गणेश देवता ही इतर देवांहून भिन्न का, वेगळी का, तर याचे एकच उत्तर आहे, की गणेशरूप हे गजमुखी (हत्तीचे तोंड) आहे. या मूर्तीचा उगम वा काहीसे साम्य यक्ष प्रतिमांशी आहे. गणेशमुखाची दंतकथा सर्वांना माहितीची आहे. गणेशरूप म्हणजे ठेंगणा बांधा, तुंदील तनू, आखूड मांड्या, गजमुख हत्तीची सोंड, विशाल गंडस्थळ नजरेत भरते. यापैकी पहिल्या तीनही गोष्टींचा संबंध यक्ष प्रतिमांशी आहे. सर्व यक्षांची तोंडे माणसासारखी नसतात. बैल, घोडा, हत्ती वगैरेंची मुखे त्यांना असतात. अमरावतीच्या (आंध्र प्रदेश) एका उत्थित शिल्पावर (दगडावर) गजमुखी यक्ष कोरलेले आहेत. अशा पद्धतीत गजमुखी यक्षाच्या प्रतिमेत गणेशमूर्तीचे मूळ आहे, असा सिद्धांत डॉ. कुमारस्वामी यांनी मांडला होता. अशा प्रतिमा शृंग, कुषाण काळापासून मथुरा व अमरावती येथे मिळाल्या आहेत.
लक्षणगंधात गणेशाचे चतुर्भुज, षड्भूज, दशभूजा, अष्टादशभूजा वगैरे अनेक रूपांत वर्णन केले आहे. गणेशपुराणात प्रामुख्याने या स्वरूपाची चर्चा आहे. सधारणतः चतुर्भुज गणपती हा लोकप्रिय होता व आहे. द्विभूज गणेशाचे वर्णन वाङ्मयात कमीच मिळते. (कारण देवादिकांना नेहमीच माणसापेक्षा जास्त तरुण, सुंदर, दाढी नसलेले, भरपूर शस्त्र, आभूषणे असलेले, भरजरी वस्त्र, आभूषणांत दाखविलेले असते. त्यांना नेहमीच किमान चतुर्भुज, षड वा अष्टभूजा दाखविले जाते. कारण ते देव आहेत. मानवापेक्षा जास्त सामर्थ्यशाली, बुद्धिमान, वेगळे आहेत. ही प्रतिमा निर्माण व्हावी, हा उद्देश.) मानवरूपात वगैरे दाखवायचे असेल तरच तसे दाखविले जाते. परशू, मुळा ही गणेशाची आयुधे सांगितली आहेत.
आतापर्यंतची गणपतीची सर्वांत प्राचीन मूर्ती मयुरेचीच (उत्तर प्रदेश) असून, ती ठिपकेदार लाल दगडाची आहे. यात प्रथम गणेशप्रतिमा द्विभूजच आहेत. संकिसा (उत्तर प्रदेश) येथील उभा द्विभूज गणपतीच्या डाव्या हातात मोदकाची वाटी आहे. त्यावर सोंड वळसा घालून टेकली आहे. उजव्या हातातली वस्तू ओळखण्यास अवघड आहे.
मथुरा संग्रहालयातील तीन प्रतिमा द्विभूज असून, पोट सुटलेले आहे व सोंडा डावीकडे वळलेल्या आहेत. मोदकपात्र आणि सापाचे जानवेही दिसते. या सर्व प्रतिमा इ.स. तिसऱ्या, चौथ्या शतकातील किंवा त्यापूर्वीच्या आहेत. यानंतर गुप्तकाळातील उदयगिरी (मध्य प्रदेश) अहिच्छत्रा, भीतरगाव, देवगढ, राजघाट (सर्व उत्तर प्रदेश) येथून मिळाल्या आहेत. या दगड व मातीच्या (मृत्तिका शिल्प) माध्यमातून घडविल्या आहेत. यातील मूर्तीमध्ये गणपतीचे हत्तीचे डोके नैसर्गिक आहे. त्यावर मुकुट वा अलंकार घातलेले दिसत नाहीत. अमानवीय मुख असलेल्या देवप्रतिमा मूर्तींना मुकूट घालण्याची पद्धत या काळापर्यंत फारशी रूढ नव्हती. याची अजून काही उदाहरणे म्हणून वराह आणि नृसिंह मूर्तींकडे पाहता येईल. या काळातील (मध्य काळात (पूर्व) सुबत्ता, संस्कृती, वैभव जसे जसे सत्तेकडे वाढले तसतसे देव, गणेश सालंकृत होऊ लागले. सर्व गणेशमूर्ती डाव्या सोंडेच्याच आहेत. त्या सोंड मोदकांवर स्थिरावल्या आहेत.
उदयगिरीचा द्विभूज गणेश असला, तरी या काळात उभे व बसलेले चतुर्भुज गणपती प्रतिमा वाढीस लागल्या. प्रारंभीच्या या मूर्तींत गणेशपरिवार दिसत नाही. गणेश वाहन मूषकही नाही. मात्र, बाजूस लहान आकारातील यक्ष आहेत. उदयगिरी व काबूल (अफगाणिस्थान) येथील गणेस ऊर्ध्वलिंगी आहेत. काबूलच्या प्रतिमेला महाविनायक म्हटले आहे. गुप्तोत्तर काळापासून गणेशप्रतिमांची संख्या व प्रकार वाढले. मध्य काळात काष्ठ, चंदन, पोळे आदींत गणेशमूर्ती दिसतात.
- डॉ. महेश रा. सरोदे

No comments:
Post a Comment