काशकंदील आणि पणत्या!
आली दीपवाली गड्यांनो, आली दीपवाली रोज रोज शाळा, पुरे ती, आला कंटाळाचार दिवस आता, मनाला कसली ना चिंता काय दोस्तांनो, आवडल्या का या ओळी? तुमच्या मनातही अगदी अस्सेच विचार असतील ना? कारण तुमच्याप्रमाणेच, मोठ्यांनाही आवडणारी ही दिवाळी आता जवळ आलीय. काही शाळांना तर दिवाळीच्या सुट्याही लागल्या असतील. सुटीतले तुमचे "प्लॅन्स'' तयार असले तरी आज आपण घरच्या घरी आकाशकंदील तयार करायला शिकू. त्यासोबत, घर सजवण्यासाठी शोभेच्या आकाशकंदिलांचं तोरण, रांगोळीचे सोपे प्रकार आणि पणत्या रंगवायलाही शिकू.
दिव्याचा आकाशकंदीलबाजारात मिळणारे विविध रंगांचे आणि आकाराचे जंबो आकाशकंदील बघून तुम्हीही हरखून जात असाल. पण आपणही असा भला मोठा रंगीत आकाशकंदील घरच्याघरी तयार करू शकतो. तोही अगदी सोप्या पद्धतीनं! आश्चर्य वाटलं ना? पण हे अगदी खरं आहे. आकाशकंदील तयार करून त्यात दिवा लावला की झालं तुमचं काम! हा आकाशकंदील म्हणजे, स्वस्तात मस्तच म्हणा ना!
साहित्य - पतंगाचे दोन वेगवेगळ्या रंगाचे कागद (काईट पेपर), सोनेरी कागद, कार्डबोर्ड पेपर.


साहित्य - पतंगाचे दोन वेगवेगळ्या रंगाचे कागद (काईट पेपर), सोनेरी कागद, कार्डबोर्ड पेपर.
कृती - 1. पतंगाचे दोन वेगवेगळ्या रंगांचे कागद घ्या. शक्यतो, केशरी आणि जांभळा, लाल आणि पिवळा किंवा गुलाबी आणि हिरवा असे विरुद्ध रंगांचे कागद घ्या. त्यामुळे आकाशकंदील जास्त उठावदार दिसेल. आपण उदाहरण म्हणून लाल आणि पिवळ्या रंगांचे कागद घेऊ.
2. या कागदांचे 18 सेंटिमीटर बाय 18 सेंटिमीटर आकाराचे 18 ते 20 चौरस कापून घ्या. त्यापैकी निम्मे पिवळे तर निम्मे लाल रंगाचे घ्या.
3. चौरस तिरका हातात धरून समोरासमोरची टोकं जुळवून चिकटवून घ्या. त्यामुळे कागदाचा पोकळ त्रिकोण तयार होईल.
4. या प्रत्येक त्रिकोणाच्या चिकटवलेल्या टोकांवर सोनेरी कागदाचा लहान चौकोन चिकटवा. अशा प्रकारे सगळे त्रिकोण तयार करून घ्या.
5. त्यानंतर 50 सेंटिमीटर बाय 25 सेंटिमीटर आकाराचा कार्डबोर्ड पेपर घ्या. या आयताकृती कागदाच्या तीन बाजूंनी पाच सेंटिमीटर जागा सोडा. मधला आयत कात्रीनं कापून टाका. या तयार झालेल्या तीन पट्ट्यांच्या फ्रेमवर आपण आधी तयार करून ठेवलेले त्रिकोण चिकटवणार आहोत.
6. त्याआधी या फ्रेमवर एक पातळ आयताकृती पांढऱ्या रंगाचा पतंगाचा कागद चिकटवा.
7. आकाशकंदिलाच्या खालच्या बाजूस झिरमिळ्यांसाठी दोन सेंटिमीटर जागेची पट्टी रिकामी सोडा.
8. सर्व त्रिकोण एका सरळ रेषेत गोलाकार चिकटवा. त्रिकोणांच्या खालच्या बाजूस चित्रातल्याप्रमाणे सोनेरी पट्टी चिकटवा.
9. पतंगाच्या कागदाच्याच उभ्या झिरमिळ्या कापा आणि सोनेरी पट्टीखाली कंदिलाच्या आतील बाजूने चिकटवा.
10. आकाशकंदील अडकवण्यासाठी वरील बाजूस मोठा दोरा बांधा.
शोभेचा आकाशकंदीलसाहित्य - मेटॅलिक कागद (चकचकीत कागद), सोनेरी कागद, कात्री
शोभेचा आकाशकंदीलसाहित्य - मेटॅलिक कागद (चकचकीत कागद), सोनेरी कागद, कात्री
कृती - 1. या कंदिलातून प्रकाश आरपार पोचत नाही. त्यामुळे या कंदिलात बल्ब लावता येणार नाही. आपण याला शोभेचा आकाशकंदील म्हणू.
2. या कंदिलाची कृती दिव्याच्या आकाशकंदिलाप्रमाणेच आहे. फक्त आकार छोटा करण्यासाठी रंगीत चौरसांची लांबी आणि रुंदी 5 सेंटिमीटर ठेवा.
3. कार्डबोर्ड पेपरची फ्रेम करण्याऐवजी 16 सेंटिमीटर द 8 सेंटिमीटर आकाराचा एक आयत कापून घ्या. या आयतावरच मेटॅलिक कागदाचे त्रिकोण करून चिकटवा की चित्रात दाखवल्याप्रमाणे शोभेचा आकाशकंदील तयार होईल!
आकाशकंदिलांचं तोरणसाहित्य - दोन ते तीन विविध रंगांच्या घोटीव कागदांचे 12 सेंटिमीटर द 12 सेंटिमीटर आकाराचे चौरस, सोनेरी कागद, सोनेरी दोरा
आकाशकंदिलांचं तोरणसाहित्य - दोन ते तीन विविध रंगांच्या घोटीव कागदांचे 12 सेंटिमीटर द 12 सेंटिमीटर आकाराचे चौरस, सोनेरी कागद, सोनेरी दोरा
कृती - 1. चौरसाकृती कागदाचा मध्य काढून चारही कोपरे मध्यबिंदूपर्यंत दुमडा.
2. घडी उलटी करून पुन्हा चारही कोपरे मध्यबिंदूपर्यंत दुमडा.
3. तयार घडी उलटी करा.
4. चारही कोपरे पुन्हा मध्यबिंदूपर्यंत दुमडा.
5. तयार घडी उलटी करा.
6. वरचा आणि खालचा असे दोन कोपरे आतून उलगडा, म्हणजे आकाशकंदील तयार होईल!
7. असे 15 ते 16 आकाशकंदील तयार करून सोनेरी दोऱ्याला स्टेपलरच्या पिनांनी जोडून टाका.
कागदी पणत्यासाहित्य - पिवळा, लाल आणि हिरव्या रंगाचे घोटीव कागद, सोनेरी कागद, डिंक, कात्री.
कागदी पणत्यासाहित्य - पिवळा, लाल आणि हिरव्या रंगाचे घोटीव कागद, सोनेरी कागद, डिंक, कात्री.
कृती - 1. चौरसाकृती घोटीव कागद घेऊन त्याच्या समोरासमोरील बाजूस सोनेरी कागदाची पट्टी लावा.
2. चौरसाच्या बारीक उलट-सुलट घड्या घालून पंखा तयार करून तो उलगडा. आणि पंख्याच्या दोन्ही बाजू एकमेकांवर चिकटवा.
3. ज्योत तयार करण्यासाठी पिवळा चौरसाकृती कागद घ्या. या चौरसाचा एक कोन पकडून बारीक घड्या घाला.
4. मध्यभागी कात्रीनं कापा म्हणजे दोन ज्योती तयार होतील. ज्योत पणतीवर चिकटवून टाका.
आकर्षक पणत्यातुम्हीही सुंदर पणत्या रंगवू शकता. त्यासाठी मातीच्या नक्षीदार पणत्या आणा. या पणत्या एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी रंगवा. म्हणजे तेल खाली गळणार नाही. वॉटर कलर किंवा ऑईल कलर्सनी तुम्ही या पणत्या रंगवू शकता. त्यावर छोट्या टिकल्या चिकटवल्यात तर पणत्या जास्तच सुंदर दिसतील
आकर्षक पणत्यातुम्हीही सुंदर पणत्या रंगवू शकता. त्यासाठी मातीच्या नक्षीदार पणत्या आणा. या पणत्या एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी रंगवा. म्हणजे तेल खाली गळणार नाही. वॉटर कलर किंवा ऑईल कलर्सनी तुम्ही या पणत्या रंगवू शकता. त्यावर छोट्या टिकल्या चिकटवल्यात तर पणत्या जास्तच सुंदर दिसतील
आली दिवाळी गड्यांनो... कविता पोस्ट करावी
ReplyDelete