Wednesday, 28 September 2011

२ जी घोटाळा म्हणजे नक्की काय?



२ जी घोटाळा म्हणजे नक्की काय?

स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा म्हणजे तब्बल एक लाख ७३ हजार कोटी रुपयांच्या २जी स्पेक्ट्रम घोटाळ्यासंदर्भात केंद्रील महालेखापालांचा (कॅग) अहवाल मंगळवारी संसदेत सादर झाला. या घोटाळ्याच्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागलेले दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यावरच महालेखापालांनी ठपका ठेवला आहे. पण २-हा घोटाळा म्हणजे काय हे समजून घेण्याचा हा प्रयत्न...


आज आपल्या देशात मोबाइल वापरण-यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लँडलाइनपेक्षाही मोबाइलची संख्या कधीच जास्त झाली असून अजूनही हा आकडा वाढच आहे. या मोबाईल सेवेसाठी मोबाइल कंपन्यांना ठराविक ध्वनीलहरींचे (फ्रिक्वेन्सी) निर्बंध घातलेले असतात. त्या मर्यादेतच (फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम) त्यांना ही सेवा सेवा पुरवावी लागते.

भारतात विस्तारत जाणा-या मोबाइलच्या संख्येमुळे मोबाईल कंपन्यांना घालून दिलेली ध्वनीलहरींची मर्यादा संपुष्टात आली. त्यामुळे सेवेवर विपरित परिणाम होऊ लागले. यामुळेच नव्या ध्वनीलहरींच्या मर्यादा खुल्या करण्याचा निर्णय मनमोहन सिंग यांच्या सरकारने घेतला. ध्वनीलहरींची सेकंड जनरेशन (दुसरी पिढी ) म्हणून याला टू-जी असे ओळखले जाऊ लागले.

यात मोबाईल कंपन्यांना अधिक व्यापक क्षमतेच्या ध्वनिलहरींची मर्यादा उपलब्ध करून देण्यात आली. पण या स्पेक्ट्रम विक्रीच्या प्रक्रियेत नियम, मार्गदर्शक तत्वे आणि कायद्यांची पायामल्ली करण्यात आली. नेहमीच्या सरकारी पद्धतीनुसार त्यासाठी कंपन्यांकडून बोली मागविणे आवश्यक होते. पण माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी या प्रथेला फाटा देऊन ‘ प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य’ या न्यायाने हे स्पेक्ट्रम देऊन टाकले.

या निर्णयाची माहिती गुप्त राहणे अपेक्षित होते. पण त्याऐवजी ती आधीच काही कंपन्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे त्या कंपन्यांना इतर कंपन्यांना काही कळायच्या आतच आपल्या बोली सादर करता आल्या. त्यांच्या बोली आधी आल्या म्हणून ए. राजा यांनी या कंपन्यांना स्पेक्ट्रम वाटले.

याहूनही भयंकर म्हणजे २००८ साली हा ध्वनिलहरी वाटपाचा निर्णय घेताना दूरसंचार कंपन्यांना त्यांनी २००१ सालातले दर आकारले. त्यातही एकदा हे स्पेक्ट्रम मिळाले, की काही किमान काळासाठी तो इतरांना न विकण्याची अट घालणे आवश्यक होते. पण तशी अट घातली न गेल्याने या कंपन्यांनी आपले स्पेक्ट्रम परस्पर इतरांना विकले आणि प्रचंड पैसा कमाविला.

उदाहरणार्थ स्वान टेलिकॉम या कंपनीकडून स्पेक्ट्रमसाठी फक्त एक हजार ५३७ कोटी रुपये घेतले. याच कंपनीने काही महिन्यातच आपला वाटा जवळपास ५ हजार कोटी रुपयांना विकला. युनिटेक टेलिकॉम या कंपनीनेही हेच केले. अवघ्या १४०० कोटी रुपयांना मिळालेला हिस्सा तिप्पट फायदा घेऊन नॉवर्लेजियन कंपनीला विकला.

यामुळे सरकारचे एक लाख ७७ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे..

या गैरव्यवहारानंतर ३ जी साठी मात्र युपीए सरकारने रितसर लिलावाची पद्धत अवलंबली. टाटा, आयडिया, व्होडाफोन, भारती, रिलायन्स, एअरसेल, एसटेल या सात कंपन्यांनी विविध विभागाच्या बोली जिंकल्या. या बोलीतून सरकारला ६ लाख ७७ हजार कोटी रूपयांचा फायदा झाला. पण असा लिलाव २-जीच्या वेळी न झाल्याने हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा ठरला.

-मटा ऑनलाइन टीम 

Tuesday, 27 September 2011

आज तुझी खुप आठवन येतेय

 
 
आई, आज तुझी खुप आठवन येतेय ..........

दोन दिवसां पासून डोकं खुप दुखतय...........
रात्री तुझ्या मांडीवर डोकं ठेउन झोपताना,
तु केलेल्या चम्पी ची खुप आठवन येतेय ..........

आज माझा Result ATKT लागलाय...........
पेपर अवघड गेल्यावर एकटाच बसलेलो असताना,
तु काढलेल्या समजुतीची खुप आठवन येतेय ..........

Room मधे एकटाच बसलो आहे.........
तुझ्या कुशीत शीरून रडताना,
तुझ्या डोक्या वरून फीरनाऱ्या हाताची खुप आठवन येतेय ..........

मेस ची रोजचीच आमटी खातोय..........
खास माझ्या साठी तु मेथीची भाजी केलेली असताना,
दर वेळी दुस्र्याच भाजीचा हट्ट केल्याची खुप आठवन येतेय ..........

कंपनीत जाउन रोज वड़ापाव खातोय..........
साधा क्लासला जरी चाललो असताना,
तु डब्यात दिलेल्या भाजी अणि पोळीची खुप आठवन येतेय ..........

गेले ८ दिवस तेच तेच कपडे वापरतोय........
फक्त दोन तास शर्ट घातलेला असताना,
तु धुवून इस्त्री करून ठेवलेल्या शर्टची खुप आठवन येतेय ..........

हे सर्व रात्री २ वाजता लिहीत असताना,
रात्री तु अंगावर घातलेल्या पांघरुनाची खुप आठवन येतेय ..........

मनमोहन सरकारची कामगिरी.





१) भारतीय इतिहासात सर्वात अधिक आर्थिक घोटाळे करणारे सरकार

२) भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करणाऱ्यावर कारवाई करण्यात सर्वात प्रथम.

३) सर्वात जास्त महागाई याच सरकारच्या काळात जनतेनी पाहिली

४) सर्वात जास्त अतिरेकी लोकांना संरक्षण देणारे सरकार

५) सर्वात जास्त अतिरेकी हल्ले याचं सरकारच्या काळात.

६) राहुल गांधी,दिग्विजय ,मनीष तिवारी, सिब्बल यासारखी मंडळीनी सतत मूर्ख विधाने देऊनही त्याच्यावर काहीही कारवाई नाही.

७) कुठलेही निर्णय न घेता येणारा पंतप्रधान (सर्व निर्णय सोनिया घेतात) भारताने प्रथमच पहिला आणि पुन्हा कदाचित पाहणार सुद्धा नाही.

८) कुठलेही आरोप झाले कि त्याचे खापर विरोधी पक्षावर (भाजपवर) फोडायचे हा त्याचा नियमित उद्योग.

Thursday, 22 September 2011

नवरंग २०११

 

‎शहरात ३२ रु. खर्च करणारी व्यक्ती गरीब नाही

**************************************
एखादी व्यक्ती मुंबईसारख्या मेट्रोसिटीमध्ये राहत असेल आणि दिवसाला किमान ३२ रुपये खर्च करत असेल तर ती व्यक्ती गरीब नाही. हा अजब निष्कर्ष नियोजन आयोगाने काढला आहे सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या एका प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रतिज्ञापत्राच्या अंतर्गत गरिबीची व्याख्या करण्यात आली आहे. एका व्यक्तीसाठी एका दिवसासाठी ३२ रुपये पुरेसे आहे. यात त्याचा खाण्याचा, शिक्षणाचा आणि आजारावरील उपचारांसाठी ३२ रुपये पुरेसे असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे नियोजन आयोगातील अर्थतज्ज्ञांनी तयार केलेल्या या अहवालाला पंतप्रधानांनीही मंजुरी दिली आहे. ज्या शहरांमध्ये ३२ रुपयांत १ किलो साखरही मिळत नाही, १ लिटर पेट्रोलही येऊ शकत नाही त्या शहरात राहण्यासाठी ३२ रुपये पुरेसे आहेत असं सरकारचं मत आहे. जे लोक ३२ रुपये खर्च करु शकतात ते गरीब असू शकत नाही. इतकंच नाही जर व्यक्ती खेड्यात राहात असेल आणि एका दिवसाचा खर्च किमान २६ रुपये असल्यासही ती व्यक्ती गरीब नाही असाही निष्कर्ष नियोजन आयोगाने काढला आहे. याचाच अर्थ एका व्यक्तीला एका दिवसासाठी फक्त २६ ते ३२ रुपयांची गरज आहे असं सरकारचं म्हणणं आहे.
 
योजना आयोगाचं म्हणणं आहे की,
 •एक व्यक्ती एका दिवसात १ रुपया २० पैसे खर्च करुन खाण्याच्या थाळीत वरणाचा बंदोबस्त करु शकतो
•५ रुपये ५० पैसे तांदूळ-गव्हासाठी पुरेसे आहेत
 •२ रुपये ३३ पैसे दूध पिण्यासाठी फार आहेत
 •१ रुपया ९५ पैसे हिरव्या भाज्यांसाठी खूप आहे
•१ रुपया ५५ पैसे खाण्याच्या तेलासाठी पुरेसे आहेत
•४४ पैसे फळांसाठी पुरेसे आहेत
 •७० पैसे साखरेसाठी पुरेसे आहेत
•मीठ-मसाल्यासाठी ७८ पैसे पुरेसे आहेत
 •३ रुपये ७५ पैसे गॅस सिलेंडर किंवा रॉकेलसाठी पुरेसे आहेत
•अभ्यासासाठी ९९ पैसे पुरेसे आहेत
•महिन्यामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी ६१ रुपये ३० पैसे पुरेसे आहेत
•९ रुपये ६० रुपये चप्पल बुटांसाठी पुरेसे आहेत
•घर खरेदी करण्यासाठी किंवा घरभाडं देण्यासाठी ४९ रुपये १० पैसे महिन्यासाठी पुरेसे आहेत.
 
नियोजन आयोगाच्या या अहवालामुळे जर तुम्ही मेट्रो सिटीत राहत असाल तर तुम्ही तुमची पत्नी आणि दोन मुलांवर महिन्याकाठी ३ हजार ८६० रुपये खर्च करत असाल तर तुम्ही श्रीमंत आहात. यापूर्वी प्रतिदिन प्रत्येकी २० रुपये खर्च करणारा व्यक्ती श्रीमंत होता. त्याची मर्यादा ३२ रुपये करून सरकारने जनतेवर उपकारच केले आहेत असंच म्हणावं लागेल.

दोन व्यक्तींमधील संवाद

 
 
एकदा एका साधुने त्याच्या शिष्यांना विचारले, ” आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असेका?”. सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दीले, “रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचीत ओरडून बोलतो.”


यावर साधुमहाराज म्हणाले, ” पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरी सुध्दा आपण ओरडतो।जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो”. यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याच उत्तराने साधुचे समाधान झाले नाही. शेवटी साधुमहाराजांनी स्वतःच उत्तर दीले. ते म्हणाले, ” जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढया आवाजात बोलतात.”


“आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतीशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?” असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले,” कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते.

आणि जसजसे दोन व्यक्ती मधील प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतुनच किंवा देहबोलीतुनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.शिकवण- परस्परांत वाद विवाद आणि भांडण तंटे होतच राहतात मात्र कीतीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढु देउ नका।तसे होउ दील्यास दोन व्यक्तींमधील दरी इतकी मोठी होइल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही….

आंतरजालावरून साभार...

Tuesday, 20 September 2011

ती दिसली.....

 

भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रू बरसले.....

तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....

तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....

खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....

म्हंटल जरा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....

तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली
एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....

कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून
बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....

नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची
रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....

Sunday, 18 September 2011

नसतेस घरी तू जेव्हा....

नसतेस घरी तू जेव्हा....

कॉलेजमध्ये प्रेयसी नजरेसमोर नसेल, तर कलेजा खलास होतो. नव्याच्या नवलाईसारखे लग्नाचे दिवस अनुभवत असताना बायको माहेरी गेली तरीही तीच अवस्था... जन्मजन्मांतरीचं नातं हे असंच असतं... ........

पुढच्या बेंचवर बसली आहे. मी दुसऱ्या रांगेत तिच्या मागे. तिच्या गालावर खळी पडते. मधेच ओढणी सावरते ना, तेव्हा कळ येते रे... लेक्चरभर मी तिच्याचकडे पाहात असतो. क्लास संपवून बाहेर पडताना ती माझ्याकडे पाहून हसते. अधेमधे काहीतरी कारण काढून मागे बघतेच... तीच रे तीच... तिच्याशिवाय जगणंच अशक्य आहे...'

माझ्या एका मित्रानं मला हे ऐकवलं होतं कॉलेजमध्ये जाण्याच्या आधीच! तसंही प्रत्येक मुलाचं हे असं नाहीतर थोडं वेगळं स्वप्न असतंच ना... आपण त्या त्या काळात सुरू असलेल्या सिनेमाचे हिरो आहोत. आपण कॉलेजमध्ये एंट्री मारल्या मारल्या अनेकींची हृदयं उडत उडत आपल्याकडे येणार आहेत, असंही बऱ्याच महाभागांना वाटत असतं. आमच्या ग्रुपमध्ये असाच एक हिरा होता. कोणतीही मुलगी जवळून गेली, की हा म्हणायचा, 'पाहिलंस... कसली जबरदस्त लाइन देत होती मला...' 'अरे माकडा... थोबाड पाहिलंस का स्वत:चं...' हे आम्ही मनात म्हणायचो.

आपण प्रेमात पडावं किंवा कोणीतरी आपल्या प्रेमात पडायचं, असं बहुतेकांना वाटत असतं. ज्यांना यातलं काहीच वाटत नाही, ते पुढे जाऊन ... असो, पुढे जाऊन काय, त्या विषयी प्रत्येकानं कधी ना कधी चर्चा केलेली असतेच! तर, अशी स्वप्नं पाहात पाहात मुलं कॉलेजात येतात, पाच वर्षं राहातात. (काहीजण जास्त काळ... प्रेमच हो...) काहींचं स्वप्न पूर्ण होतं, तर काहींचं अपुरं राहातं. काहीजणांचं काही काळासाठी पूर्ण होतं आणि भाळी येते अश्वत्थाम्यासारखी भळभळणारी जखम... स्वप्नं पूर्ण न होणारे किंवा काहीच काळासाठी होणारे सध्या बाजूला ठेवू. ही जी प्रेमात पडलेली मंडळी असतात ना, ती सध्या आपल्या कामाची आहेत. एकदा का प्रेमात पडलं (दोघंही आणि एकमेकांच्या!) की सारं जगच बदलून जातं यांच्यासाठी. कालपर्यंत मित्रांसोबत शेड्यूल ठरवणारा तो, आता वेगळा वागू लागतो. त्याची प्रत्येक गोष्ट आता तिच्या आवडीनुसार ठरू लागते. तिला हे आवडतं, ते आवडत नाही, नको रे... ती म्हटलीय घरीच जा... हे असं व्हायला लागतं. तो गडी इतका गुरफटतो, की मित्रमंडळी विसरतो... मित्रांसोबतचा दंगा विसरतो... थोडक्यात तो बॅचरल राहात नाही. हे प्रेम जसजसं पुढे पुढे जायला लागतं, तसतशी आणखी गडबड होऊ लागते. ती जर कुठे गावाला वगैरे जाणार असेल, याचा तीन-चार दिवस भेटणार नसेल, तर मात्र गडबड होते. आपला भिडू दोन दिवस आधीपासूनच डिम होतो. मित्रांमध्ये एकच पालुपद सुरू असतं, 'ती भेटणार नाही रे...' मित्रही कंटाळतात; पण हा काही पालुपद सोडत नाही. तीन-चार दिवसांसाठीही मजनू होणं याला मंजूर नसतं. बरं पब्लिक सांगत असतं, की अरे ती नाहीये तीन-चार दिवस, तर आतापासूनच प्लॅन्स आख. बऱ्याच गोष्टी राहून गेल्यात. मागच्या दोन पाटर््यांनाही आला नव्हतास तू. आता चान्स आहे, तर करू एखादी पाटीर्... पण नाही. हा गडी कुठल्यास आमिषांना भुलणारा नसतो. 'तिला काय वाटेल रे... ती गावी गेल्यावर मी पाटीर् केली तर...' असं अखेरचं वाक्य बरेच सारे पॉझेस घेऊन म्हणतो, तेव्हा मित्रांना याला उचलून फेकावंसंच वाटतं...

अखेरीस तो दिवस येतो. ती गावी जाते. निघताना फोन होतो. प्रवासात मेसेजस सुरूच असतात. हा उदास चेहऱ्यानं वावरत असतो. उदास गाणीच ऐकतो. मित्र त्याला सुधारायचं ठरवतात. आपल्या पाटीर्त ओढून नेतात. हा ओढग्रस्तीला लागल्यासारखा चेहेरा करून पाटीर्त जातो. मित्र दंगा करत असतात हा दोन तासापूवीर् घेतलेला पहिलाच ग्लास तसाच हातात घेऊन बसतो. मित्र चिडतात, ओरडतात; पण याचं लक्ष फक्त सेलफोनवर... तिचा मेसेज, तिचा फोन... बास्स...

आता पुढचं दृश्य. दोघांचं लग्न होतं. राजा-राणीचा संसार सुरू होतो. अजूनही दोघं प्रेमात तेवढेच आकंठ बुडालेले असतात. 'तू तिथं मी' अजूनही सुरूच असतं. त्याचं ऑफिसला जाणं, ऑफिसातून येणं... तिचंही ऑफिसला जाणं आणि येणं... मग एवढ्या मोठ्या विरहानंतर एकमेकांना भेटणं... 'तू जेवलास का?' 'तू जेवलीस का?' असे फोन करत राहाणं... हाय... काय दिवस असतात ते... रम्य... (कसे काय तेव्हा असे वागत होतो... हे काही वर्षांनंतरचं...) घरात दोघंच असतील, तर दोघांनी मिळून स्वयंपाक करणं... एकमेकांना वाढणं... एकत्र जेवणं... जेवल्यानंतर गप्पा... (बास...) आणि घरात इतर असतील, तर हे सारं त्यांच्या नजरा चुकवून... एकूण काय ते दिवस फारच भन्नाट आणि फुलपाखरी असतात. (प्रत्येक अक्षरानंतर टिंबं दिली तरी चालतील एवढे भन्नाट!) मग तो दिवस उगवतोच. ती माहेरी जाणार असते. हा पुन्हा आधीपासून उदास. तीही उदास. त्यामुळे घर उदास. हिच्या सूचना सुरू होतात... दूधवाला येईल. दूध कमी सांग. काकूंना पोळ्यांबरोबर भाजीही करायला सांगितली आहे. डबा नक्की ने. वेळेवर जेव. मी फोन करेनच... पण इथं नसेन ना आठवडाभर... काळजी घे हं राजा... (आईशप्पत...) मग तोही उदास उदास बोलतो... तूही काळजी घे. वेळेवर जेव आणि शक्य तितक्या लवकर परत ये... जायलाच हवं का गं? (हाय...) मग तो तिला एसटी किंवा रेल्वे स्थानकावर सोडायला जातो. गाडी निघेपर्यंत हे एकमेकांच्या डोळ्यांत पाहात मूक आक्रोश करत असतात. गाडी सुटते. हा परततो... तसाच उदास उदास... आता घर खायला उठतं. काय करावं सुचत नाही. मित्रांना बोलवावं का... नको, ते घराचा बार करतील आणि तिला ते आवडणार नाही... मग दिवसरात्र फोन, मेसेजेस सुरू राहातात. शेवटी न राहावून हा एक दिवस आधीच सासुरवाडीला जातो आणि तिला एकदाचा घेऊन येतो...

लग्नाला काही वर्ष उलटलेली असतात. संसार वेलीवर एक किंवा दोन फुलंही आलेली असतात. आता याला मित्रांची आठवण येऊ लागते. बऱ्याच दिवसांत आपण कट्ट्यावर गेलेलो नाही. यारदोस्तांशी गप्पा हाणलेल्या नाहीत. पाटीर्ही झालेली नाही, याची त्याला जाणीव होऊ लागते. तीदेखील कातावलेली असते. घर-ऑफिस-मुलं या चक्रात गुरफटून गेलेली असते. 'काडीचाही उपयोग नाही या माणसाचा,' या निष्कर्षापर्यंत ती येऊनही दोनेक वर्ष झालेली असतात. (राजुड्या ते हा माणूस... केवढा हा फरक!) अगदी थोडक्यात सांगायचं, तर दोघंही पक्की संसारी बनलेली असतात. हिनं चिडचिड करावी आणि त्यानं दुर्लक्ष करावं. फोन? ते तर कधीचेच बंद झालेले असतात. शब्दांमधली ती टिंबं टिंबं जाऊन फक्त स्वल्प आणि अर्धविराम उरलेले असतात. मग तो त्याच्या दृष्टीनं सुदिन उगवतो. कोणाचंतरी लग्न किंवा मुलांची सुटी या निमित्तानं ती माहेरी जाणार असते. हा उत्साहानं सारी तयारी करून देतो. बॅगा भरायला मदत करतो. मुलांचंही आवरतो. 'चल लवकर... गाडी सुटेल,' असं ओरडत सगळ्यांना गाडीत घालून, गाडीत बसवून टाटा करून स्थानकाच्या बाहेर पडतो आणि पहिला फोन मित्रांना करतो... 'आज माझ्या घरी रे...' पाटीर् रंगात येते. याचा फोन वाजतो. 'बायकोचा असेल, जरा गप बसा,' हा मित्रांना दामटवतो. तेही अनुभवानं शांत बसतात. 'बरं बरं... हो जेवलो. तुम्ही कसे आहात? मुलं कशी आहेत? पोहोचलात, की फोन करा,' एवढं म्हणून फोन कट करतो आणि पाटीर् सुरू राहाते. दुसऱ्या दिवशी उशीरा उठतो. निवांत आवरतो. बाईंना दोन दिवस सुटी देतो. पूवीर्च्या हॉटेलवर जातो. तिथंच काहीतरी खाऊन ऑफिसला जातो. येताना कट्ट्यावरच थांबतो. वायू प्रदूषणात भर घालतो. तिथूनच कुठेतरी पुन्हा पाटीर् होते. घरी येतो आणि ताणून देतो.

असेच दोन दिवस जातात. यालाही त्या स्वातंत्र्याचा कंटाळा येऊ लागतो. घर खायला उठतं. बायको आणि मुलांशिवाय आपण अपूर्णच आहोत, याची जाणीव होऊ लागते. काय करावं हे सुचत नाही. त्याच्या ती घरी नसल्यामुळे सुटका सुटका झालेला जीव आता तुटका तुटका झालेला असतो. शेवटी रजा टाकतो आणि बॅग उचलून तिच्या माहेरी चालू पडतो. दातात तो दिसल्यानंतर आश्चर्यचकीत झालेली ती आणि तिच्याकडे पाहात राहिलेला तो... विलक्षण सुंदर दृश्य असतं ते... बाकी सारं क्षणांपुरतं. जन्मजन्मांतरीचं असतं ते आपलं नातं हे सत्य त्यांना उमगतं आणि उतरतो तो फक्त आनंद...

- अभिजित थिटे

Friday, 16 September 2011

तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?



तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?

रोज जरी भांडली तरी तुम्हाला आवडते ना हो?


... ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जाता

चकाचक हॉटेलात डीलक्स रूम घेता

नाश्त्यापासून डिनर पर्यंत हाण-हाण हाणता

तरीसुद्धा पोट काही भरत नाही ना हो?

तिच्या स्वयंपाकाची चव येतच नाही ना हो?


काही दिवसांसाठी जेव्हा ती माहेरी जाते

जमेल तेव्हढी तुमची व्यवस्था लावून ठेवते

चार वेळा फोन करून हालहवाल विचारते

रिकाम्या घरात काही केल्या करमत नाही ना हो?

ऑफिस संपल्यावरती घरी जाववत नाही ना हो?


समारंभाला जाण्यासाठी ती भरपूर नटते

तुम्ही तयार होऊन बसता, ती तासभर लावते

पुन्हा पुन्हा विचारते, “मी कशी दिसते?”

कशीसुद्धा असली तरी, सुंदर दिसते ना हो?

तुम्ही “सुंदर” म्हटल्यावरती, गोड लाजते ना हो?


अनेक महिने-दिवसांनंतर तुम्ही मित्रांना भेटता

जुने दिवस आठवून आठवून गप्पांमध्ये रमता

थोड्याच वेळासाठी तुम्ही बायकोला विसरता

तितक्यात येतो फोन आणि तुम्ही पळता ना हो?

मित्र तुम्हाला बायकोचा गुलाम म्हणतात ना हो?


तुमचं पहिलं प्रेम तुम्ही बायकोत पाहता का हो?

तिच्या दोन डोळ्यांमध्ये आरसा दिसतो का हो?

तिचा हात हातात घेताच निवांत होता का हो?

“तिच्याशिवाय तुम्ही नाहीच” असं समजता का हो..??


तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?

तुमची बायकोसुद्धा अगदी अशीच आहे ना हो?


सचिन सावरीकर

ती दिसली.....


भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रू बरसले.....

तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....

तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....

खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....

म्हंटल जरा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....

तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली
एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....

कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून
बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....

नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची
रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....

Thursday, 15 September 2011

शंभूराजे आम्हाला माफ करा.

(संदर्भ:- संभाजी कादंबरीतून)
शंभूराजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही स्वतःचे प्राण वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही, तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही. तिथे तुमचे स्मरण करून साधी दोन फुलही वाहात नाही. पण, मात्र त्या हलकट, नराधम "औरंगजेबाची" कबर आम्ही ईंमाने-इतबार जतन करतोय. त्याच्या कबरेला कुण्या "हिंदू-द्रष्ट्यांने" कलंकित करू नये म्हणून खासे आसणारे आमचे "पोलिस बळ" आम्ही तैनात करतो. ज्या "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी" या मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केले, त्यांचेच तैलचित्र आज आमच्याच सरकारी-कारभारी कचेर्‍यात लावण्यास मज्जाव होतो. ज्या "हिंदूह्रुद्यसम्राट शिवाजी राजांनी" या औरंगजेबाचा अटकेपार बिमोड केला. आज त्याच "शिवाजी राजांच्या" पराक्रमाची गाथा ईतिहासाच्या पुस्तकात आक्षेपहार्य वाटू लागली आहे आमच्या शिक्षण श्रेष्ठींना. इतकेच काय, भारतात संसदेवर हल्ला होतो, मुंबईत अमानुष बॉम्बस्फोट घडतात, अगदी आमने-सामने चकमकी होतात. यात आमचे लाख-मोलाचे खंदे वीर आम्ही गमावले....सर्वांचे पुरावे-आरावे मिळाले....लोकांनी आँखो-देखी कबुली दिली. अफझल गुरूला फाशीची शिक्षा होऊन वर्षे उलटली, पण तो आजही साजूक तुपातली बिर्यानी अगदी मख्खन मारके......पाची बोट चाटीत पुन्हा कारवायांची नांदी खेळतोयच....

Tuesday, 13 September 2011

बच्चो..., बजाव ताली !



ते येतात, गोळ्या झाडतात


आम्हीही मग उचलतो..

आमच्या मोडक्या-तोडक्या बंदुकी

वरचे म्हणतात...

सहिष्णुता पाळा...

बच्चो ..., बजाव ताली !


रक्ता-मांसाचा चिखल,

आसमंतात भरलेले नसते आक्रोश

पायात कडमडणारे तुटक्या बांगड्यांचे तुकडे

आम्ही सांगतो स्वतःला...

'स्पिरीट' पाळा...स्पिरीट !

बच्चो..., बजाव ताली !


मुंबईत तीन स्फ़ोट...

दुसर्‍या दिवशी मुंबईकर कामाला...

आता अजुन एक मेणबत्ती मोर्चा

चौका-चौकातुन लागलेले कट आउट्स

रोजगाराचे नवे साधन.... हुर्रे...

बच्चो...बजाव ताली !


'हिरो'चा वाढदिवस...

IED चे फटाके...

जखमी लोकांचे बेधुंद (?) चित्कार

आजचा बेत चिकन बिर्याणी,

'कसाब' च्या नावानं..........

बच्चो..., बजाव ताली !


बडे बडे शहरोमें छोटी-छोटी बाते(?)

९९% हल्ले थोपवण्यात आलेलं यश(?)

३१ महिन्यात एक (च) हल्ला...

हल्ले तर अमेरिकेवरही होतात!

मग मुंबईचंच एवढं कौतुक कशाला?

बच्चो..., बजाव ताली !


काल स्फोट झाले..

आज वातावरण तप्त आहे

उद्याही स्फोट होतील...

वातावरण अजुन तापेल!

त्यात काय? अजुन एक कविता पाडू...

दोन मिनीटे मौन पाळून श्रद्धांजली वाहू...

जमल्यास शेजार्‍याला निषेधपत्रक पाठवू...

तोपर्यंत...

बच्चो..., रुको मत ! बजाव ताली !!

आपल्याला तेवढंच जमतं नाहीतरी.............

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Saturday, 10 September 2011

तरी दगडाचे भक्त बनू नका?

 
उपास-तापास, नवस आणि जागरणांचा ’सीझन’ आहे. जो तो देवाला खूश करायच्या मागे लागला आहे. कुणी बाबांच्या वाऱ्या करतात, तर कुणी दर्शनाचा अतिरेक करतात. उपासाच्या नावाखाली पोट फाटेस्तोवर उपासाचे पदार्थ खाल्ले जातात. जागृत मानल्या जाणाऱ्या स्थळांवर मोठमोठे नवस मागितले जातात. आवडीच्या गोष्टी सोडणे, मंदिरांना दान देणे, आठवड्यात एक चक्कर टाकणे हे सर्वही त्याचबरोबर सुरू होते. या सर्वांचे कारण एकच - ’स्वार्थ’. काहीतरी हवे, काहीतरी मिळावे म्हणून देवाला याप्रकारे मस्का मारला जातो. असेच भिकाऱ्यासारखे हात पसरत माणूस सारखे काही ना काही मागत राहतो. गाडी, बंगला, चांगली नोकरी... ही यादी संपत नाही. मात्र भीक मागण्यात आयुष्य संपून जाते. आपले कुटुंब, ऑफिसमधील सहकारी, मुले, मित्रपरिवार, नातेवाईक, ग्राहक यांच्या मनाचा, विचारांचा, गरजांचा विचार करायला वेळच उरत नाही. दगडासमोर डोकं टेकण्यात तल्लीन झालेला मनुष्य जिवंत जीवांना विसरून जातो. अशाने देव अजिबात खूश होत नाही. दुसऱ्यांची मने दुखवणाऱ्यांवर देव खूष होईल तरी कसा! घरातल्या देव्हाऱ्यातल्या देवासमोर उभे राहायला दोन मिनिटं नसणारे लालबागच्या राजासमोर सात तास रांगा लावतात. याला भक्ती म्हणत नाहीत. स्वामी विवेकानंदांनी म्हटले तेच  खरे - मनुष्यसेवा ही खरी देवपूजा आहे.


आपल्या अवतीभोवती असलेल्यांची मने सांभाळा, सर्वांशी प्रेमाने वागा, जगावर थोडा विश्वास ठेवा. ही खरी पूजा. चार वाईट लोक भेटले की सगळेच वाईट दिसू लागतात. दोन दु:खद प्रसंग घडले की, नशीब खोटे वाटू लागते. नजर जाईल तिथे खोटेपणा, लबाडी आणि त्रास पाहण्याची सवय होते. मनात कपट, द्वेष, शंका आणि लबाडी ठेवून केलेली पूजा ही पूजा नसून वेडेपणाच आहे. स्वच्छ, शांत आणि प्रेमळ मन हा भक्तीचा पाया, बाकी सगळे नंतर. इमारतीचा चाळीसावा माळा कुणालाही भावेल, पण त्यासाठी पायाही मजबूत हवाच ना. पूजा, उपास, नवस वगैरे आयुष्याच्या इमारतीतला चाळीसावा माळा आहे. अत्यंत देखणा आहे, पण स्वशुद्धीचा पाया आधी नीट बाधुन घ्या. वाईटाने माखलेले मन घेऊन कोणत्याही देवळात गेलात, कितीही उपास केलेत किंवा कोणताही नवस मागितलात तरी पदरी निराशाच येणार. बनवणाऱ्याला चालवता येते, देवाकडे ’करप्शन’ हा प्रकार चालत नाही. तिथे लाच देऊन चांगले आयुष्य घेता येत नाही. तिथे चालते फक्त मनुष्यप्रेमाचे नाणे.

देवाने बनवलेल्या सृष्टिवर व त्याने आकारलेल्या मनुष्यावर प्रेम करणाऱ्यांची इथे हुकुमत असते हे समजून घ्या. देव दगडाचा जरी दिसत असला तरी दगडाचे भक्त बनू नका?

आंतरजालावरून साभार

देव


वार गणेशाचा, रांगा ही लागल्या,

अशा लांब भल्या, दर्शनास.

लांबुनी चालत, गाडीत बसून,

येती भक्त जन, देवळात.

लोक घालविती, तास पाठी तास,

एका दर्शनास, देवाजीच्या.

आतल्या आत, चिडे गणराय,

म्हणे सांगू काय, निर्बुद्धांस.

वेळ हा वाचवा, सचोटीचा धंदा,

ठेवोनीया श्रद्धा, माझ्यावरी.

कर्म न करीता, येता देवळात,

विचार मनात, जगातले.

इथे फक्त माझी, मुर्ती रहातसे,

समजावे कैसे, अडाण्यांस.

देह इथे परी, मन फिरतसे,

लुबाडावे कैसे, दुसर्‍यास.

पाप करोनीया, देता मला लाच,

मनातली बोच, जात नसे.

घालविता वेळ, नासाडता अन्न,

पावेन मी कसा, हाची प्रश्न.

सत्य आचरणा, पुण्य ही होईल,

देवच येईल, पहाण्यांस.

करा दान धर्म, मला नको काही,

एक हाक खरी, मला खूप.

मनास विचारा, मला आत शोधा,

सापडेन खरा, तुमच्यात.

-आंतरजालावरून साभार

Wednesday, 7 September 2011

प्राचीन मूर्तिशास्त्र व विविध गणेशरूपे

मूर्तिशास्त्रानुसार गणेशरूप मोठे आव्हानात्मक व मोहविणारे असे आहे. साधारणतः गणेश पुराण व स्कंद पुराणातील वर्णनाप्रमाणे त्याचे रूप (मूर्ती) व चित्र असते. अर्थात, गुप्तेतर काळात गणेश प्रतिमांची संख्या व प्रकार वाढले. पाषाण, माती (मृत्तिका) याचबरोबर रुईचे (मंदार) खोड, चंदनाची मूर्ती, पोवळे, यासह मध्ययुगात हस्तिदंती, काष्ठशिल्प, आदींसह आधुनिक युगात पारदर्शक काचेच्या मूर्ती, फायबर, प्लास्टिक, तांदळावर कोरलेला आदी अनेक प्रकारात गणेशमूर्ती पाहावयास मिळतात. यासाठी आपण सर्व गणेशभक्तांनी चित्रकार, मूर्तिकार, कलेच्या व मूर्तिकलेच्या विद्यार्थ्यांनी पुण्याच्या सारसबागेतील (तळ्यातला गणपती) गणेश मंदिरामागील 'गणेश दर्शन संग्रहालयाला' जरूर भेट द्यावी. तेथे श्रीगणेशाची शेकडो रूपे आपणास पाहावयास मिळतील.


स्कंद पुराणात (काशी खंड) वानर, सिंह व हत्ती अशा त्रिमुख व पंचमुख विनायकाचा उल्लेख आहे. याच पुराणातील माहेश्‍वर खंडात गणेशमूर्तीचे राजस, सात्त्विक, तामस असे वर्गीकरण येते. पाच तोंडे, दहा हात असलेला गणपती सात्त्विक व चार हातांचा, सोनेरी रंग असलेला राजस आणि निळ्या रंगाचा तामस वृत्तीचा गणेश आहे.

याचप्रमाणे गणेश पुराणात बाल गणपतीचे वर्णन आहे. चार युगांचे चार गणपती यात दिले आहेत. ते पुढीलप्रमाणे :

1) कृतयुगातील गणेश 'विनायक' आहे. तो दशभुजा व सिंहारूढ असतो.

2) त्रेतायुगातील गणेश 'मयुरेश्‍वर' असून, तो सहा भुजांचा मयूरारूढ (मोर) आहे.

3) द्वापार युगातील गजानन चतुर्भुज असून, मूषक (उंदीर) हे त्याचे वाहन आहे.

4) कलियुगातील धूम्रकेतू नामक गणेश मात्र द्विभुज असून, अश्‍व (घोडा) हे त्याचे वाहन आहे.

मध्ययुगाच्या प्रारंभीच्या काळातील ज्ञानेश्‍वरीत संत ज्ञानेश्‍वरांनी सुरवातीलाच गणपतीची वंदना केली आहे. पल्लव, चोल काळातील अनेक गणेशशिल्पे मिळतात.

सातव्या, आठव्या शतकातील थोडक्‍यात गणेशाचे प्रकार पाहूयात :

1) नृत्य गणेश : ब्रह्मपुराणात याचे वर्णन असून, आपल्या नृत्याने गणेशाने शिव-पार्वतीला प्रसन्न करून डोक्‍यावरील चंद्र व इतर आभूषणे व सर्व गणांचे आधिपत्य मिळविले होते. त्रिभंग (गुडघा, कंबर, खांदा- मानेत वाकलेली) अवस्था तोल, लय हे याचे वैशिष्ट्य. पायात घुंगरू व हाती वाद्येही असतात.

2) शक्ती गणेश : थोड्याच (क्वचितच) या मूर्ती (मथुरेत) आहेत. आपल्या शक्तीला (देव) आलिंगन मुद्रेत मांडीवर घेऊन बसलेला या मूर्तीत दिसतो. झाशी (उत्तर प्रदेश) राणी महालात या मूर्ती आहेत. शक्ती (देवीचा) पाय सिंहाच्या पाठीवर ठेवलेला आहे. पुन्हा येथे सिंह हे शक्ती, राजसत्ता याचे प्रतीक आहे.

3) पंचविनायक (गणेश) : स्कंदपुराणातील गजविनायकाचे हे रूप आहे. ओळीने पाच गणपती (शिलापट्टीवर) आहेत. त्यातील एक हत्तीरूपातील (गज) आहे.

4) महागणपती, पंचमुख गणेश : नेपाळी कलेत ही मूर्ती मिळते. पाच सोंडी आणि दहा हात, हे महागणपतीचे लक्षण. चार बाजूंची गजमुखे व त्यावर अजून एक मुख, हे ढोबळ रूप. काशीतील धुंडिराज गल्लीतील बंगालच्या राणी भवानी मंदिरात ही प्रतिमा आहे. ही मूर्ती बरीच आधुनिक आहे.

5) यक्षविनायक : पाच मुखे, पाच दात (सुळे लांब- एकदंत), मधल्या सोंडेच्या दातावर तीन बारीक हत्ती कोरलेले आहेत.

6) राक्षसारूढ गणपती : पंचशुण्डा (सोंड), दशभुजा (बाहू- हात) गणपतीचाच हा प्रकार असून, तो द्विमुखी राक्षसाच्या खांद्यावर बसला आहे. दिल्लीच्या विमल सेठ यांच्या संग्रहात हे दुर्मिळ काष्ठशिल्प आहे.

7) हेरंब गणपती : सिंहावर बसलेला अभय (आशीर्वाद) मुद्रेतील हा गणपती आहे. मुशीगंज (बांगलादेश) येथे तो मिळाला आहे.

याशिवाय बाल गणपती, देवीच्या पायाखाली गजानन वा हस्तिमुख (गजमुख) पुरुष, उच्छिष्ठ गणपती, लक्ष्मी गणपती, ऊर्ध्व गणपती, पिंगल गणपती, भक्ती गणपती असे प्रकार आढळतात.

- डॉ. महेश रा. सरोदे

प्राचीन गणेशशिल्प : शृंग, कुषाण, गुप्तकाळ

 

गणेश देवता ही इतर देवांहून भिन्न का, वेगळी का, तर याचे एकच उत्तर आहे, की गणेशरूप हे गजमुखी (हत्तीचे तोंड) आहे. या मूर्तीचा उगम वा काहीसे साम्य यक्ष प्रतिमांशी आहे. गणेशमुखाची दंतकथा सर्वांना माहितीची आहे. गणेशरूप म्हणजे ठेंगणा बांधा, तुंदील तनू, आखूड मांड्या, गजमुख हत्तीची सोंड, विशाल गंडस्थळ नजरेत भरते. यापैकी पहिल्या तीनही गोष्टींचा संबंध यक्ष प्रतिमांशी आहे. सर्व यक्षांची तोंडे माणसासारखी नसतात. बैल, घोडा, हत्ती वगैरेंची मुखे त्यांना असतात. अमरावतीच्या (आंध्र प्रदेश) एका उत्थित शिल्पावर (दगडावर) गजमुखी यक्ष कोरलेले आहेत. अशा पद्धतीत गजमुखी यक्षाच्या प्रतिमेत गणेशमूर्तीचे मूळ आहे, असा सिद्धांत डॉ. कुमारस्वामी यांनी मांडला होता. अशा प्रतिमा शृंग, कुषाण काळापासून मथुरा व अमरावती येथे मिळाल्या आहेत.


लक्षणगंधात गणेशाचे चतुर्भुज, षड्‌भूज, दशभूजा, अष्टादशभूजा वगैरे अनेक रूपांत वर्णन केले आहे. गणेशपुराणात प्रामुख्याने या स्वरूपाची चर्चा आहे. सधारणतः चतुर्भुज गणपती हा लोकप्रिय होता व आहे. द्विभूज गणेशाचे वर्णन वाङ्‌मयात कमीच मिळते. (कारण देवादिकांना नेहमीच माणसापेक्षा जास्त तरुण, सुंदर, दाढी नसलेले, भरपूर शस्त्र, आभूषणे असलेले, भरजरी वस्त्र, आभूषणांत दाखविलेले असते. त्यांना नेहमीच किमान चतुर्भुज, षड वा अष्टभूजा दाखविले जाते. कारण ते देव आहेत. मानवापेक्षा जास्त सामर्थ्यशाली, बुद्धिमान, वेगळे आहेत. ही प्रतिमा निर्माण व्हावी, हा उद्देश.) मानवरूपात वगैरे दाखवायचे असेल तरच तसे दाखविले जाते. परशू, मुळा ही गणेशाची आयुधे सांगितली आहेत.

आतापर्यंतची गणपतीची सर्वांत प्राचीन मूर्ती मयुरेचीच (उत्तर प्रदेश) असून, ती ठिपकेदार लाल दगडाची आहे. यात प्रथम गणेशप्रतिमा द्विभूजच आहेत. संकिसा (उत्तर प्रदेश) येथील उभा द्विभूज गणपतीच्या डाव्या हातात मोदकाची वाटी आहे. त्यावर सोंड वळसा घालून टेकली आहे. उजव्या हातातली वस्तू ओळखण्यास अवघड आहे.

मथुरा संग्रहालयातील तीन प्रतिमा द्विभूज असून, पोट सुटलेले आहे व सोंडा डावीकडे वळलेल्या आहेत. मोदकपात्र आणि सापाचे जानवेही दिसते. या सर्व प्रतिमा इ.स. तिसऱ्या, चौथ्या शतकातील किंवा त्यापूर्वीच्या आहेत. यानंतर गुप्तकाळातील उदयगिरी (मध्य प्रदेश) अहिच्छत्रा, भीतरगाव, देवगढ, राजघाट (सर्व उत्तर प्रदेश) येथून मिळाल्या आहेत. या दगड व मातीच्या (मृत्तिका शिल्प) माध्यमातून घडविल्या आहेत. यातील मूर्तीमध्ये गणपतीचे हत्तीचे डोके नैसर्गिक आहे. त्यावर मुकुट वा अलंकार घातलेले दिसत नाहीत. अमानवीय मुख असलेल्या देवप्रतिमा मूर्तींना मुकूट घालण्याची पद्धत या काळापर्यंत फारशी रूढ नव्हती. याची अजून काही उदाहरणे म्हणून वराह आणि नृसिंह मूर्तींकडे पाहता येईल. या काळातील (मध्य काळात (पूर्व) सुबत्ता, संस्कृती, वैभव जसे जसे सत्तेकडे वाढले तसतसे देव, गणेश सालंकृत होऊ लागले. सर्व गणेशमूर्ती डाव्या सोंडेच्याच आहेत. त्या सोंड मोदकांवर स्थिरावल्या आहेत.

उदयगिरीचा द्विभूज गणेश असला, तरी या काळात उभे व बसलेले चतुर्भुज गणपती प्रतिमा वाढीस लागल्या. प्रारंभीच्या या मूर्तींत गणेशपरिवार दिसत नाही. गणेश वाहन मूषकही नाही. मात्र, बाजूस लहान आकारातील यक्ष आहेत. उदयगिरी व काबूल (अफगाणिस्थान) येथील गणेस ऊर्ध्वलिंगी आहेत. काबूलच्या प्रतिमेला महाविनायक म्हटले आहे. गुप्तोत्तर काळापासून गणेशप्रतिमांची संख्या व प्रकार वाढले. मध्य काळात काष्ठ, चंदन, पोळे आदींत गणेशमूर्ती दिसतात.

- डॉ. महेश रा. सरोदे

चित्रपटातले गणराय

 

'गणेश चित्रपटां'चं वैशिष्ट्य असं, की त्यांमध्ये बटबटीतपणा नाही. भोळ्याभाबड्या प्रेक्षकांच्या मनामध्ये भोळाभाबडा भक्तिभाव निर्माण करणारे हे चित्रपट आहेत. बहुतेक 'गणेश चित्रपटां'मध्ये गणरायांभोवती कथा गुंफलेली असते, त्यामुळे देवाचं गुणगान त्यांच्यात उगीचच घुसडल्यासारखं वाटत नाही.


चित्रपटाचा नायक सचिनचा गणपतीवर अजिबात विश्‍वास नाही आणि त्याच्या पत्नीचा मात्र प्रचंड विश्‍वास. गणपतीवरच्या अविश्‍वासामुळे सचिनवर अनेक विघ्ने येतात, कारखान्याला आग लागते, पत्नी आजारी पडते. शेवटी त्याची पत्नी त्याला अष्टविनायकांच्या यात्रेला येण्यासाठी भाग पाडते. या यात्रेत एका देवळात ते दर्शनाला गेले असतानाच ते कारखान्याबाबतचे प्रकरण न्यायालयात जिंकल्याची माहिती त्यांचे कुटुंबस्नेही देतात आणि सचिनची मग गणपतीवर श्रद्धा बसते. 'अष्टविनायक' चित्रपटातलं हे दृश्‍य. ते बघून प्रेक्षकांच्याही मनात भक्तिभाव निर्माण होतो. या चित्रपटातलं 'अष्टविनायका तुझा महिमा कसा' हे गाणं तर प्रत्येक गणेशोत्सवात, प्रत्येक मंडळात आणि प्रत्येक घरी वाजलंच पाहिजे, असा अलिखित नियमच आहे. हे मराठीतलं सगळ्यांत मोठं गाणं वेगवेगळ्या लोकगीतप्रकारांवर आधारित आहे. एकूणच मराठीतला खास "गणेश चित्रपट' असं त्याचं वर्णन करावं लागेल; पण हा काही मराठीतला एकमेव "गणेश चित्रपट' नव्हे. गणेशाच्या भक्तीमध्ये अनेक चित्रपट न्हाऊन निघाले आहेत.

एकूणच गणेश हा मराठी चित्रपटांचा अतिशय लाडका देव आहे. हिंदी चित्रपटांमध्ये देवाची संकल्पना, देवाची मूर्ती यांचा अतिशय बटबटीत वापर करून घेतला जातो. शंकराच्या किंवा देवीच्या मूर्तीसमोर नायक किंवा नायिका उभी आहे, विजा कोसळत आहेत, घंटा जोरजोरात हलत आहेत, वाऱ्यानं पानं उडत आहेत, मूर्तीच्या मागे आजूबाजूला निळा प्रकाश आहे आणि नायक किंवा नायिका "आज खूष तो बहोत होंगे तुम' किंवा "मैं आज तुम्हे मनायेबगैर यहांसे हटुंगी नहीं,' असे संवाद म्हणत आहेत, अशी दृश्‍यं आपण या चित्रपटांमध्ये खूप बघितली आहेत. मराठीतल्या "गणेश चित्रपटां'चं वैशिष्ट्य असं, की त्यांमध्ये असा बटबटीतपणा नाही. भोळ्याभाबड्या प्रेक्षकांच्या मनामध्ये भोळाभाबडा भक्तिभाव निर्माण करणारे हे चित्रपट आहेत. बहुतेक 'गणेश चित्रपटां'मध्ये गणरायांभोवती कथा गुंफलेली असते, त्यामुळे देवाचं गुणगान उगीचच घुसडल्यासारखं वाटत नाही. या चित्रपटातले चमत्कार हे हास्यास्पद, अतर्क्‍य नसतात. बऱ्याचदा देव मृत व्यक्तीला जिवंत करतो, महाप्रचंड रूप घेतो, अचंबित करणारे चमत्कार करतो, असं चित्रपटांत दाखवलं जातं. गणेश चित्रपट मात्र त्याला अपवाद आहेत. त्यात चमत्कार अर्थातच आहेत; पण ते अविश्‍वसनीय वाटत नाहीत. देवाच्या चमत्काराबरोबरच अंतरातील देवत्वही जागृत करण्याचं थेटपणे किंवा आडवळणानं त्यात सांगितलं जातं आणि त्यामुळेच ते लोकांना आवडतात.

'गणेश चित्रपटा'मध्ये 'अष्टविनायक' हे सगळ्यांत उत्कृष्ट उदाहरण. सचिननं मराठी चित्रपटात नायक म्हणून पदार्पण केलेला हा पहिलाच चित्रपट. विशेष म्हणजे सचिननं बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटांत दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केलं, त्या 'नवरा माझा नवसाचा'मध्येही गणराय आहेतच. या चित्रपटात विनोद, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचं फार छान संतुलन सचिननं राखलं आहे. 'तू सुखकर्ता' नावाचा अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता. त्यातही नायकाचा 'ब्रेन ट्यूमर'चा रोग गणपती कसा बरा करतो, याची कथा होती. श्रीधर फडके यांच्या संगीतानं तारलेला 'विश्‍वविनायक' नावाचा चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता, मात्र तो तितकासा चालला नाही. प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे आता दिग्दर्शनात उतरले आहेत. 'सिद्धिविनायक' या चित्रपटाद्वारे ते आपल्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीचा श्रीगणेशा करत आहेत. अमिताभ बच्चन सध्या चित्रपट, जाहिराती, जाहीर कार्यक्रम, ब्रॅंड अँबेसिडर अशा अनेक उपक्रमांमध्ये व्यग्र असला, तरी मागे काही काळ त्यानं आपल्या अभिनय कारकिर्दीला विश्रांती दिली होती, तेव्हा तो आणि जया बच्चन या दोघांनी 'अक्का' या मराठी चित्रपटात एका गणपती आरतीद्वारे दर्शन दिलं होतं.

मराठीतील 'गणेश चित्रपटां'ची अशी बरीच उदाहरणं देता येतील. एक मात्र खरं आहे, की देवीचा, विठ्ठलाचा महिमा गाणारे अनेक चित्रपट मराठीत असले, तरी गणराय मात्र अलीकडेच चित्रपटांमध्ये दर्शन द्यायला लागले आहेत. गणपतीवर मराठी माणसाची अपरंपार श्रद्धा आहे, त्यामुळे त्याचे चित्रपटही तो भक्तिभावानं पाहतो. या चित्रपटामुळे त्याला गणपती पावतो की नाही माहीत नाही; पण सगळ्यांशी चांगुलपणानं वागावं, अशी बुद्धी तरी तो नक्की देतो, यात काही शंका नाही!

- मंदार कुलकर्णी

माहितीच्या महाजालातील महागणपती

गणपती म्हणजे साक्षात विद्येची देवता.


ज्याच्यात संपूर्ण ब्रह्मांडातील ज्ञान आणि विज्ञान सामावले आहे.

सर्वार्थाने 'त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि' अशीच.

म्हणूनच या अत्याधुनिक जगात संगणकाची तुलना अनेकदा गणपतीशी केली जात असावी.

...अन्‌ मग इंटरनेटची तुलना कशाशी करायची? गणपतीच्या ज्ञानाशी!

इंटरनेट!

सर्च इंजिनला एखादा शब्द देऊन पाहा.

दुसऱ्याच क्षणी त्याबाबत जगभरात असलेल्या सर्व माहितीचा खजिना घेऊन अनेक वेबसाइट्‌स तुमच्या समोर हजर!

इंटरनेट म्हणजे माहितीचे महाजालच. कोणतीही माहिती, संदर्भ मिळवण्यासाठी पूर्वीप्रमाणे फारशी शोधाशोध करण्याची गरज नाही. जगभरातील सर्व ज्ञान, विज्ञान, माहिती इंटरनेटने घराघरांत पोचविले आहे.

माहितीच्या या महाजालात प्रत्येकाच्या मनामनात वसलेला, हृदयसिंहासनावर विराजमान झालेला गणपतीबाप्पा कुठे आहे? त्यालाच (काही वेबसाइट्‌सवर) शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न.

मराठमोळ्या माणसाला त्याचा असा शोध घ्यायचा असेल तर (तसेच माहिती कमी अन्‌ शोधच जास्त हा प्रकार टाळायचा असेल तर) http://www.ekmev.com/ ला जरूर भेट द्यावी. शेकडो साइट्‌सवर गणपतीविषयी माहिती उपलब्ध आहे; पण ती त्या त्या साइट्‌सवरील अन्य माहितीच्या जंजाळातून शोधून काढावी लागते. http://www.ekmev.com/ साइट मात्र या दृष्टीने "एकमेव' हे वर्णन लागू होणारी आहे. कारण या साइटवर केवळ गणपतीविषयीचीच माहिती आहे. तसेच बहुतेक वेबसाइट्‌सवर एखाददुसऱ्या मुद्द्याविषयी त्रोटक माहिती असते किंवा आपल्याला हवी असलेली माहिती नसते. "एकमेव'वर ती बरीच विस्ताराने आहे. गणपती, त्याच्याविषयीच्या कथा, जन्मकथा, माहात्म्य, त्याची विविध स्तोत्रे, त्याच्या व्रतकथा, पूजाविधी, अष्टविनायक, महाराष्ट्रातील गणपतीची जागृत देवस्थाने, गणेशोत्सव, त्याचे बदलते स्वरूप, ऐतिहासिक महत्त्व व त्याविषयीचे लेखन... अशा विविधांगी मजकुराने ही साइट सजविण्यात आली आहे. 1894 ते 1903 या काळातील "केसरी'तील लोकमान्य टिळकांचे गणेशोत्सवाबद्दलचे काही अग्रलेखही या साइटवर उपलब्ध आहेत. नेपाळ, चीन, श्रीलंका, ब्रह्मदेश, जपान, अफगाणिस्तान, इराण, व्हिएतनाम, रोम, मेक्‍सिको आदी देशांतील गणेशदर्शन या साइटवर घडते. तेथील मूर्ती कशा आहेत, याचीही कल्पना येते. एखाद्या गणेशभक्ताला हवी असलेली बरीचशी आणि इतरत्र उपलब्ध नसलेली माहिती येथे उपलब्ध आहे. मराठीबरोबरच या साइटची इंग्रजी आवृत्तीही आहे.


'लव्हिंग गणेश'
http://www.shreeganesh.com/ ही देखील केवळ गणपतीविषयीच माहिती असलेली इंग्रजीतील वेबसाइट आहे. या साइटचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील "लव्हिंग गणेश' हे ऑनलाइन पुस्तक. या पुस्तकात गणेश देवता, गणपतीचे धार्मिक, वैज्ञानिक, आध्यात्मिक महत्त्व, विविध स्तोत्रे, मंत्र, ओमकाराचे विविध 36 प्रकार (सचित्र), गणपतीचे विविध 32 प्रकार, गणपतीचे अवयव आणि गणपतीशी संबंधित विविध प्रतीकांचे सूचक अर्थ आहेत. गणपती व त्याच्याशी संबंधित शब्दांचा तर त्यांच्या अर्थासह एक छोटेखानी कोशच या साइटवर आहे. वैविध्यतापूर्ण आणि अन्यत्र सहसा न आढळणारी बरीचशी माहिती असल्याने प्रत्येक गणेशभक्ताने आवर्जून भेट द्यावी अशी ही साइट आहे. सोबतीला गणेशाशी संबंधित शब्दांतूनच तयार होणारी काही शब्दकोडी आणि अन्य काही खेळ आहेत. गणेश फोटो गॅलरी आणि गणेश ई-कार्डसही आहेत.

http://en.wikipedia.org/wiki/Ganesh या साइटवर गणपतीविषयी बरीच सखोल, समग्र आणि अभ्यासपूर्ण माहिती आहे. गणेश, गणेशाचे वाहन, त्याला प्राप्त असलेल्या सिद्धी, त्याच्याविषयीची वेगवेगळ्या पुराणांतील माहिती, गणेश चतुर्थी, देवता म्हणून असलेले त्याचे भारतीयांच्या, तसेच अन्य देश आणि धर्मांतील लोकांच्या जीवनातील स्थान, दुसऱ्या देशांतील त्याची देवालये व इतर माहिती, आध्यात्मिक महत्त्व याविषयीची माहिती या साइटवर आहे. जैन धर्म, बौद्ध धर्म (तिबेटमधील बौद्धधर्मीय, शिंतो आणि शिंगॉन बौद्ध आणि जपानमधील बौद्धधर्मीय), आग्नेय आशियातील (थायलंड, बाली, इंडोनेशिया) या देशांतील गणेशाचे माहात्म्य, गणेश स्थाने, मूर्ती व अन्य माहिती या साइटवर उपलब्ध आहे. इंडोनेशिया हा सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येच्या बाबतीत जगातील क्रमांक एकचा देश. तथापि, तेथील लोकांच्या जीवनातही गणपतीला आगळेवेगळे स्थान आहे. या देशातील चलनी नोटांवर चक्क गणपतीबाप्पाची मुद्रा आहे! काही देशांतील गणेशमूर्तींचे नमुनेही या साइटवर असून, जपानमधील कांगिटेन प्रकारातील मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गणपतीविषयी बरीच वैशिष्ट्यपूर्ण आणि सखोल माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासू वाचकांसाठी ही साइट अतिशय उपयुक्त आहे. अन्यत्र न आढळणारी आणि बरीच संशोधनपूर्ण माहिती या साइटवर आढळते.


स्तोत्रे, मंत्र, पूजाविधी आणि वॉलपेपर्सही!

http://www.mahaganapathi.info/ या साइटवरही गणपतीविषयी खूप माहिती आहे. गणपती, त्याच्याविषयीच्या कथा, त्याचे स्वरूप, गणेशोत्सव याव्यतिरिक्त वैदिक, पुराण साहित्यातील त्याच्याविषयीची माहिती या साइटवर पाहायला मिळते. http://www.iloveindia.com/ या साइटवर विविध गणेशमंत्र, त्याची फलप्राप्ती, गणपती चालिसा आणि अर्थासह गणेशाची नावे आहेत. http://surajinfo.com/Ganesha/ या साइटवर गणपतीविषयी विविधांगी माहिती आहे. गणपतीच्या वेगवेगळ्या कथा, स्तोत्रे, गणेशोत्सव याव्यतिरिक्त काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांची माहिती, ई-डेकोरेशन्स, फोटो गॅलरी यासारखे काही नवे प्रकार आहेत. ई-डेकोरेशनमध्ये काही तांत्रिक बाबींचा आविष्कार आहे. http://www.ganeshaonline.com/ ही प्रामुख्याने पेंटिंग साइट आहे आणि गणपतीविषयीची काही आकर्षक पेंटिंग्ज या साइटवर पाहायला मिळतात. www.vishvarupa.com/ganesha-1.html या साइटवरील गणेशाबद्दलची माहिती त्रोटक असली तरी त्यावरील वॉलपेपर्स गॅलरी बरीच समृद्ध आहे. गणपतीचे जवळपास दोनशे विविध आणि आकर्षक वॉलपेपर्स या साइटवर आहेत.

गणपती ही भक्तांच्या हाकेला लवकर धावून येणारी देवता आहे; पण इंटरनेटच्या "बाजारा'त त्याला पाहायला गेल्यास तो हवसे, गवसे आणि नवसे या सर्वांच्याच मदतीला धावून आलेला दिसतो. कारण गणपती माहात्म्य वर्णन करण्याबरोबरच त्याच्याशी संबंधित असलेल्या विविध बाबी, वस्तू यांचे मार्केटिंग करण्यासाठी श्रद्धाळू लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची स्पर्धा करीत असलेल्या वेबसाइट्‌सची संख्या प्रचंड आहे. काही साइट्‌सवर सहज नजर मारली तरी श्री गणेशसिद्धी मंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, महागणपती यंत्र, सरस्वती आणि गणेश यंत्र आदी सोन्या- (अस्सल 24 कॅरेटचा दावा करणारी) चांदीची, गोल्डप्लेटेड यंत्रे, पारद गणेश, पारद लक्ष्मी गणेश यासह विविध धातूंपासून व लाकडापासून बनवलेल्या विविध आकारांतील गणेशमूर्ती, गणेश रुद्राक्ष, गणेशगौरी रुद्राक्ष, गणेश रुद्राक्षमाला, कार्यसिद्धी रुद्राक्षमाला, गणेश शंख, गणेश स्वस्तिक, गणपतीच्या आरत्या, सहस्रनाम, स्तोत्रे, गाणी असलेल्या ऑडिओ-व्हिडिओ सीडीज आणि डीव्हीडीज, तसेच विविध प्रकारची होमहवने, पूजाअर्चा यांची आकर्षक जाहिरातबाजी दिसते. गणपतीविषयी समग्र माहिती एकत्रितपणे देणाऱ्या साइट्‌स तशा मोजक्‍याच आढळतील; पण श्रद्धाळू भक्तजनांच्या खिशावर डोळा ठेवून सुरू करण्यात आलेल्या साइट्‌सची रेलचेल दिसते. http://www.astroshastra.com/, http://www.rudraksha-ratna.com/, http://www.indiayogi.com/, http://www.astroyogi.com/, http://www.shopping.astrolozy.com/, http://www.lordsgalleria.com/, http://www.4indiagifts.info/ आदी साइट्‌सवर बरीच जाहिरातबाजी दिसते. त्यामुळे ग्राहकांनी अधिक चोखंदळ आणि जागरूक असण्याची आवश्‍यकता आहे.

नित्य पूजापाठ, विविध धार्मिक कार्ये ते अतिशय उत्साहाने सार्वजनिक स्वरूपात साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवापर्यंत भारतीयांच्या जीवनात श्रीगणेशाचे स्थान आहे. आरत्या, स्तोत्रे, मंत्रजप, कीर्तन-प्रवचने, गाणी, कथा-पुराणे, विविध पुस्तके या स्वरूपातून आपल्याला त्याची नवनवी ओळख होत जाते. वृत्तपत्रे-टीव्ही वाहिन्या यांचाही याकामी हातभार लागत असतो. अलीकडच्या काळात त्यात भर पडली आहे ती इंटरनेटची! माहितीबरोबरच एक प्रसिद्धी माध्यम म्हणूनही झपाट्याने विकसित होत असलेल्या साधनाची. अन्‌ श्रीगणेशाच्या बाबतीत म्हणाल तर इंटरनेट आपली अजिबात निराशा करीत नाही. जगभरातील वाचकांसाठी त्याच्याविषयीची नवनवी माहिती व न संपणारा माहितीचा साठाच इंटरनेटने उपलब्ध करून दिला आहे. "ब्रह्मभूर्भुवःस्वरोम्‌' अर्थात पृथी, पाताळ, स्वर्ग, अन्‌ एवढेच नव्हे, तर संपूर्ण ओमकाररूपी ब्रह्मांड व्यापले आहे, अशी महती असलेल्या गणरायाने इं?रनेटही व्यापले आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये!

- मारुती राऊत

maruti.raut@rediffmail.com

देवा तूंचि गणेशु


देवा तूंचि गणेशु



ॐकारस्वरूपी गणेश

नवरसांचे सागर भरवीत, साहित्य रत्नांचे आगर निर्माण करीत, भावार्थाचे गिरीवर स्थापन करून साहित्य सोनियाच्या खाणी उघडवित, ब्रह्मरस सुसंवाद घडविणाऱ्या "ज्ञानेश्‍वरी' ग्रंथाच्या आरंभी ॐकारस्वरूपी गणेशाला वंदन करून ज्ञानेश्‍वरीचा वाग्‌प्रपंच संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी उभा केला. श्री ज्ञानदेव म्हणतात -ॐ नमो जी आद्या । वेदप्रतिपाद्या ।


जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।।सर्व विश्‍वाच्या मुळाशी असणाऱ्या, ज्ञानराशिरूप वेदांनी ज्याच्या रूपाचे विस्ताराने वर्णन केले, असा वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या "वेदप्रतिपाद्या' आणि सर्वांच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या, स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या स्वसंवेद्या, आत्मरूपी श्रीगणेशा तुला वंदन असो.


आध्यात्मिक स्वरूप

वेदान्त्यांनी आणि तत्त्वचिंतकांनी गणपतीला वाङ्‌मयाच्या तळाशी आणि नादाच्या मुळाशी नेऊन बसविले आहे. गणपती अथर्वशीर्षात गणपतीच्या आध्यात्मिक स्वरूपाचे सार दिले आहे. "हे गणेशा, तू तत्त्व आहेस, तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस, तू आत्मा आहेस; तू ज्ञानमय आणि विज्ञानमय आहेस. ज्ञान हे स्वरूप आणि विज्ञान हे दृश्‍यरूप होऊनच गणेश ज्ञानविज्ञानमय झाला आहे. गणरायाचे ॐकाररूप मांडताना श्री ज्ञानदेवांच्या मनःचक्षूंसमोर शब्दमय ज्ञान साकार रूपात उभे राहिले. वेद म्हणजे मूर्तिमंत ज्ञान, तर त्या ज्ञानाचे मूर्तिमंत मंगलरूप म्हणजे श्रीगणेश.हे शब्दब्रह्म अशेष ।तेचि मूर्ती सुवेष ।

तेथ वर्ण वपु निर्दोष । मिरवत असे ।


शब्दब्रह्मरूप

विश्‍वरूपवृक्षाचा नामरूपरंगमय विकास आणि विस्तार ॐ या ध्वनिबीजाने होतो. ओंकाराला पदार्थसृष्टीमध्ये आणण्याचे काम गणेशमूर्तीने केले. ज्ञानेश्‍वरीत गणेशाचे हे ॐकाररूप वर्णिले आहे.अकार चरणयुगुल ।उकार उदरविशाल ।

मकार महामंडल ।मस्तकाकारे ।


हे तिन्ही एकवटले तेथ शब्दब्रह्म कवळले ।"अ'कार म्हणजे गणपतीने घातलेले पद्मासन, "उ'कार म्हणजे विशाल पोट आणि "म'कार म्हणजे त्याचे मस्तक. अकार, उकार आणि मकार या तिन्हींचा एकमेळ झाला, की जो "ॐकार' होतो त्यातच सर्व वाङ्‌मयविश्‍व सामावते. तिथे शब्दब्रह्मरूप वेद कवेत मावण्याजोगा होतो.

तत्त्वरूप गणपती

श्री ज्ञानदेवांनी वर्णिलेले गणेशरूप अद्वितीय आहे. ज्ञानदेवांनी तत्त्वरूप गणपती उभा केला आहे. ते म्हणतात चारही वेद हे तुझे शरीर, स्मृती हे शरीराचे अवयव आहेत.स्मृति तेचि अवयव । देखा अंगीकभाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थ शोभा ।त्या स्मृतीतील अर्थसौंदर्याने तत्त्वाचे आणि शब्दांचे लावण्य उभे राहिले आहे. रत्नखचित अलंकाराऐवजी तू अठरा पुराणे आपल्या अंगावर धारण केली आहेस. त्या पुराणातील ज्ञानसाधक तत्त्वांनी तेजःपुंज मौक्तिकांचे आणि रत्नांचे रूप धारण केले आहे आणि छंदोबद्ध शब्द, तसेच त्याचा गर्भित अर्थ, हीच त्या रत्नांची कोंदणे आहेत.

साहित्यशब्द रूप

ज्ञानदेवांनी गणेशाला साहित्यशब्द रूपातही मांडले आहे. ते म्हणतात, उत्तम शब्दरचना हेच गणपतीच्या अंगावरील रंगविलेले वस्त्र आहे. विविध साहित्य रंगांनी आणि नवरसांनी भरलेले ते शब्दवस्त्र गणपती अंगावर अभिमानाने मिरवीत आहे.देखा काव्यनाटका । जे निर्धारिता सकौतुका ।

त्याची रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनी ।काव्य आणि नाटकांनी घागऱ्यांचे रूप धारण केले आहे. त्या काव्य-नाटकरूपी घागऱ्यांच्या क्षुद्र घंटिका रुणझुणताना त्यातून जीवनानंदाचा मधुर ध्वनी उमटत आहे. व्यासादिक आद्य कवींच्या बुद्धिमत्तेचा शेला गणरायाच्या कमरेला झळकत आहे आणि व्यासादिक प्रज्ञावंतांच्या मतीचे पल्लव त्या मेखलेत मिरवीत आहे.

निर्गुण तत्त्वदर्शन

संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी गणपतीचे तत्त्वरूप मांडून निर्गुण तत्त्वदर्शन गणेशाच्या रूपाने सगुणात आणले आहे. ते म्हणतात, चार वेद हे त्याचे शरीर, अठरा पुराणे ही भूषणे, तसेच पातंजल, सांख्य, वैशेषिक, न्यायमीमांसा आणि वेदान्त ही षड्‌दर्शने म्हणजे त्याचे सहा हात आहेत. या षड्‌दर्शनांच्या भुजा विविध मतांच्या आयुधांनी युक्त आहेत.तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।

वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ।।

तर्कशास्त्र हा त्याच्या हातातील फरशु आहे. न्यायशास्त्र हा अंकुश तर वेदांतशास्त्र हा त्याच्या हातातील गोड आणि रसाळ मोदक आहे.

विचारतत्त्व गुणदर्शन

विचारतत्त्वाचे गुणदर्शन म्हणून ज्ञानदेव गणरायाकडे पाहतात. ते म्हणतात, गणरायाचे सर्व अवयव हे अक्षरविचारतत्त्वांचे रूप आहे. अतिनिर्मळ विचार ही त्याची सरळ सोंड आहे आणि ती जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ।गोड अशा वेदांताच्या मोदकाकडे झुकली आहे. विवेकाच्या सरळ शुंडादंडावर महासुखाचा परमानंद उसळत आहे. "संवाद' हाच गणरायाचा विशाल दात आहे. आणि समता ही त्या दातांची शुभ्रता आहे. श्रद्धा आणि बुद्धीचे प्रतीक असणारे दोन दात दुरूनही चकाकत आहेत. उन्मेष हेच त्या गणरायाचे सूक्ष्म नेत्र आहे. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे त्याचे दोन कर्ण आहेत. आणि कोणताही विचार पाखडून स्वीकारण्यासाठी त्याने सुपाएवढे कान धारण केले आहेत.

तत्त्वानंद रूप

संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवताच्या आरंभी गणरायाचे तत्त्वानंद रूप उभे केले आहे. ते म्हणतात -

हरुष हे वदन गणराया । ऱ्ही पुरुषार्थ त्याची चाऱ्ही भुजा ।हे गणराया, मूर्तिमंत आनंद हेच तुझे मुख आहे. चारी पुरुषार्थ हे चार हात, तर प्रकाशवंतांना प्रकाश देणारा, तो तुझा चमकणारा दात आहे. तुझ्या मुखामध्ये परा, पश्‍यन्ति, मध्यमा आणि वैखरी या चार वाणी हात जोडून उभ्या आहेत. सकल सृष्टी आत्मरूपाने दिसणारी तुझी दिव्य आणि सुखसंतुष्ट दृष्टी आहे. शुद्ध सत्त्वाचे सुंदर शुभ्र वस्त्र तू नेसला आहेस. तू आपल्या हाताने हर्षाचे मोदक होऊन सर्वांना तृप्त करतोस. फार काय सांगावे, तुला जो पाहतो त्याचा संसार सुखाचा होतो.तुज देखे जो नरु । त्यासी सुखाचा होय संसारू ।।

नादरूप गणेश

समर्थ रामदास स्वामींनी गणपतीच्या तत्त्वाबरोबर त्याचे नादरूपही उभे केले आहे. समर्थ म्हणतात, गणपती हा चौदा विद्यांचा स्वामी असून, लहान डोळे हलवीत आणि लवलवीत कान फडकावीत जेव्हा गणराय येतो, तेव्हा मूर्तिमंत संगीतच अवतरले जाते.नट नाट्य कळा कुसरी । नाना छंदे नृत्य करी ।

टाळ मृदुंग भरोवरी । उपांग हुंकारे ।।त्याच्या पायांतली नूपुरे रुणझुण वाजतात आणि पायांच्या ठेक्‍याने सुंदर पदन्यास उभा राहतो. हावभाव आणि कलाकौशल्य यासह नर्तन रंगू लागते. टाळ-मृदुंगाची साथ मिळते. नाद, सूर, ताल, स्वर आणि तत्त्व यासह जेव्हा गणपती नर्तन करू लागतो, तेव्हा ईश्वरी सभा शोभायमान होते. त्याचे हे दिव्य ईश्‍वरी नर्तनच कीर्तन ठरते.

आदिबीज आणि निर्गुणाचा मुळारंभ

श्री गणपती ही विद्येची देवता आहे. कलेची देवता आहे. तशीच ती सारस्वताची देवता आहे. गणेश हा गणांचा ईश आहे. समूहमनाचा देव आहे. मानवी मनाच्या श्रद्धेला फुटलेला पहिला अंकुर आहे.संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी त्याला "आदिबीज' म्हणून स्वीकारले आहे, तर समर्थांनी त्याला "निर्गुणाचा मुळारंभ' म्हटले आहे.देवा तूंचि गणेशु । सकल मति प्रकाशु ।वैदिक वाङ्‌मयापासून संतरचनेपर्यंत आणि सूक्तांपासून लोककलेच्या गणापर्यंत वावरणाऱ्या गणेश देवतेने दैवत युगांच्या प्रवासात नाना स्थित्यंतरे पावत विद्वानांपासून, प्रज्ञावंतांपासून, कलावंतांपासून सामान्य जनांच्या भावभावनांच्या गाभाऱ्यातही अढळ स्थान मिळविले आहे.

- डॉ. रामचंद्र देखणे

Friday, 2 September 2011

This has to be the Mother



"मी जवाबदार आहे ह्या महाराष्ट्राच्या भविष्याचा..."

 
म्हणा....


"मी जवाबदार आहे ह्या महाराष्ट्राच्या भविष्याचा..."


खूनी, दरोडेखोर हे तुम्हाला खासदार-आमदार म्हणून चालतात.... पण एखादा प्रामाणिक मराठी माणूस राजकारणात असेल तर तुमचं पित्त खवळते.... ह्या देशात म्युनिसिपालीटित नोकरी करणारा शिपाई देखील बारावी पास लागतो पण राज्याची धुरा सांभाळणारा राजकारण्यांना शिक्षणाची अट नाही....एके ठिकाणी साक्षरते च्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे निर...क्षर उमेदवाराला लोकशाहीच्या नावाखाली सुत द्यायची. ह्या सगळ्याची चिड न येण्याइतके क्षन्य आहोत का आपण...???

राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा हे आपण मान्यच केलेले आहे पण राजकारण हा बदमाशांचा अड्डा कोणामुळे झाला याचा विचार केलाय...??... राजकारणी चोर, लाचखाऊ, भ्रष्टाचारी, उन्मत्त असे आपणच ओरडणार आणि पुढल्या खेपेला आपणच त्यांना निवडून देणार...

मतदानाच्या दिवशी काहीजण मतदान करत नाहीत. निवडणुकीची सुट्टी holiday म्हणून साजरी करतात आणि त्याचा फायदा घेउन हे राजकारणी पैसे आणि बोगस मतांचा जिवावर पुन्हा.... पुन्हा पाच वर्ष आपल्याला लुबाडायला मोकळे होतात....

प्रत्येक नगरसेवक, आमदार, खासदार हे तुमच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला बांधील आहेत पण आपल्यापैकी कितीजण त्यांना त्यांच्या कृत्याचा जाब विचारतात...???

का नाही आपण त्यांना विचारात की बाबा "तुमची भूक तरी किती..?? किती खाल...??"

अहो कळत नाही का तुम्हाला.... काढून-काढून गाईचे दूध संपेल पण हे तर आता बैलाच दूध काढत सुटलेत....


कोथिंबीरिची जुडीसुद्धा पारखून घेणारे आपण राजकारणाच्या बाबतीत इतके गाफील का...??

ऐरा-गैराच्या हातात सत्ता देऊन मुर्दाडा सारख गुडघ्यात माना घालून स्वतःच्याच मुलाखत परक्यासारख जगण्यासाठी जन्माला आलो आहोत का आपण...???

एकच सांगतो "जागे व्हा"... अजून ही वेळ गेलेली नाही...


आपल्‍या मनाशी पक्कं करा... मतदान हा हक्क बजावायचाच...!!!


उमेदवार निवडताना त्याच शिक्षण, त्याची निष्ठा, त्याची प्रामाणिकता, त्याची सामाजिक जाणीव हे सगळ तपासून बघा...तुमचं मत अमूल्य आहे...ते देताना नीट विचार करुन द्या....आणि मग बघा तुम्हालाच तुमच्या शक्तीचा अंदाज येईल...


हे सगळे बदल लगेच घडणार नाहीयेत.... पण मला शंभर टक्के खात्री आहे आपण आज पाऊल उचलले तर येत्या काही वर्षातच आपल्‍या राज्याचा आरोग्यमंत्री एक डॉक्टर असेल... अर्थमंत्री एक अर्थशास्त्र तज्ञ असेल.... आणि क्रीडामंत्री एक खेळाडू असेल....


समर्थांनी महाराजांच वर्णन केलं होतं "निश्चयाचा महामेरु".....


तो आता आपण प्रत्येकात जिवंत करूया....

म्हणा....
"मी जवाबदार आहे ह्या महाराष्ट्राच्या भविष्याचा..."

"गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा..."

लालबागचा राजा

तुम्ही कोण आहात ?


.... हि आहे दोन गाढवांची गोष्ट !

एका धोब्याकडे दोन गाढवं होती.
आपण त्यांना गाढव 'अ' आणि  गाढव 'ब'  असे म्हणू ....

गाढव 'अ' अतिउत्साहि होते. आपण किती काम करतो, किती मेहनती आहोत असा सतत आव आणायचं ! धोब्याने आपल्याकडे सतत लक्ष्य द्यावे, आपल्याच पाठीवर शाबासकीची थाप मारावी म्हणून सतत वेगात चालायचे. जास्तीत जास्त ओझे पाठीवर लादून घ्यायचे.
गाढव 'ब'  त्या मानाने जरा भोळसटच होते. धोब्याच्या पुढे पुढे करणे त्याला  काही जमायचे नाही. तशी गरजहि वाटायची नाही. धोबी आसपास असो नसो ते त्याच्याच वेगात चालायचे. शिस्तीत काम करायचे.
हळूहळू या दोन गाढवान मधला फरक धोब्याच्या लक्ष्यात यायला लागला. एक गाढवं वेगाने चालतंय. जास्तीत जास्त ओझे पाठीवर घेतय. दुसरे मात्र त्याच्या तुलनेत मागं पडतंय. धोबी 'अ' गाढवाचं कौतुक करायला लागला . 'ब' गाढवाला मात्र रट्टे बसायला लागले. त्याची सतत 'अ' शी तुलना व्हायला लागली. हि  अनाठाई स्पर्धा 'ब' गाढवाला काही कळेना. शेवटी एकदिवस  तो 'अ' गाढवाला भेटला. त्याला म्हणाला मित्रा येथे आपण दोघंच आहोत. उगाच कशाला एकमेकांशी स्पर्धा करायची. त्यापेक्ष्या आपण ओझे वाटून घेऊ, उगाच मरमरून धावण्या पेक्ष्या शांतपणे पुढे जाऊ. एकमेकांनाच मागे टाकण्यात कसले आलंय यश?
पण याचा परिणाम उलटाच झाला. 'अ' ला वाटायला लागल, याच्यात काही  दम नाही. हा आपल्याला घाबरला. आपण पुढे जातोय म्हणून याच्या पोटात दुखतंय. आता जीरउच याची !
म्हणून  'अ' गाढव जास्त वेगाने चालायला लागले. जास्त ओझे पाठीवर घ्यायचा आटापिटा करायला  लागलं.
धोबी  त्याच्यावर जाम खुश होता. पण 'ब' ची  धीमी गती पाहून त्याचा पारा चढायचा. त्याने 'ब' गाढवाला चोपायला सुरवात केली. 'ब' नेही आपला वेग वाढवला. पण त्याची दमछाक होत होती. इकडे 'अ' ला आणखीनच चेव चढला. 'ब' मागे पडतोय. धोबी आपल्याला शाबासकी देतोय या आनंदात ते धावत होते. धावतच होतं. गाढव 'ब' या धावण्यात पुरते खचले आणि एक दिवस कोसळले. 'ब' गाढव मेल.
'अ' बोजा उचलतोय म्हणून धोबी त्याच्या पाठीवर आता 'ब' च्या वाटेचे  ओझेही ठेवायला लागला. आपण कसे थोर, 'ब' कसा पुरता संपला या नादात 'अ' च्या अंगात हत्तीचे बळ संचारले. तो उत्साह पाहून धोब्याच्या  त्याच्याकडून अपेक्षाहि प्रचंड वाढल्या.
पण हे बळ फार काळ काही टिकल नाही. क्षमतेपेक्षा चौपट ओझे पाठीवर घेउन 'अ' गाढवाच्या पायातले त्राण जायला लागले. प्रयत्न करूनही  त्याला आता धोब्याच्या अपेक्षे प्रमाणे काम करणे काही जमेना. धोबी संतापला. कालपर्यंत तुफान काम करणारं गाढव आता मंदावायला लागल्याने धोब्याने त्याला बदडायला सुरवात केली. मात्र जीवापाड प्रयत्न करूनही 'अ' गाढवाला पूर्वीसारखे काम होईना.
धोबी जाम वैतागला. संतापला. त्याला मार मारून दमला. शेवटी हे गाढव कामचुकार झालंय असे समजून त्याने 'अ' गाढवाची खाटिकखाण्यात रवानगी केली.
आणि नवीन गाढव विकत घ्यायला बाजारात रवाना झाला.

तात्पर्य :-

१) कॉर्पोरेट जगात काम करताना, करियरसाठी जीवाचं रान करून राब राब राबताना आपल्या सहकार्यांना कमी लेखू नका. ते त्यांचा कामाचा वाटा  उचलत असतात, म्हनुनच तुमच्या वाट्याला तुमच्या लायकीचे काम येते हे विसरू नका. त्यांना मागे खेचायला जाल तर तुम्ही खड्यातच पडाल.

२) साहेबाच्या कितीही पुढे पुढे केलंत तरी शेवटी त्याच्या दृष्टीने तुम्ही काम काय करता. किती रिझल्ट देता हे महत्वाचं. सहकार्यांना डिवचण्यासाठी बॉसची ढाल करू नका.

३) तुम्ही 'अ' गाढव आहात का 'ब' गाढव आहात याला बॉसच्या लेखी काही किमत नाही. त्याचा लेखी तुम्ही फक्त एक 'गाढव' आहात हे विसरू नका.

४) आणि सगळ्यात महत्वाचे गाढवपणा करत ढोर मेहनत करून अनाठाई कष्ट करू नका. त्यापेक्ष्या तुमचे काम उत्तम आणि अधिक गुणवत्तेचे कसे होईल, हे बघा.

नेव्हर वर्क हार्ड, वर्क क्लेवरली !

एक लेखक