकड्यांचे सारे पुजारी सारे ...........!! अरे ........!! मागायचा तर मागायचा अखंड हिंदुस्थान मागा ना ..............!!!!!!! चत्कोराची भूक काय कामाची............???? या सगळ्या गोष्टीना आपणच कारणीभूत आहोत............!!! मग पुन्हा एकदा मनात येते राजे तुम्ही नाही आहात तेच ठीक आहे............!! जर वाटलंच यायचा तर एक काम करा राजे.............येताना मां साहेब जिजाऊ ना घेऊन या. जय शिवराय 
आंतरजालावरून साभार

Wednesday, 21 December 2011

गोंविदाग्रज , उर्फ राम गणेश गडकरी यांनी पानिपताच्या या रणसंग्रामावर अंगावर काटा उभा राहील असा फटका लिहिला

गोंविदाग्रज , उर्फ राम गणेश गडकरी यांनी पानिपताच्या या रणसंग्रामावर अंगावर काटा उभा राहील असा फटका लिहिला . द्वापरकाळात कौरव – पांडवांच्या झालेल्या लढाईशी कलियुगातील पानपताशी त्यांनी तुलना केली आहे . हा फटका जसाच्या तसा ….
( चाल: भल्या माणसा , दसलाखाची.)

कौरव -पांडव-संगर-तांडव द्वापर-काली होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती ॥ धृ.॥

जासुद आला कथी पुण्याला – ” शिंदा दत्ताजी पडला ;
कुतुबशहानें शिर चरणानें उडवुनि तो अपमानियला । ”
भारतवीरा वृत्त ऐकतां कोप अनावर येत महा
रागें भाऊ बोले , ” जाऊ हिंदुस्थाना , नीट पहा.
‘ काळा ‘ शी घनयुध्द करुं मग अबदल्लीची काय कथा ?
दत्ताजीचा सूड न घेतां जन्म आमुचा खरा वृथा. ”
बोले नाना , ” युक्ती नाना करुनी यवना ठार करा ;
शिंद्यांचा अपमान नसे हा ; असे मराठया बोला खरा. ”
उद्गीरचा वीर निघाला ; घाला हिंदुस्थानाला ;
जमाव झाला ; तुंबळ भरला सेनासागर त्या काळा.
तीन लक्ष दळ भय कराया यवनाधीशा चालतसे ;
वृध्द बाल ते केवळ उरले तरुण निघाले वीररसें.
होळकराचे भाले साचे , जनकोजीचे वीर गडी ,
गायकवाडी वीर अघाडी एकावरती एक कडी.
समशेराची समशेर न ती म्यानामध्यें धीर धरी ;
महादजीची बिजली साची बिजलीवरती ताण करी.
निघे भोसले पवार चाले बुंदेल्यांची त्वरा खरी ;
धीर गारदी न करी गरदी नीटनेटकी चाल करी.
मेहेंदळे अति जळी अंतरी विंचुरकरही त्याचपरी ;
नारोशंकर , सखाराम हरि , सूड घ्यावया अशी धरी.
अन्य वीर हे किती निघाले गणना त्यांची कशी करा ?
जितका हिंदू तितका जाई धीर उरेना जरा नरां.
भाऊ सेनापती चालती विश्वासातें घेति सवें ,
सूड ! सूड !! मनिं सूड दिसे त्या सूडासाठी जाति जवें.
वीररसाची दीप्ती साची वीरमुखांवर तदा दिसे ;
या राष्ट्राचे स्वातंत्र्याचे दृढस्तंभ ते निघति असे.
वानर राक्षस पूर्वी लढले जसे सुवेलाद्रीवरती
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती ॥ कौ. १ ॥
( २ )

जमले यापरि पानपतावरि- राष्ट्रसभा जणुं दुसरि दिसे ;
वीर वीरमदयुक्त सभासद सेनानायक प्रतिनिधिसें.
अध्यक्ष नेमिले दक्ष भाउ अरि भक्ष कराया तक्षकसे ;
प्रतिपक्षखंडना स्वममंडना ; तंबू ठोकिती मंडपसे.
शस्त्रशब्द हीं सुरस भाषणें सभेंत करिती आवेशें ;
रणभूमीचा कागद पसरुनि ठराव लिहिती रक्तरसें.
एका कार्या जमति सभा या , कृति दोघींची भिन्न किती !
बघतां नयनीं वाहतीलची पूर अश्रूंचे स्वैरमति
पूर्ववीरबल करांत राहे , आहे सांप्रत मुखामधी ;
हाय ! तयांचे वंशज साचे असुनी झालों असे कुधी !
जमले यापरि पानपतावरि भारतसुंदरिपुत्र गुणी
युध्द कराया , रिपु शिक्षाया , संरक्षाया यशा रणी ॥ कौ. २ ॥
( ३ )

अडदांड यवन रणमंडपिं जमले ; युध्दकांड येथोनि सुरु.
करिती निश्चय उभयवीर रणधीर ” मारुं वा रणीं मरुं ”
पुढें पडे दुष्काळ चमूंमधि अन्न व खाया वीरांना ;
म्हणती , ” अन्नावांचुनि मरण्यापेक्षा जाऊं चला रणा. ”
मग सेनेनें एक दिलानें निश्चय केला लढण्याचा ;
स्वस्थ होळकर मात्र नीचतर पगडभाई तो यवनांचा.
परधान्यहरणमिष करुनि रणांगणि पढले आधीं बुंदेले ;
श्रीशिवराया युध्द पहाया हांक द्यावया कीं गेले ?
धन्य मराठे ! धन्य यवन ते रणांगणांमधिं लढणारे !
आम्ही त्यांचे वंशज केवळ हक्कांसाठी रडणारे
आवेश प्रवेशे दोन्ही सैन्यामधें कराया युध्दखळी ;
परि स्वार्थ अनिवार मार दे , आर्यजनांमधि करि दुफळी.
आर्यजनांचें दैवहि नाचे अभिमानाचें रुप धरी ;
करि वसति मनिं सदाशिवाच्या ; होय अमुच्या उरा सुरी.
सुरासुरी जणुं डाव मांडिला बुध्दिबळाचा भूमिवरी ;
परि दुर्दैवें वेळ साधिली प्यादीं आलीं अम्हांवरी !
कलह माजला , झालि यादवी , नवीन संकट ओढवले ;
कारस्थानीं हिंदुस्थाना व्यापुनि पूर्णचि नागविले .
कुणि यवनांचा बाप जाहला , ताप तयाचा हरावया ,
नवा सोडुनी जया दवडुनी कुणीं लाविल डाग वया.
कुणि दिल्लीची वाहि काळजी , कोणी तख्तासाठिं झुरे ;
कुणा लागला ध्यास प्रीतिचा विचार सारासारिं नुरे.
” लालन लालन ! ” करि कुणि , साधी मर्जीनेची कुणि मरजी ;
असे घसरले , साफ विसरले युध्दरीती अति खडतर जी.
गारदीच मज माफ रुचे जरि यवन न सोडी विश्वासा ;
निजबंधूंची करणी ऐकूनि सोडिं , वाचका , नि:श्वासा !
कलहा करिती काय विसरती क्षुद्र वस्तुच्या अभिमानें ,
जसे हल्लिंचे लोक तोकसम कलहा करिती नेमानें ,
नेमानेमाच्या या गोष्टी कष्टी होतें मन श्रवणीं
असो ; बुडाली एकी , बेकी राज्य चालवी वीरगणीं
सरदारांच्या बुध्दिमंदिरा आग लागी कलहाची
शिपाइभाई परि नच चळले ; रीति सोडिली न मर्दाची.
नाहीं लढले , लढणारहि नच कुणी पुनरपि या जगती ;
तसे मराठे गिलचे मोठे कलिंत लढले पानपती ॥ कौ. ॥ ३॥
( ४ )

एके दिवशी रवि अस्ताशी जातां झाला विचार हा -
” प्रात:काली स्मरुनी काली युध्द करुं धनदाट महा. ”
निरोप गेला बदशहाला , ” युध्द कराया उद्यां चला ;
समरांत मरा वा कीर्ति वरा जय मिळवुनि आम्हांवरि अचला. ”
सकल यामिन आर्यवाहिनी करी तयारी लढण्याची ;
वीरश्रीचा कळस जाहला परवा न कुणा मरणाची .
परस्परांतें धीर मराठे गोष्टि सांगती युध्दांच्या ,
वीरश्रीच्या शस्त्रकलेच्या जयाजयांच्या अश्वांच्या.
बोले कोणी , ” माझा न गणी वंशचि मृत्यूभयासिं कधी ;
आजा , पपजा , बापहि माझा पडला मेला रणामधीं.
बापसवाई बेटा होई खोटा होइल नेम कसा ?
पोटासाठी लढाइ नच परि मान मिळविण्या हवा तसा ! ”
कुणी धरी तलवार करीं तिस पाहुनि आनंदें डोले ,
फिरवी गरगर करि खालीं वर वीर मराठा मग बोले -
” अफाट वाढीची ही बेटी मोठी झाली लग्नाला
प्राणधनाचें द्याज घेउनी उद्यांच देइन यवनाला. ”
अशी चालली गडबड सगळी निद्रा कोण नच आली ;
कोठें गेली अशी पळाली रात्र न कोणाला कळली.
प्रभातरुपें ईर्षा आली ; भीति पळाली निशामिषें ;
भय मरणाचे कैचें त्यांना ? काय करावें हरा विषे ?
शिंग वाजलें संगरसूचक कूच कराया मिळे मुभा ;
धांवति नरवर समरभूमिवर ; राहे धनगर दूर उभा
हटवायातें देशदरिद्रा मुखा हरिद्रा लावुनिया ,
कीर्तिवधूतते जाति वराया समरमंडपीं धांवुनिया.
शहावलीचा हलीसारखा अताइ नामा पुत्र बली
यवनदलीं मुख्यत्व घेत कीं पापावलिमधिं जसा कली ,
प्रणव जसा वेदांस सदाशिव तसा आर्यबलसेनानी ;
विश्वासातें पाहुनि वदनीं अंगुलि घातलि यवनांनी.
आले यापरि रणभूमीवरि ; जसे जात कवि यापुढतीं
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥ कौ. ॥ ४॥
( ५ )

वाढे जैसा दिवस , वाढलें युध्द तसें अतिनिकरानें
हातघाइला लढाइ आली ; अंबर भरलें नादानें.
उभय वीरवर गर्जति ‘ हरहर ‘, ‘ अल्ला अकबर ‘ उल्हासें ;
भासे आला प्रळय ; यमाला दिली मोकळिक जगदीशें.
अश्ववीरगज भक्तमंडळी गोंधळ भारतदेवीचा ;
तलवारींच्या दिवटया केल्या ; सडा घातला रक्ताचा.
धूळ उडाली गुलाल झाली ; ” उदे ” गर्जती भक्तबळी ,
परस्परांचे बळी अर्पिती भूमि तर्पिती शिरकमळी ,
रणवाद्य भंयकर भराड वाजे शुध्द न कोणी देहाची ;
रणमदमदिरामत्त जाहले , हले फणाही शेषाची.
मनुजेंद्रयरा जणुं अंत न उरला देवेंद्राची नच परवा
म्हणुनि धूलिकण नभीं धाडुनी मेघसंघ कीं रचिति नवा ?
रक्तपाट अतिदाट वाहती घाट बांधिले अस्थीचे ;
मृतगजतुरंग मकर खेळती कृत्य अगाधचि वीरांचें.
घोर कर्म हें बघुनी वाटे रविहि धरी निजसदनपथा ;
कांपे थरथर स्थीर न क्षणभर ; इतरांची मग काय कथा !
यापरि चाले लढाइ ; भ्याले दाढीवाले , मग हटले ;
पळती , धांवति सैरावैरा ; आर्यवीर त्यांवरि उठले.
आर्यजनां आवेश नावरे ; भरे कांपरें यवनाला ;
म्हणति ” मिळला जय हिंदूला लढाइ आली अंताला ! ”
तोंच अताई दूरदृष्टिचा धीर देत निजसैन्याला ,
स्वयें धांवला , पुढें जाहला , स्फूर्ति पुन्हां ये यवनाला.
त्वरित पूर्ववत् समर चाललें , हले भरंवसा विजयाचा ;
दाढी शेंडी एक जाहली खेळ शहाच्या दैवाचा.
करी अताई जबर लढाई नाहीं उपमा शौर्याला ;
त्यावरि ये विश्वास , भासलें कीं खानाचा यम आला !
विश्वासानें अतिअवसानें खान पाडिला भूमिवरी
करिवरचरणीं मरण तया ये , शरश एक मग यमनगरी ,
धीर सोडिती पीर शहाचे पळती आवरती न कुणा ;
शहावलीची कमाल झाली यत्न तयाचा पडे उणा.
पहात होता शहा खेळ हा दुरुनी , तोही घाबरला ,
म्हणे , ” करावें काय ? न ठावें ! ” दैव हात दे परि त्याला.
दक्ष वीर लक्षैकधीर तनुरक्षक सेनेसह धावे ;
म्हणे चमूला , ” पळति यवन ये कंठ तयांचे छेदावे. ”
पुन्हा उलटले यवन लढाया हुकुम ऐकतां छेदावे. ”
शहा तयातें सहाय होतां मारा करितो जोराचा.
जसे लढावे वीर संगरीं कविज्ञन इच्छा मनिं करिती ,
तसे मराठे गिलचे याचे कलींत लढलें पानपती ॥ कौ. ॥ ५ ॥
( ६ )

नभोमध्यगत सूर्य होत मग युध्दहि आलें मध्याला ;
हाय ! हाय ! या आर्यभूमिचा भाग्यसूर्य तो शेवटला !
सदा अम्हांला विजय मिळावा , प्रताप गावा जगतानें !
सदाशिवाचा उजवा बाहू राहु रिपुस्त्रीमुखविधुचा ,
बाऊ केवळ म्लेंच्छजनांचा , भाऊ माधवरायाचा ,
बेटा ब्राह्मण बादशहाचा ; पेटा साचा वाघाचा ,
वीरफुलांतील गुलाबगोटा , वाली मोठा धर्माचा ,
ताण जयाची द्रौणीवर उद्राण आणितां आर्याला ,
विजयाचा विश्वास असा विश्वास – लागला शर त्याला !
मर्म हाणि तो वर्मी लागे कर्म आमुचें ओढवलें ;
धर्म-सभेला आत्मा गेला , धर्मवधूकरिं शव पडलें.
अश्रू नयनीं आणि लक्ष्मी प्रिय भार्या त्या आर्याची ;
उत्तरे चर्या , अघा न मर्या , परि ये स्मृति तिस कार्याची.
करी विचारा वीराचारा दारा वीराची स्वमनीं -
” नाथघात सैन्यांत समजतां धीर उरेल न आर्यजनीं. ”
छातीचा करि कोट , लोटिला दु:खलोट अनिवार जरी ,
नीट बैसवी प्रेता देवी धुनष्य त्याच्या दिलें करी.
धन्य सती ती ! धन्य तिचा पति ! धन्यचि जननीजनकाला !
धन्य कवीचें भाग्य असे या म्हणुनि मिळे हें गायाला !
परि जें घडलें लपले कुठलें ? वेग फार दुर्वार्तेला ;
अल्पचि काळें भाउस कळलें – ” गिळिलें काळानें बाळा ! ”
” हाय लाडक्या ! काय कृत्य हें ? घाय काय हा भान करी
गोंडस बाळा , तोंड पुण्याला दावुं कसें ? कथिं तोड तरी , ”
असा करी ती शोक ऐकुनी दु:ख जाहलें सकळांला
अश्वावरती स्वार जाहला भाऊराया मरण्याला.
व्यंग समजतां भंग कराया आर्याच्या चतुरंग बळा
सिध्द जाहला शहा ; तयाला देवानें आधार दिला.
फिरति मराठे आला वाटे अंत शिवाजीराज्याला ;
भाऊराया योजि उपाया – तोही वायां परि गेला.
मान सोडिला , साम जोडिला ; दूत धाडिला होळकरा ;
प्रसंग येता मत किंकरा धनी जोडिती असे करां.
दूर निघाला. सत्वर आला , होळकरांला नमन करी ;
म्हणे , ” भाउचा निरोप एका – ‘ साह्य करा या समयिं तरी.
उणें बोललों , प्रमत्त झालों , बहु अपराधी मी काका ;
माफ करा , मन साफ करा , या आफतींत मज नच टाका.
मत्प्राणाची नाही परवा बरवा समरी मृत्यु हवा ;
परी लागतो डाग यशाला शिवरायाच्या तो दुरवा.
देशकार्य हें व्यक्तीचें नच ; सक्ति नको ; भक्तीच हवी ;
आसक्ती सर्वांची असतां मिळवूं आतां कीर्ति नवी.
राग नका धरु ; आग लागते यशा ; भाग हा सर्वांचा ;
शब्द मुलाचा धरितां कैचा ? हाच मान का काकाचा ?
साह्य कराया यवन बधाया धीर द्यावया या काका ! ”
असें विनविलें , हात जोडिले , दया न आली परि काका.
रट्टा दे भूमातेला ; धरि कट्टा वैरी मान तिची
बट्टा लावी वयास ; केली थट्टा ऐशा विनतीची ;
दु:खावरतीं डाग द्यायला करी होळकर हुकूम दळा -
” पळा , मिळाला जय यवनाला! ” काय म्हणावें अशा खळा ?
फिरले भाले-भाले कैचे ? दैवचि फिरलें आर्यांचें ;
पाहे भाऊ , वाहे नयनीं नीर ; करपलें मन त्याचें.
निरोप धाडी पुन्हा तयाला – ” पळा वांचवा प्राण तरी
पळतांना परि कुटुंबकबिला न्यावा आमुचा सवें घरीं ”
घेत होळकर वीरवधूंतें ; मग दक्षिणची वाट धरी ;
देशहितांची करुनी होळी नाम होळकर सार्थ करी !
करी दुजा विश्वासघात हा ; निजबंधूंच्या दे साची
परवशतेची माथीं मोळी , हातीं झोळी भिक्षेची !
काय कथावी युध्द-कथा ? मग वृथा भाउचा श्रम झाला ;
धीर सोडुनी पळति मराठे , पूर्ण पराभव त्यां आला.
कोणी वेणीमाधव धांवे ; वार तयाचा शिरीं जडे ;
भारतरमणीकंठतन्मणी धरतीवरतीं झणी पडे.
भूदेवीची तुटे गळसरी ! फुटे दैव कीं आर्यांचे
आकाशाची कुऱ्हाड पडली ; कडे लोटले दु:खाचे !
सैरावैरा आर्य धावती ; हरहर ! कोणी नच त्राता !
यवन करिति ज्या मग प्रळय भयंकर: वदा कशाला तो आतां ?
वर्णन करितां ज्या रीतीनें कुंठित होइल सुकविमति ,
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥ कौ. ॥ ॥ ६ ॥
( ७ )

सन सतराशें एकसष्ट अतिनष्ट वर्ष या देशाला
हर्ष मरे , उत्कर्ष उरेना ; सकळां आली प्रेतकळा.
फुटे बांगडी दीड लाख ती ; राख जहाली तरुणांची
आग पाखडी दैव अम्हांवर ; मूर्ति अवतरे करुणाची .
घरोघरीं आकांत परोपरि ; खरोखरीचा प्रळय दिसे ;
भरोभरीं रक्ताच्या अश्रू अबला गाळिती शोकरसें.
‘ दोन हरवली मोति ; मोहरा गेल्या सत्तावीस तशा ;
रुपये खुर्दा न ये मोजितां ‘ – वचना वदती वृध्द अशा ;
धोर वृत्त हें दूतमुखानें कानीं पडलें नानाच्या ;
‘ भाऊ भाऊ ‘ करितां जाई भेटिस भाऊरायाच्या.
उघडा पडला देश तयातें हें नव संकट कां यावे !
दु:ख एकटें कविं न येत परि दु:खामागुनि दु:ख नवें !
धक्का बसला आर्ययशाला ; तेथुनि जाई राज्य लया ,
रघुनाथाचें धैर्य हरपलें , जोड उरेना हिमालया.
” नाथ ! चाललां सोडुनि अबला ! पाहूं कुणाच्या मुखाकडे ? ”
” वाळा ! कैसा जासि लोटुनि दु:खाचे मजवरतिं कडे ? ”
जिकडे तिकडे हंबरडे यापरी परिसती जन फिरतां ;
कोणिकडेही तरुण दिसेना ; सेनासागर होय रिता.
उडे दरारा , पडे पसारा राज्याचा ; बळ घेत रजा ;
उघडें पडलें मढें हत्तिचें कोल्हे त्यावरि करिती मजा !
भलते सलते पुढें सरकले , खरे बुडाले नीच -करीं.
मालक पडतां नीट बैसले पाटावरती वारकरी.
नडे आमुची करणी आम्हां ; ! खडे चारले यवनांनी ;
तडे पडोनी यशपात्राला रडे सदोदित भूरमणी.
गंजीफांचा डाव संपला दिली अखेरी यवनांते
स्वातंत्र्यासह सर्वस्वातें दूर लोटिलें निज हातें.
रुमशामला धूम ठोकितां पुणें हातिचें घालविलें ;
दुग्धासाठी जातां मार्गी पात्र ठेवुनी घरिं आले !
करि माधव नव उपाय पुढतीं परि ते पडती सर्व फशीं ;
परिटघटी उघडिल्या एकदा बसेल कैशी पुन्हा तशी ?
जसा नदीचा ओघ फिरावा पात्रीं पडतां गिरिशिखरें
पानपताच्या पर्वतपातें इतिहासाचा ओघ फिरे.
इतिहासाचें पान येथचें काळें झालें दैवबळें ,
या देशावर अपमानाची स्वारी दु:खासहित वळे.
सर्वस्वाचा नाश जयाने वर्णु तयातें अतां किती ?
व्यास वर्णितां थकले यातें मग मी कोठें अल्पमति ?
जसें झगडतां त्वरित फिरावी सकल जगाची सरळ गति
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपतीं ॥ कौ. ॥ ७ ॥
( ८ )

जें झाले ते होउनि गेलें फळ नच रडुनी लेशभरी ;
मिळे ठेंच पुढल्यास मागले होऊं शहाणे अजुनि तरी.
पुरें पुरें हे राष्ट्रविघातक परपस्परांतिल वैर अहो !
पानपताची कथा ऐकुनी बोध एवढा तरि घ्या हो !
भारतबांधव ! पहा केवढा नाश दुहीने हा झाला !
परस्परांशी कलहा करितां मरण मराठी राज्याला.
हा हिंदू , हा यवन , पारशी हा , यहुदी हा भेद असा ,
नको नको हो ! एकी राहो ! सांगू आपणां किती कसा ?
एक आइचीं बाळें साचीं आपण सारे हें स्मरुनी ,
एकदिलानें एकमतानें यत्न करु तध्दितकरणीं.
कथी रडकथा निजदेशाची वाचुनि ऐसा हा फटका
लटका जाउनि कलह परस्पर लागो एकीचा चटका !
कौरवपांडव- संगरतांडव द्वापरकालीं होय अती ;
तसे मराठे गिलचे साचे कलींत लढले पानपती ॥ ८ ॥

(www.ramganeshgadkari.com वरून साभार)

Monday, 12 December 2011

"ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार....! जय हो..!"


1) "बघतोस काय ? मुजरा कर .....!"
2) बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
3) "बघ माझी आठवण येते का ?"
4) ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''
5) साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
6) अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
7) तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
8) 'अहो, इकडे पण बघा ना...'
9) "हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".
10) थांब लक्षुमी कुंकू लावते!
11) तुमचे लक्ष आमच्याकडे का?
12) "लायनीत घे ना भौ"
13) चिटके तो फटके!
14) राजे तुम्हि पुन्हा जन्माला या
15) अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा, सनिव्हेल, फ्रिमॉन्ट्, हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
16) १३ १३ १३ सुरूर !
17) "नाद खुळा"
18) "हाय हे असं हाय बग"
19) आई तुझा आशिर्वाद.
20) "सासरेबुवांची कृपा "
21) "आबा कावत्यात!"
22) पाहा पन प्रेमाणे
23) नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.
24) "हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"
25) अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.
26) हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...
27) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..
28) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.
29) गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
30) हेही दिवस जातील
31) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा
32) घर कब आओगे?
33) १ १३ ६ रा
34) सायकल सोडून बोला
35) हॉर्न . ओके. प्लीज
36) "भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"
37) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)
    तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं
    माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा
38) बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये--
सुसाईड मशिन
मिसगाईडेड मिसाईल
मॉम सेज नो गल्स
39) एका ट्रक च्या मागे लिहले होते:
राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खाली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
40) एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल"
खाली लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)
41) अजस्त्र डंपरच्या पाठीमागे
उगीच हॉर्न वाजवू नये, तुला चिरडायला एक सेकंद पुरेल
42) एका टेम्पोच्या मागे..
आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद! 
आंतरजालावरून साभार

कवी सुरेश भट - मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती  छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो..कुठेतरी दैव नेत होते!
वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?
कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना...
करु तरी काय? हाय, तेव्हा खरेच डोळे नशेत होते!
असूनही बेचिराख जेव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!
जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दुःख सोसले, ते सुखात होते! मजेत होते!
बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडुन माझेच प्रेत होते!
मला विचारु नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी?
तुझेच आलाप काल राञी उसासणाऱ्या हवेत होते!

कुठे उधळला गुलाल,कुठे फुलांची माळ

कुठे उधळला गुलाल,कुठे फुलांची माळ,
ह्या खुर्चीसाठी मांडला आज राजकारण्यांनी सारीपाट

महागाई, भ्रष्ठाचार देशासमोर दत्त बनुन उभे आहेत
आमचे हे नेते मात्र पैश्याचा गंगेत डुंबत आहेत
गोरगरीबांच्या डोळ्यांतील अश्रुदेखील आता सुकले आहेत
सभाग्रुह डोक्यावर घेऊन हे मात्र थकले आहेत

भुमीपुत्र आकाशाकडे चातकाप्रमाणे पाहात आहे
हे मात्र संसदेत पैश्यांची बंडले नाचवत आहेत
गरीबांच्या जिवाची इथे कुणाला पर्वा आहे
आपला खिसा कसा भरेल ह्याचीच सर्वांना चिंता आहे

सगळेच असे जसे एकाच माळेचे मणी
शोधुनही सापडणार नाही धुतलेल्या तांदळासारखा कोणी
बरणीत भरलेल्या खेकड्यांची ही ह्यांची जमात आहे
एकाचा पाय खेचुन वर चढायला दुसरा लगेच तयार आहे

आरोप प्रत्यारोपांच्या नुसत्या फैरी झाडल्या जातात
आणी मग आपण कसे निर्दोष हे पटवुन देतात
कौरवांनी डाव मांडलाय ध्रुताचा क्रुष्णा पुन्हा एकदा डावावर आहे
समोर पांडव बनुन आपल्यातीलच लोकप्रतिनिधी आहेत

तो बघ बनुन शकुनी फासे फेकतोय भ्रष्ठाचार
ऊठ आतातरी नाही तर पुन्हा "महाभारत" घडणारच आहे

कवी-- अज्ञात

Sunday, 11 December 2011

बाऊन्सरवर सिक्सर

बाऊन्सरवर सिक्सर

मुलाखतीला गेलात. आणि तुमच्यावर येऊन पडला प्रश्नांचा गुगली. तर त्या गुगलीवर खणखणीत फूल शॉट मारून एक सिक्सर कसा खेचाल.? - हे वाचा. आणि पुढच्या वेळेस मुलाखतीला जाताना ठरवा. की मुलाखत घेणारा त्याला हवे ते नाही आपल्याला हवे ते प्रश्न कसे विचारीन.! एच.आर.वाल्यांच्या जुलमी प्रश्नावर जालीम उत्तर..

नोकरी मिळवायची तर मुलाखत देणं चुकत नाही.
मुलाखत म्हटली की टेन्शन येतंच.
काय प्रश्न विचारणार, देव जाणे.! आपल्याला त्याची उत्तर देता येतील की नाही.
त्यात आपण ज्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू द्यायला चाललोय. त्यासंबंधी विचारलेच प्रश्न तर ठीकच.
पण भलतंच काही विचारलं तर..? तर करूच काय शकतो आपण.? समजा विचारलंच की, सांगा अण्णांशी मनमोहन सिंगांनी कसं डील करायचं.? किंवा मध्य पूर्वेतल्या तरुणांच्या आंदोलनाविषयी तुमचं काय मत आहे तर.?
पेपर रोज वाचतो, टीव्ही पाहतो. जेमतेम वेळ मारत याही प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकतो.
पण आपली दांडी उडवणारे गुगली किंवा बाऊन्सरच पडले तर.?
हल्ली एच.आर.चा राऊण्ड सोपा नसतो, आपला विषय सोडूनही हे एच.आर.वाले काहीही प्रश्न विचारू शकतात. अगदी ‘गोलमाल’मध्ये अमोल पालेकरला उत्पल दत्त विचारता तसे. ते कसे असू शकतात. आणि उमेदवारांची किती कसोटी लागू शकते हे सांगणारे हे काही भन्नाट प्रश्न आणि त्याची एक नंबर उत्तरं.! प्रश्न नीट वाचा, अगदी नीट वाचा. गमतीनं तुम्ही हसाल. पण कल्पना करून पाहा, असा इंटरव्ह्यू आपल्या वाट्याला आला तर.?

१) मी जर तुझ्या बहिणीला पळवून नेलं तर तू काय करशील ?- (जो उमेदवार त्यादिवशी सिलेक्ट झाला त्यानं दिलेलं उत्तर..) सर, मला माझ्या बहिणीसाठी तुमच्याइतका उत्तम जोडीदार मिळूच शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जर माझ्या बहिणीच्या मागे लागलात तर मला आनंदच होईल ! (तुम्हाला डिवचणार्‍या प्रश्नाचं हे पॉझिटिव्ह उत्तर. तुम्ही परिस्थिती कसे हाताळता, ते कळतं म्हणे अशा प्रश्नांच्या उत्तरातून.!)

२) कॉलेजातून नुकत्याच पासआऊट झालेल्या एका मुलीला प्रश्न पहिल्यावहिल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला.. एका सकाळी तू उठलीस आणि अचानक तुला कळलं की तू प्रेगनंट आहेस तर.. ?(मुळात लग्नही न झालेल्या अशा जेमतेम विशीतल्या मुलीला, कुणीतरी नवखा माणूस हा प्रश्न अचानक विचारतो म्हटल्यावर ती भंजाळूनच जाईल. पण या मुलीने दिलं एक सोपं सरळ पण समोरच्याला चक्रावून टाकणारं उत्तर!)
ती म्हणाली, ‘मी फार एक्साईट होईन. प्रचंड आनंद होईल मला. मी तो क्षण माझ्या नवर्‍यासोबत सेलिब्रेट करेन. आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण असेल तो. सुट्टी घेईन मी त्या दिवशी, दांडी ऑफिसला !
(त्या मुलीने विचार केला, आपण हा प्रश्न भलत्या अर्थाने का घ्यायचा. कधीतरी असं होईलच, मग पॉझिटिव्ह विचार करावा याबाबत.)

३) मुलाखत घेणार्‍या माणसाने कॉफीची ऑर्डर दिली. समोर उमेदवार बसलेला होता.
कॉफी आली. मग त्या माणसाने त्या उमेदवाराला विचारलं.
- वॉट इज बीफोर यू ?
(तुम्हाला माहितीये काय उत्तर दिलं असेल त्याने.? थोडी शक्कल लढवून पाहा..)
तो उमेदवार म्हणाला - टी ! (?)
(चुकलं उत्तर. वाटलं ना तुम्हाला. त्यानं हे असं काय उत्तर दिलं असं वाटलच असेल.! पण मुळात प्रश्न होता की, वीच अल्फाबेट कमस बीफोर ’यू’ ? म्हणजे बाराखडीत यू अक्षराच्या आधी कोणतं अक्षर येतं. वाचा प्रश्न पुन्हा. यालाच डोकं चालवणं असं म्हणत असावेत कदाचित ! )

४) रामाने पहिली दिवाळी कुठे साजरी केली? या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करताना अयोध्या, मिथिला, लंका असली ठिकाणी आठवली ना तुम्हालाही? आठवू शकतात. हे आठवणं साहजिकच आहे.
(इंटरव्ह्यूसाठी गेलेला उमेदवार साधारण एक इंटर्नशीप करून गेलेला. त्यानं उत्तर देण्यासाठी काही सेकंदांचा वेळ घेतला. आणि म्हणाला.)
उमेदवार - रामाने कधीच दिवाळी साजरी केली नाही ! (का???? तर द्वापारयुगात दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. पण कृष्णाचा हा रामाचाच पुढचा अवतार. त्यामुळे रामाने दिवाळी साजरी करण्याची काही शक्यताच नाही. )

५) प्रश्न - तू एकटाच गाडी घेऊन एका वादळी वार्‍यांच्या रस्त्यावरून निघालास.. भयंकर जोरात पाऊस कोसळतोय.. तीन माणसं वाटेत तुला दिसतात. बसची वाट पाहात उभी आहेत. एक म्हातारी बाई (जिची अवस्था फार वाईट आहे आणि ती कधीही मरेल असं चित्र आहे.)
तुझा एक मित्र (याच मित्राने तुझा जीव वाचवला होता एकदा)
आणि.
ती. जिच्यावर तुमचं जिवापाड प्रेम आहे ती.
काय कराल.? कुणाला गाडीत बसवून घ्याल.?
आता विचार करा, या प्रश्नाचं आपण काय उत्तर दिलं असतं.?
आपल्याला लगेच माणुसकी आठवली असती. नैतिक दडपण आलं असतं. आपण विचार केला असता, म्हातारी बिचारी. तिचा जीव वाचवायला हवा. पण मग मित्राचं काय, त्याचे उपकार आहेत आपल्यावर. या नैतिक घोळातच फसलो असतो आपण.
साधारणपणे यातलं कोणत्याही उत्तराचा आपण विचार करू शकतो. पण सिलेक्ट झालेल्या उमेदवाराने उत्तर दिलं..
‘मी गाडीची चावी माझ्या मित्राकडे देईन, त्याला त्या म्हातार्‍या बाईला दवाखान्यात घेऊन जायला सांगेन. आणि मी ‘तिच्या’बरोबर बसची वाट पाहत उभा राहीन
(हा उमेदवार २00 उमेदवारांमधून फक्त या एका उत्तरासाठी सिलेक्ट झाला! ना कसला नैतिक घोळ. ना खोटेपणा. ना मोठेपणाचा आव. मुलाखतीत अशी साधी प्रॅक्टिकल सोल्यूशन असणारी उत्तरं आपण का देऊ शकत नाही.)

६) ते म्हणाले, आता हा शेवटचा प्रश्न, यावर ठरेल तुला नोकरी द्यायची की नाही.? ‘मला या टेबलचा सेण्टर पॉईण्ट म्हणजे मध्यबिंदू कुठेय ते सांग.’. उमेदवाराने आत्मविश्‍वासाने टेबलावरच्या एका भागावर बोट ठेवलं.
प्रश्न विचारणार्‍याने पुन्हा विचारलं.
असं का.. हीच जागा का. ? उमेदवाराने उत्तर दिले - सर तुम्ही शेवटचा,
कच प्रश्न विचारणार असं ठरलं होतं ना, मग आता हा पुढचा प्रश्न कसा.? त्याचं प्रसंगावधान पाहून बॉसलोक खूश झाले. त्याला नोकरी मिळाली, हे वेगळं सांगायला नको.

तात्पर्य काय.? थिंक आऊटसाईड ऑफ द बॉक्स म्हणजे नेहमीपेक्षा जरा वेगळा, प्रसंगी सोपा-साधा, विचार करून पाहा. छापील आणि घोकीव उत्तरांच्या पायवाटांच्या पलीकडे अशा काही वाटा असतात ज्या आनंददायीही असतात आणि यशदायीही.!
 आंतरजालावरून साभार

Saturday, 10 December 2011

अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त ....

अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त ....
 
 
    
अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त ....
सर्व श्री समर्थ दत्त भक्तांना दत्तजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा ...

या दत्तजयंतीचा एकच संकल्प ... अंधारमय अज्ञान सागरातुन सदगुरु भक्तिमार्ग नौकेतुन ज्ञानरुपी प्रकाशमय महासागराकडे प्रवास ...
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
||श्री गुरुदेवदत्त ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||

आदरणीय सर,


तुमच्याच शाळेत शिकतो माझा मुलगा.

लहानच आहे अजून, निदान माझ्यासाठी तरी,

सहलीला जाण्याचा आनंद मनात न मावण्याइतका तर नक्कीच.

कालपर्यंत तो तेव्हढाच खुश होता. अगदी तुमच पत्र माझ्या हातात देईपर्यंत.

पत्र कसलं एक साधासा अर्ज होता.

सहलीला जाउ ईच्छिणार्‍या मुलांच्या पालकांनी भरायचा.

फारसा मजकूर नव्हताच त्यात. फक्त एव्हढच लिहिलं होतं

"सहलीसाठी निघाल्यापासून ते परत येईपर्यंत, मुलाची कुठलीही जबाबदारी शाळेची नसेल. पालकांनी आपल्या जबाबदारीवर मुलांना पाठवावे"

मी सही करणारच होतो, खरं तर न वाचताच.

कारण तुमच्यावर आणि शाळेवर विश्वास आहे माझा.

पण या वाक्याचा अर्थच कळेना.

आमचं मूल ही आमचीच जबाबदारी आहे सर. अगदी आम्ही जिवंत असेपर्यंत.

पण ज्या विश्वासाने आम्ही त्यांना तुमच्या शाळेकडे सोपवलय त्याचं काय ?

त्या दिवशी तुम्ही त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेउ शकत नसलात तर आम्ही कोणाच्या जबाबदारीवर पाठवायचं त्यांना ?

त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर पाठवावा इतका मोठा नाहीये हो तो अजून.

मी हे जाणतो सर, की एव्हढ्या सगळ्या मुलांना अनोळखी ठिकाणी कानात वारं भरल्यागत हुंदडताना आवरणं अवघड असतं.

पण आमच्या मुलांइतकाच आम्ही तुमच्या अनुभवावरही विश्वास ठेवतो.

काय कराव ते कळत नव्हत सर, पण न कळताही सही करावीशी वाटली. मुलाच्या डोळ्यातले भाव बघून.

लहान मुलांच जग जास्त मोठ नसतं हो. त्यांचे आनंदही त्यांच्या रुसव्याइतकेच क्षणिक असतात. पण तुमच्या माझ्या अनंदांपेक्षापेक्षा ते खूप खरे असतात.

मी त्याला जवळ घेतलं, त्याला समजवणं खूप कठीण वाटलं मला.

"बाबा, तूला काळजी वाटतेय का रे माझी?" त्याने विचारलं

"हो रे बाळा. तिकडे तुझ्याकडे लक्ष कोण देणार?"

"ठीक आहे. मग नाही जात मी. पण टिचरला तू सांगशील?"

मी रडता रडता हसलो. देवाशप्पथ सांगतो सर, जास्त मोठा नाहीये तो. पण त्याक्षणी तो मला माझ्यापेक्षाही मोठा वाटला.

तुमचे खूप खूप आभार सर. मुलांची जबाबदारी न घेउन तूम्ही त्यांनाच जबाबदार व्हायला शिकवताय.
 आंतरजालावरून साभार

Tuesday, 6 December 2011

तू मला का आवडतेस?

तू मला का आवडतेस?
मला नाही माहित,
पण खूप आवडतेस,
इतकच मला माहित....

... ना तू राजकुमारी, ना तू खूप सुंदर,
तरीही तू खूप छळतेस मला,
किती लाजल्यासारखं होतं माहितीय??
हळूच तिरक्या नजरेने जेव्हा बघतेस मला.

मिठीत तुझ्या काय सांगू...वाटतं कसं?
देठावर कळीने अलगत उमलावं तसं,
स्पर्शाने तुझ्या काय सांगू...वाटतं कसं?
मयूरपंखाने अंगावरून सरकावं तसं...

मी काहीही केले तरी तुला ते सुंदरच वाटते,
तुज्यासोबत मी न जाने कितीदा संसार थाटतो.
तू नेहमी विचारतेस ना मी इतका  सुंदर कसा?
सुंदर नाही ग मी....प्रेमात मला पाहताना तुझी नजरच तशी.

आवडतं मला तुझं.....माझ्या स्वप्नात येणं,
माझा हात चालता चालता तुझ्या हातात घेणं
हे सगळं असंच मला आयुष्यभर देशील का?
स्वर्ग नकोय मला...असंच नेहमी तुझ्या मिठीत घेशील का?

अक्षरश: वेडा आहे मी तुझ्यासाठी,
फक्त एक कर माझ्यासाठी..
बाकी काही नाही दिलेस तरी चालेल,
फक्त खूप आठवणी दे मला....मरताना हसण्यासाठी....


आंतरजालावरून साभार

कोलावेरी दि मराठी मध्ये

 
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू? .
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
दूर असतो चंद्र...चंद्र...चंद्र तो शुभ्र...
शुभ्र चंद्राआड रात्र...रात्रीचा रंग ब्लैक
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
गोरीपान मुलगी...मुलगी...मुलीचे हृदय ब्लैक...
नजरेला मिळाली नजर..फ्युचर माझे डार्क...
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
पा पा पां पा पा पां पा पा पा पा पा पां
हातात ग्लास...ग्लासात स्कॉंच...डोळ्यात अश्रू भरपूर
खाली आयुष्य...आली मुलगी...आयुष्य रिवर्स गिअर
माझी प्रिये...माझी प्रिये...दाखविलेस तू खरे रंग...
गेली कुठेस...माझी प्रिये...जीव झाला कासावीस..
प्राण आला कंठी माझा...देवा बघते कशी ती हसून..
हे गाणं नाकाम मजनूंच
नाही काही आम्हा पर्याय
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

आंतरजालावरून साभार

Monday, 5 December 2011

कोण बोलेल तू फक्त मंदिरातच असतोस....

मी पाहतो तिथे तू दिसतोस,
कोण बोलेल तू फक्त मंदिरतच असतोस....

मी पाहतो जेव्हा आईला घरात वावरताना,
तेव्हा नेहमी जाणवतो तूच आहेस माझी काळजी घेताना...

मी पाहतो जेव्हा बाबाना माझयावर रागावताना,
तेव्हा नेहमी जाणवतो तूच आहेस मला समाजावताना....

मी पाहतो जेव्हा शाळेत गुरुजी शिकवताना,
तेव्हा नेहमी जाणवतो तूच आहेस मला मार्ग दाखवताना.....

तू तर नेहमी माझया सोबतच असतोस,
मग,कोण बोलेल तू फक्त मंदिरातच असतोस....

आंतरजालावरून साभार

Sunday, 4 December 2011

४ रूपयांवरून २० रूपयांवर कसा पोहचतो कांदा?

४ रूपयांवरून २० रूपयांवर कसा पोहचतो कांदा?  स्टार माझा वर, प्रत्येकाने वाचले पाहिजे  

मयुर परिख, स्टार माझा, नाशिक
Thursday, 01 December 2011 19:47
 
मुंबईपर्यंत येतांना कांद्याचा भाव कसा वाढतो ?
नाशिक : महागाई वाढल्याने सरकारने परदेशी गुंतवणूक वाढवून महागाई कमी करण्याचा प्रयत्न केलाय. यामुळे शेवटी महागाई कशामुळे वाढते हा प्रश्न निर्माण झालाय. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी स्टार माझाचा प्रतिनिधी मयुर परीखने शेतापासून बाजारात कांदा येईपर्यंतचा आढावा घेतला.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावची कांद्याची बाजारपेठे ही आशियातील दोन नंबरची बाजारपेठ आहे. कांदा येथून मुंबईला पोहचतो, पण मुंबईत येऊन कांदा महागतो, ग्राहकांना रडवतो.

मयुर परिखने थेट निफाड तालुक्यातील एका शेतातून कांद्याची माहिती घेण्यास सुरूवात केली. शेतमालकाच्या म्हणजेच शेतकऱ्याच्या घरात एकुण सहा जण आहेत. पत्नी आणि चार मुलांचा हा परिवार आहे. संपूर्ण परिवार एकाच शेतात काम करतं. २० एकर शेतात या शेतकऱयानं कांद्याची लागवड केलीय.
यंदा कांद्याला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्याला आहे. संपूर्ण परिवार शेतात राबून कांद्याचं उत्पादन घेतं. ट्रॅक्टरमध्ये टाकून हे कांदे पिंपळगाव बाजारपेठेत नेले जातात.

बाजारात कांद्याच्या बोलीला १०० रूपये प्रतिक्विंटलपासून सुरूवात होतेय. पिंपळगावच्या शेतकऱ्याचाही नंबर आलाय. पण त्याची घोर निराशा झालीय. त्याच्या कांद्याला फक्त ४०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. म्हणजेच ४ रूपये किलो. निफाडचा हा शेतकरी दु:खी झालाय. त्याच्याकडे दुसरा उपायही नाहीय. यंदा कांद्याच्या पिकानं त्याला फटका दिलाय.

एकरी ७५० रूपये त्याला मशागतीचा खर्च आलाय, खतासाठी प्रति एकर ८०० रूपये, बियाणे ८०० रूपये, कांदे लावणीला खर्च १ हजार रूपये, पाणी आणि फवारणीचा खर्च १५०० रूपये. (प्रति एकर) सहा लोकांची चार महिन्यांची मेहनत.

निफाडच्या शेतकऱ्याचं उत्पन्न

उत्पन्न एका एकरला ५० क्विंटल म्हणजेच ५ हजार किलो कांद्याचं उत्पादन
भाव : ५ हजार किलो कांद्याचं ४ रूपये किलोप्रमाणे उत्पन्न २५ हजार रूपये
१५०० रूपये एपीएमसी मार्केटचा कर
३ हजार लोडिंग-अनलोडींग आणि मालाला बाजारात पोहचवण्याचा खर्च
शेतकऱ्याकडून एमपीएमसी ६ टक्के खर्च हा हमालीसाठी द्यावा लागतो.
म्हणजे खरी कमाई चार महिन्यांची १५ हजार ५०० यातून खर्च वजा केल्यास शेतकऱ्याला काय मिळणार
आपल्याला कुणीतरी लुटलंय, असं या शेतकऱ्याला वाटतंय, पण यावर काहीही उपाय नाहीय.

शेतकऱ्याचा माल आता व्यापाऱ्याच्या मार्केटला पोहचलाय.
शेतकऱ्याकडून कांद्याची खरेदी व्यापाऱ्याने केलीय. व्यापाऱ्याकडे ५० जण काम करतात. कांदा येथे साफ केला जातो. त्यानंतर कांद्याची प्रतवारी केली जाते. कांद्यांची पॅकींग होते. ज्यानं हा माल खरेदी केला त्याला हा माल पोहचवण्यात येतो. हा व्यापारी महागाईनं त्रस्त आहे. कारण अनेक वर्ष व्यापार केल्यानंतरही लेबर आणि ट्रान्सपोर्ट यावर खुप सारा खर्च होतोय.

या व्यापाऱ्याचं गणित स्पष्ट आहे.
हा माल खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्याला एकूण किंमतीच्या १.२५ टक्के पैसा चुकवावा लागतो.
यह माल खरीदने के बाद किसन को माल की कुल कीमत का एपीएमसी बाजार को 1.25 फीसदी पैसा चुकाना पडता है.
यानंतर साफ सफाई आणि पॅकिंगचा प्रति क्विंटल खर्च १०० रूपये येतो.
हा माल मुंबईला रवाना करायचा असेल तर, प्रतिक्विंटल ३०० रूपये खर्च सोसावा लागतो. कारण हा माल १७५ किलोमीटरचा प्रवास करतो.

याशिवाय हमाली आणि इतर खर्चानंतर या व्यापाऱ्याला नफा मिळतो १ रूपया प्रति किलो.

मुंबईत प्रवेश करतांना कांदा ४ रूपयांनी महागतो.
सरकारचा कायदा आहे की, भाजीबाजारात माल सरळ नेता येणार नाही. त्याआधी तुम्हाला तुमचा माल एपीएमसी वाशी मार्केटला न्यावा लागेल. यासाठी वाशी मार्केटचा कारभार आपल्याला जाणून घ्यावा लागेल.
रूमालाच्या खाली
माल वाशी मार्केटला आला की मलाच्या सव्वा टक्के पैसे एपीएमसीला द्यावे लागतात. माल मोजणे आणि मजुरीसाठी १२ टक्के द्यावे लागतात. कांद्याची भाववाढ सुरूच राहते. एपीएमसी बाजारात सौदा सुरू होतो पण उघड-उघड नाही तर रूमालाच्या खाली.
जो सर्वात जास्त बोली लावतो त्याला माल दिला जातो. कांद्याचा भाव येथे १२ रूपये प्रति किलो होतो. या व्यवहाराने होलसेल व्यापारीही नाराज आहेत. त्यांना असं वाटतं की या धंद्यात साडेसहा टक्के कमाई आहे, किंवा प्रतिकिलोमागे १ रूपया पेक्षा जास्त कमाई नाही.

माल खरेदीनंतर होलसेल व्यापारी किंवा खरेदीदार यांना एपीएमसीचे कर आणि फी त्यासह लोडींग अनलोडींग खर्चानंतर हा कांदा १५ रूपये किलो होतो.
कांद्याचा प्रवास ४ रूपयांवर १७ रूपयांवर
शेतकऱ्याकडून चार रूपये किलोने खरेदी केलेला कांदा होलसेल व्यापाऱ्याकडे १५ रूपये किलोने येतो. होलसेल व्यापारी या मालावर एक रूपया नफा घेतो. खर्चासह किरकोळ बाजारात माल १७ रूपयांवर येतो.
ग्राहकांपर्यंत कांदा २० रूपयांपर्यंत
किरकोळ बाजारात हा माल आकर्षक पॅकिंगमध्ये पॅक केला जातो, यामुळे किलोमागे २ रूपयाने कांदा महागतो. पॅकिंगची किंमत आणखी १ रूपया लावली जाते. बाजारात कांदा येतो तेव्हा किंमत असते प्रति किलो २० रूपये.

बिल गेट्‍स यांचे 11 नियम :-



नियम 1.
जीवन चांगले असेलच असे नाही. त्याचा चांगला वापर करायला शिका.
नियम 2.
जग हे तुमच्या सन्मानाची कधीच पर्वा करणार नाही. त्यासाठी आधी तुम्हाला काही तरी करून दाखवावे लागेल.

नियम 3.
शाळेतून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला कोणीच जास्त पगार देणार नाही किंवा तु्म्हाला कार व मोबाईल अशा सेवाही देणार नाही. यासाठी तुम्हाला आधी खूप मेहनत करावी लागेल व उच्च पदापर्यंत स्वत: उडी घ्यावी लागेल.

नियम 4.
तुमचे शिक्षक कडक आहेत, असा तुम्ही जर विचार करत असाल तर थोडे थांबा. तुम्हाला वरिष्ठ अधिकारी होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल.

नियम 5
मोठा बर्गर तुमच्या पुढे काहीच नाही. परंतु त्यासाठी तुमचे वडिल बर्गर लिपिंगसाठी दुसर्‍या अर्थाचा शब्द वापरतात तर त्याला चांगली संधी म्हणावी लागेल.

नियम 6
तुम्ही मनमिळाऊ स्वभावाचे नसाल यात तुमच्या पालकांचा काही दोष नाही. तुम्ही स्वतःत बदल घडवून आणले पाहिजेत. त्यातूनदेखील नवीनच काही तरी शिकायला मिळेल.

नियम 7
तुमच्या जन्मानंतर तुमचे आई-वडिल तुमच्याकडे जास्त लक्ष देत नसतील. पण आता ते तुमच्याविषयी अधिक जागरूकता दाखवित असतील. तुम्हाला त्यांची परिक्षा घ्यावीशी वाटत असेल तर रात्रीच्या वेळी तुमच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडा ठेवा.

नियम 8
तुम्ही तुमच्या जीवनात यश- अपयश पाहिले असेलच. पण झालेली चूक कोणीच मान्य करत नाही. काही शाळांमध्ये असे दिसून आले आहे की, 'नापास' हा शब्दच त्याच्या शब्दकोशातून पुसुन टाकला आहे. त्यामुळे जीवनात कधीही अपयशाचा जास्त विचार न करता यशाचीच कास धरली पाहिजे.

नियम 9
जीवनाला सेमिस्टरमध्ये वाटू नका. तसेच त्याला उन्हाळ्याची सुटी देखील मिळत नाही. त्यामुळे स्वत:ला शोधायचे असेल तर आधी आत्मविश्वास वाढविला पाहिजे.

नियम 10
टिव्हीवर जीवनाचे खरे दर्शन घडविले जात नाही. व्यक्तिला विविध टप्प्‍यातून काम करायला जावे लागते. त्याचवेळी जीवन काय आहे ते कळते.

नियम 11
आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते
आंतरजालावरून साभार

Sunday, 20 November 2011

मराठी माणूस आणि व्यवसाय


मराठी माणूस आणि व्यवसाय
खरे खोटे मला माहिती नाही पण पुढे सांगीतलेल्या कथेतील घटना अगदिच अशक्य आहे असे मात्र नाही.
एका सरकारी खात्याचे एक टेंडर निघालेले असते , नेहेमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या अंदाजाप्रमाणे त्याचे बजेट ठरवलेले असते, की या प्रोजेक्ट्चा खर्च रू.१५ लाख येइल .
अनेक जणांच्या कोटेशन मधून तीन जणांना साहेब चर्चेला बोलावतात .
पहीला येतो आमचा मराठी माणूस...............
साहेब-

आता बघा आमचा अंदाज होता १५ लाखाचा पण तुमचे कोटेशन आहे २० लाखाचे ,सांगा कसे काय करायचे?
सांगा किती कमी करताय?
मराठी माणूस—

हे बघा साहेब जे काय कोटेशन भरले आहे ते अगदी बरोबर आहे यात काही कमी होणार नाही ,आ्म्ही क्वालीटीत काहीही तड्जोड करत नाही, सर्व पार्ट अस्सल वापरतो आमच्याकडे डुप्लिकेट माल वापरत नाही, अहो आमचा ख्रर्चच मुळी १८ च्या घरात जातोय ,त्यामुळे यामधे काहीही कमी होणार नाही.

साहेब –

बर तुम्ही जरा बाहेर बसा मी इतर लोकांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो.

यानंतर येतो एक सरदारजी

साहेब-

बोला ! तुमचे काय …..तुमचे कोटेशन आलय २५ लाखाचे काय म्हणणे आहे तुमचे ?

२५ लाख म्हणजे फारच जास्त होतात नाही का ?

सरदार-

क्या साहबजी समझ लो महंगाइ कितना बढ गया है ,हर चीज का दाम बढ गया है, हमे पता है आपको टाँप क्वालिटी चाहिये ,तो हम भी टाँप क्वालिटी का माल देंगे,और आप्को भी मालूम है आपके ऑफ़ीस मे भी हर जगह देना पडता है

साहेब-

फिर भी हे जरा जास्तच होतात

सरदार-

क्या साहबजी समझ लो आपको भी इसमे दो रखा है

साहेब –

बर तुम्ही जरा बाहेर बसा मी इतर लोकांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो.

यानंतर येतो एक मारवाडी

साहेब-

बोला ! तुमचे काय …..तुमचे कोटेशन आलय ३० लाखाचे काय म्हणणे आहे तुमचे ?

३० लाख म्हणजे फारच जास्त होतात नाही का ?

मारवाडी-

सायेब ते सर्व जरा बाजूला ठेवा आणि आमचे ऐका कोणि काय कोटेशन भरलय आम्हाला सगळं म्हायतीय

आपण असे करा तुम्ही ऑर्डर आमच्या नावाने काढा आम्ही त्या मराठी माणसाकडून काम करून घेतो त्याचे त्याला पैसे देवून टाकतो ,तुम्ही पेमेंट्चे काम त्यवढे लवकर करा ,त्या मराठी माणसाकडून आम्ही १५ लाख देवून काम करून घेतो वरच्या १५ तले निम्मे तुमचे निम्मे आमचे.

पुढे काय झाले ते सांगायला नकोच नाही कां???
 आंतरजालावरून साभार

Friday, 18 November 2011

आपली माणसे

जवळच वृद्धाश्रम आहे पण कधीच तिकडे जाण्याचा विचार हि मनात आला नव्हता आला नव्हता..कविता अशीच जमणार नाही म्हणून मग मी विचार केला लिहायचे असेल तर खरेच त्यांची कथा व्यथा जाणून घेतली पाहिजे ;म्हणून मग मी आतमध्ये गेले.तिथे एक आजी बसलेल्या दिसल्या ,मी त्यांचाशी बोलण्याचा प्रयत्न केला... . आजी जेवण झाले का? नाही ग पोरी मला नाही जाणार आज जेवण ........ पण कसे काय आज या आजीबाई कडे केले येणे.... माज्या म्हातारी शी बोलायला वेळ नसतो कोणाला इकडे ... कधी तरी फोन ची रिंग वजते इकडे ... हेल्लो हेल्लो मनी ऑर्डर पोहचली का?.. म्हणून फोन बंद पडतो ...अन डोळ्यातील अश्रू गालावर पोहचून कंठ दाटतो .... . पुन्हा मी म्हणाले आजी थोडसे तरी खाऊन घ्या... नाही ग पोरी मला नाही आज जाणार जेवण .... माझ्या लेकाचा आज वाढदिवस आहे... मन माझे त्याला आशीर्वाद देण्यासाठी तडपते आहे .... मन त्याचे का माज्यापर्यंत येण्यासाठी अडवत आहे.. पूर्वीसारखे दिवस नाही राहिले आता.. म्हणून प्रेम माझे त्याचाव्रचे अजूनही संपले नाही.... पूर्वीसारखी मन तक्रार नाही करत आता.. म्हणून तो मला घेऊन जाईल विचार करणे अजूनही सोडले नाही ... . थोडा वेळ डोळ्यातले अश्रू पुसत स्तब्ध शून्यात बघत राहिल्या.. लहानपणी एक घास चिऊ चा एक घास कौऊ चा करत घास भरवायचा.. आयुष्यभर एक एक पैसा जपून वापरायचा.. हौस होतीना लेकाला डॉक्टर बनवायचा.. आता रोज एक च विचार करायचा.. एकदा तरी माझ्या पिल्लाला आमची आठवण येते का? एकदा तरी माज्या पिल्लाला आमची काळजी वाटे का? पण अपेक्षा नी आता कसली,इछाच नाही आता उरली.. आई बापांची किंमत नाही ज्याने केली..मजबुरी त्याने सांगितली.. आपली माणसे ज्याला अडगळ वाटली ...आपली माणसे त्याला परकी झाली. .... थोडेसे रागवत.. तुज्या बाबांना मात्र तुज्यावर राग आहे बरे का ,,' आपल्या आईला का कोणी असे वेगळे करते , रक्ताच्या नात्याला का कोणी क्षणात परके करते,, नाही आठवत का रे तुला आम्ही घेतलेले कष्ट..? बरे आहे न सगळे तिकडे? कसे काय फोन विचारायचं नुसते.. इथे सर्वे काही ठीक आहे ,मजेत आहे बाळा .. तू मात्र सुखी रहा ,आनंदात राहा नेहमीच आशीर्वाद असतील बाळा.. फक्त एकच गोष्ट आहे.. आपल्या माणसाच्या प्रेमापासून तू मुकला आहेस.. आपली माणसे कोण ते आता आम्हाला हि उमजले आहे..

आंतरजालावरून साभार

राग आणि स्पर्श (वाचनात आलेला लेख)


त्या दिवशी ‘तो’ आपल्या एका मित्राला घरी जेवायला घेऊन आला. तो असा अचानक एक पाहुणा आणणार आहे, हे त्याने तिला फोन करून सांगितलेही नव्हते. अगदी जेवणाच्या वेळी ‘तो’ आल्याने तिची खूप गडबड उडाली. पुन्हा भाताचा कुकर लावायला लागला. भाजी करावी लागली. मनातून ती खूप चिडली होती; पण त्या मित्राच्या समोर तिने राग दाखवला नाही. त्याला आग्रहाने जेवायला वाढले. वहिनींची चौकशी केली. मित्र निघून गेल्यानंतर मात्र ती ‘त्याच्या’ बेजबाबदारपणाबद्दल खूप बोलू लागली. ऐनवेळी उडालेल्या धांदलीचा सर्व राग तिच्या बोलण्यातून बाहेर पडत होता. सुरुवातीला ‘त्याने’ही काही कारणे देण्याचा प्रयत्न केला; पण नंतर तो शांत राहिला. तिचे बोलून झाल्यानंतर ‘त्याने तिच्या खांद्यावर हळुवार हात ठेवला आणि म्हणाला, ‘सॉरी, चुकलं माझं, चल तू जेवून घे. मी वाढू का तुला?’ त्याच्या या वाक्यानं आणि प्रेमळ स्पर्शानं तिचा सगळा राग कुठल्या कुठं निघून गेला. तिनं डोळे पुसले. ती मनापासून हसली आणि आपल्या जेवणाची तयारी करू लागली.
असं का घडतं?

बहुसंख्य स्त्रिया स्पर्शाची भाषा जाणतात. त्यामुळेच दोन मैत्रिणी एकमेकींना भेटल्या की, एकमेकींचा हात हातात घेतात. एखादे गोंडस बाळ दिसले की, त्याला उचलून त्याची पप्पी घेतात. तिची त्वचा त्याच्या त्वचेपेक्षा अधिक पातळ आणि संवेदनशील असते. त्याला स्पर्शाची भाषा वगैरे समजणे थोडे कठीणच, तिला मात्र स्पर्शाची भाषा समजते. त्यामुळेच त्याने तिच्या खांद्याला केलेला स्पर्श खरा आहे, त्याला खरच स्वतची चूक जाणवली आहे, हे तिला जाणवलं आणि तिचा राग पळाला. तिच्या, संवेदनशील नाजूक त्वचेला स्पर्शाची अपेक्षा असते. ‘त्याने’ कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेमाने स्पर्श करावा. हातात हात घ्यावा, पाठीवर थोपटावे असे तिला वाटत असते. त्यालाही स्पर्शाची भूक असते; पण ती ठराविक कारणासाठीच! असा उगाचच निर्हेतूक स्पर्श त्याच्या लक्षातच राहत नाही; पण तिच्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी तो लक्षात ठेवायला हवा.

त्याची दुसरी हुशारी म्हणजे तो पटकन ‘सॉरी’ म्हणाला. आपली चूक मान्य करतो तो आदर्श माणूस; पण चूक नसतानाही सॉरी म्हणतो तो आदर्श नवरा ! ‘ती’ काही वाद घालू लागली की कोणतेही आग्यरुमेंट न करता ‘सॉरी’ म्हटले की वाद संपूनच जातो, हे आता त्याच्या लक्षात आले आहे. बायकोला ‘सॉरी’ कसं म्हणायचं हा पुरुषी अहंकार बाजूला ठेवला, तर भांडणाच्या प्रसंगाचाही शेवट गोड होऊ शकतो.
- डॉ. यश वेलणकर

माझा महाराष्ट्र


या नावातच सारं काही आलं!
महाराष्ट्र !
या राष्ट्रात विवधता अगदी ठासून भरलेली आहे!
इतिहास, निसर्ग, कला, साहित्य, पाककला ह्या सगळ्यात इतकं वैविध्य क्वचितच जगात आढळेल!

ह्या राष्ट्राची माती पवित्र आहे! ह्याच मातीतून शिवाजी, संभाजी जन्माला आले! ह्याच मातीत स्वराज्याचे बीज परले गेले! इथेच ते फळाला आले! इथेच अनेक अनामी वीर स्वराज्यासाठी लढले आणी कैक धारातीर्थी पडले! इथली माती त्यामुळेच लाल असेल का?

जेव्हा मुजोर औरंग्या ३ लाख सैन्य घेउन टीचभर स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा संभाजी नावाच्या एका 'पोराने' पहिली नऊ वर्षे आणी नंतर इथल्याच संताजी-धनाजी ह्यानी मोगली बकासुरास इथेच गाडले! पुढल्या काही वर्षातच त्याच मोगलांच्या दिल्लिचं तख्त काबिज़ करून ह्या महाराष्ट्राचा भगवा अगदी अटकेपार फडकला! ही ताकत आहे इथल्या मंनगटातली!
जितका रंजक इथला इतिहास तितकाच इथला निसर्ग वैविध्यपूर्ण!

इथला कोंकण किनारा,इथला समुद्र, इथले सह्याद्री पर्वत, इथली घनदाट अरण्ये...
इथली वन्यजीवसृष्टी देखील विविधतेने नटलेली आहे! इथली फळ ही जगप्रसिद्ध आहेत! सर्व दुनियेला वेड लावणारा फळांचा राजा हापूस आंबा देखील महाराष्ट्राचाच!

हा राकट, कणखर महाराष्ट्र कलाकारांचा देश देखील आहे! ह्या मातीला कलादेवतेच वरदान आहे! सतार इथेच जन्माला आली! वारली कला, बिद्रि कला, सावंतवाडीची लाकडी खेळणी, कोल्हापुरी चपला हे सारे प्रसिद्ध तर आहेतच पण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग हा अगदी पूर्वापार चालत आलेला आहे! पैठणी, नारायणी पेठ ह्या साड्या म्हणजे इथली शान आहेत!

इथली झणझणीत लावणी, खडे पोवाडे, कोळी गीत, भारुड हे सर्वांना भुरळ घालतात! इथली रंगभूमी, इथली नाट्यगीत सारी जगावेगळी!

भारतातील पहिला चित्रपट देखील ह्याच भूमीत तयार झाला!
अशी आहे महाराष्ट्राची कला परंपरा!

मराठी साहित्य म्हणजे रत्न-हिरे ह्यानी खचून भरलेली खाण आहे.
पु.ल. देशपांडे,कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, रणजीत देसाई, शिवाजी सावंत, कवी ग्रेस, बालकवी ही ह्या खाणीमधली काही रत्ने!

विनोदी, ऐतिहासिक, विडंबनात्मक .... जी जी श्रेणी तुम्ही शोधाल त्या त्या श्रेणीत तुम्हाला मराठी पुस्तक सापडतील!


७०० पेक्षा अधिक वर्षांचा वारसा लाभलेली ही आमची मायबोली ह्या प्रचंड साहित्य परिवाराने आणखीच खुलते!

महाराष्ट्रीय जेवण म्हणजे तर स्वर्गाहून सुंदर!
इथली पुरणपोळी, थालीपीठ, चकली ,चिवडा, श्रीखंड सगळ्यांना तौक आहे पण इथल्या प्रत्येक शहराला आपली एक पाक संस्कृती लाभलेली आहे.

मुंबईचा वडा पाव,नागपूरच्या सावजी समुदायाचे तिखट जेवण,वडे-भात, कोल्हापुरचा तांबडा-पांढरा रस्सा,मिसळ, सातारी कन्दी पेढे, पुणेरी मिसळ, कोंकणी आणी मालवणी जेवण....अहाहा! पाणी सुटल तोंडाला! हे तर फक्त मोजके नमुने आहेत!

तर असा आहे आमचा महाराष्ट्र! कणखर आणि राकट तरी सर्वांस माया लावणारा आणि जपणारा.....!!!!
 
आंतरजालावरून साभार

Saturday, 5 November 2011

समजत नाही मी घडलो की बिघडलो !!

हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो..
समजत नाही मी घडलो की बिघडलो !!
तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो..
पैसा हीच सक्ती समजून इश्वरभक्ती विसरलो !!
सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो..
सुखासाठी साधने वापरताना साधना विसरलो !!
भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलो..
धन जमा करताना समाधान विसरलो !!
तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलो..
परिक्षार्थी शिक्षणात हाताचे कौशल्य विसरलो !!
टी.व्ही. आल्यापासून बोलणं विसरलो..
जाहिरातीच्या मार्‍यामुळे चागलं निवडणं विसरलो !!
गाडी आल्यापासून चालणं विसरलो..
मोबाईल आल्यापासून भेटीगाठी विसरलो !!
कॅलक्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो..
संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो !!
संकरीत खाल्यामुळे पदार्थांची चव विसरलो..
फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो !!
ए.सी. मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो..
परफ्युमचा वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलो !!
चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो..
जगाचा भूगोलात गावाचा इतिहास विसरलो !!
बटबटीत प्रदर्शनात सौंदर्यचे दर्शन विसरलो..
रिमिक्सच्या गोंगाटात सुगमसंगीत विसरलो !!
मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो..
स्वतःमध्ये मघ्न राहून दुसर्‍याच्या विचार विसरलो !!
सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो..
जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो !!
आंतरजालावरून साभार

शाळेतील ती मजा

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे,कोणे एके काळी मी देखील शाळेत जात होतो.
शाळेबाहेर लागलेल्या रांगेमध्ये ,मी देखील मिसळून जात होतो.

इतिहास आणि भूगोल ,शिक्षकांच्या नजरेने पाहत होतो.
मराठीच्या कवितेत अन धड्यांमध्ये, तासंतास रमून जात होतो .

पायथागोरस आणि न्यूटनला , मनापासून शिव्या घालत होतो.
"अनु" आणि "रेणू" ला मात्र तिरक्या नजरेने बघत होतो .

पुस्तक तोंडासमोर धरून, हळूच डुलकी घेत होतो,
कांटाळवाण्या तासाला, मित्रांसोबत फुल्लीगोळा खेळत होतो.

मधल्या सुट्टी मध्ये एकत्र जमून, सर्वजन डब्बा खात होतो,
डब्यामधली गोड पोळी मात्र, लपून छपून ठेवत होतो .

तो माझा निरागसपणा कोठे तरी हरवला आहे,
शाळे मधला तो समीर आता एम्प्लोइ बनला आहे,

शाळेसारखी मजा आता कशी काय येणार ,
आता मीटिंग शेड्यूल मध्ये सार जीवनच अडकून राहणार .

काल कॅन्टीन मध्ये बर्गर खाताना शाळेतील न्याहरी आठवली ,
शाळेच्या हूरहुरीने हि कविता सुचवली.

शाळेतील ती मजा, अजून ठसली आहे माझ्या मनी,
खरंच मित्रांनो ..... निघून जातात ते क्षण अन राहतात त्या फक्त आठवणी..
आंतरजालावरून साभार

Friday, 28 October 2011

दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा........!

 

दिवाळीसाठी सगळ्या पणत्या सजल्या सवरल्या होत्या
त्या एक साधी पणती होती..... तपकीरी रंगाची
ना रंग , ना आकर्षण... बाकीच्या पणत्यांच्या तुलनेत अगदी साधी
दिवाळीच्या दिवशी सगळ्या पणत्या एका जागेवर आणून त्या पेटवल्या
मग सगळ्या पणत्यांना व्यवस्थीतपणे त्यांच्या जागवर रचले गेले...
कुणाला देवघराजवळ, कुणाला तुळशीजवळ, कुणाला रांगोळीत ........
पण त्या तपकीरी पणतीला मात्र घरामागे एक पडलेला भाग होता तेथे नेवून ठेवले
तेथे ना आडोसा होता ना जळते आहे का विझली हे पहायला कुणी...
त्या पणतीला फार वाईट वाटले... तीच्या सोबतच्या पणतया बद्द्ल असूया वाटली..
आपल्या नशीबाचा राग आला तीला.....
ती जळत आहे का उजळत आहे हेचं तीला कळेनासे झाले....
तीथे बाजूला एक केरसुणी होती ती केव्हा पासून पणतीचे निरीक्षण करत होती..
ती म्हणाली " काय झाले " पणतीने सगळी हकीकत सांगीतली
ती राहून तीला म्हणाली " तुला नाही वाटत का तु चुकीचा विचार करत आहे "
"
कसे काय बरं ...?" पणतीने विचारले
केरसुनी म्हणाली " अरे तुझ्या सोबतच्या पणत्या जेथे जळत आहे तेथे त्या जळून काहीचं उपयोग नाही
कारण तेथे उजेड आहे म्हणून त्यांचे वेगळे असे अस्तित्व नाही आहे तेथे ना त्यांची तेथे गरज आहे
पण तु जेथे जळत आहे येथे फक्त तुझेचं अस्तित्व आहे ... खरा प्रकाश तु देत आहे...."
येथे तुझ्या प्रकाशाची गरज आहे ....अरे तु ज्यासाठी आहे तु तेचं करत आहे
तुझा खरा उपयोग होत आहे............. "
पणतीने आसपास पाहीले सारे काही प्रकाशमान होते...
ती हसली आणि परत जळाय ऐवजी आनंदाने उजळून निघाली....
आपले ही असेचं काही असते.........
काय वाटते तुम्हाला ?????????
विचार करा...........
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा........!
तुमचे पण जीवन अंतरीच्या उर्जेने उजळून निघो ......
हिचं सदिच्छा.............!
आंतरजालावरून साभार