Sunday, 11 November 2012

"सुखी रहा"

"सुखी रहा"

cid:image001.gif@01CD8C17.5FCE8980


परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला 
"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला 
"उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला" 
मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला" 
"तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस? 
मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस?" 
"मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक 
तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक" 
"इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो 
भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो" 
"काय करू आता माझ्याने manage होत नाही 
पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत" 
"immigration च्या requests ने system झालीये hang 
तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग" 
"चार-आठ आणे देऊन काय काय मागतात 
माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात" 
"माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation 
management च्या theory मध्ये मिळेल तुला solution" 
"M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे? 
Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे?" 
"असं कर बाप्पा एक Call Center टाक 
तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक" 
"बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको 
परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको" 
माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला 
"एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला" 
"CEO ची position, Townhouse ची ownership 
immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship" 
मी हसलो उगाच, "म्हटलं खरंच देशील का सांग?" 
अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग? 
"पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं 
सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं" 
"हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव 
प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव" 
"देशील आणून मला माझी हरवलेली नाती? 
नेशील मला परत जिथे आहे माझी माती?" 
"इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं 
आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं?" 
"कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गर्जार 
भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार" 
"यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान 
देशील का रे देवा, यातलं एक तरी दान?" 
"तथास्तु" म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला सारं हाताबाहेर गेलंय पोरा, "सुखी रहा" म्हणाला..... 

Saturday, 15 September 2012

समर्थांनी शिवाजी महाराजांना लिहिलेले एक पत्र

http://keshuji-kbj.blogspot.in/


समर्थांनी शिवाजी महाराजांना लिहिलेले एक पत्र

समर्थांनी शिवाजी महाराजांना लिहिलेले एक पत्र. यात ते अफजल खान विजापूरहून स्वारी करण्याकरता निघत असल्याची स्पष्ट सूचना देतात.

विवेके करावे कार्यसाधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूढिल भविष्यार्थी मन ।
रहाटोची नये ।। १ ।।

चालू नये असन्मार्गी ।
सत्यता बाणल्या अंगी ।
रघुवीर कृपा ते प्रसंगी ।
दास महात्म्य वाढवी ।। २ ।।

रजनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।। ३ ।।

आदिमाया मूळ भवानी ।
हे सकल ब्रम्हांडांची स्वामिनी ।
येकान्ती विवेक करोनी ।
इष्ट योजना करावी ।। 4 ।।

(पत्राच्या प्रत्येक ओवीचरणाचे अद्याक्षर घेतल्यास 'विजापूरचा सरदार निघाला आहे' ही सुचना मिळते.) खान निघाल्याची खबर देणारे हे पत्र असा इतिहासाचा भाग काही काळ बाजुला ठेवून जर ह्या ओळी पाहिल्या तर आपल्यापैकी प्रत्येकालाच एक वेगळा संदेश, उपदेश देणारे असे हे चरण आहेत असे जाणवते..

मद, मोह, मत्सरादी षड-रिपूंचे हे खान आपल्यावर नेहमीच चाल करुन येण्यास सज्ज असतात.. आपल्यातच वास करुन असतात. अन संधी मिळताच आपल्याच सद्सदविवेकावर घाला घालतात. आपल्यातल्याच सद्गुणांच्या मंदिरांचे कळस मोडून टाकतात.

उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणे

http://keshuji-kbj.blogspot.in/
 उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणे

उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणे
१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती के॑द्र, लोणावळा
३) मामलेदार , ठाणे
४) मूनमून मिसळ, डो॑बिवली
५) संजिवनी- माडिवालेकॉलनी, टिळक रोड
६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड
७) श्री- शनिपारा जवळ
८) नेवाळे- चिंचवड
९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी.
१० ) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.
११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन
१२) जुन्नर बस स्थानक.
१३) फडतरे, कलानगरी.
१४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर
१५) गोखले उपहार गृह, ठाणे
१६) भगवानदास, नाशिक
१७) फडतरे मिसळ कोल्हापुर
१८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे
१९) प्रकाश , दादर
२०) दत्तात्रय, दादर
२१) वृंदावन, दादर
२२) आस्वाद, दादर
२३ ) आनंदाश्रम, दादर
२४) मामा काणे
२५) आदर्श, दादर
२६) समर्थ दादर(पूर्व)
२७) पणशीकर (गिरगाव)
२८) विनय (गिरगाव)
२९) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड
३०) शामसुंदर- सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) नाशिक
३१) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक
३२) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मणमिसळ) नाशिक
३३) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मणमिसळ) नाशिक
३४) गारवा - अंबड (लाल मिसळ) नाशिक
३५) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त) नाशिक
३६) गुरुदत्त- शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) नाशिक
३७) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) नाशिक
३८) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे
३९) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार्/रविवार पेठ , पुणे
४०) खासबागचीमिसळ कोल्हापुर
४१) चोरगे मिसळ कोल्हापुर
४२). बावड्याची मिसळ कोल्हापुर
४३) मोहन ची मिसळ कोल्हापुर
४४) टेंबे उपहारगृह- ठाकुरद्वार,
४५) छत्रे उपहारगृह- मुगभाट लेन च्या दारात.
४६) प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर
४७) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू)
४८) लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावरनेताजी लंच होम
४९) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल
५०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ"
५१) पेण ला चावडी नाक्यावरतांडेल ची मिसळ
५२) हॉटेल ज्योती, सोलापुर - पुणे महामार्गावरील भिगवण गाव
५३) बावड्यातली मिसळ कोल्हापुर
५४) बादशाहि मिसळ, पुणे
५५) अलका टॉकीजसमोर कोल्हापूर मिसळ खाल्ली
५६) नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ
५७) शनिवार पेठेतील "रामदास'
५८) वायंगणकर(मारुती मंदिर) रत्नागिरी
५९) दत्त मिसळ (टॉकीजवरची / गांध्याची मिसळ) रत्नागिरी
६०) माऊली हॉटेल ( KBS होस्टेल समोर) रत्नागिरी

Sunday, 11 March 2012

स्वभावधर्म

प्रत्येकाचा स्वभावधर्म वेगवेगळा असतो. जसा विंचवाचा नांगी मारण्याचा स्वभावधर्म आहे, तसा आपला धर्म, दया दाखविण्याचा, दुसऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा आहे. त्यामुळे इतरांच्या वाईट वागण्याचा आपल्यावर प्रभाव पाडू देऊ नये. त्यांच्या अंत:करणातील अंधारामुळे आपल्या हृदयातील प्रकाश विझू देऊ नये, प्रकाशाची ज्योत तेवतच ठेवलीच पाहिजे... 

एक दिवस एक साधू नदीवर स्नानास गेला होता. स्नान घेत असताना त्यास एक विंचू पाण्यात पडून गटांगळ्या खाताना दिसला. त्या विंचवास पोहता येत नव्हतं. जीव वाचविण्यासाठी तो करीत असलेली केविलवाणी धडपड पाहून साधूचं मन दवलं. त्याच्या मनात विचार आला, जर आपण विंचवास वाचविले नाही, तर तो नक्कीच बुडणार. त्यामुळे साधूनं त्या विंचवास अत्यंत काळजीपूर्वक उचलून पाण्याबाहेर काढलं आणि नदीच्या काठावर नेऊन खाली जमिनीवर सोडणार तोच त्या विंचवानं साधूच्या बोटाला नांगी मारली. साधूला असह्य वेदना झाल्या, त्यानं एकदम हात झटकला, विंचू जमिनीवर पडला. साधूनं सुटकेचा नि:श्वास सोडला आणि पाण्यात शिरून स्नान घेऊ लागला, थोड्या वेळानं त्याचं लक्ष पुन्हा विंचूच्या दिशेनं गेलं, त्याला दिसलं की, विंचू जमिनीवरून परत एकदा नदीच्या दिशेनं जाऊन पाण्यात पडून धडपडू लागला आहे. साधूला पुन्हा त्याची कीव आली. त्यानं त्यास पुन्हा उचलून पाण्याबाहेर काढलं, आणि पुन्हा तेच, विंचवानं साधूच्या हाताला नांगी मारली... असं हे नाट्य काही मिनिटं चालू होतं.

पाण्यावर येणारी शिकार टिपण्यासाठी तेथून जवळच झाडावर दबा धरून बसलेला शिकारी हे सर्व नाट्य पाहत होता. साधू त्या विंचवाला वाचविण्याचा प्रयत्न करतोय आणि विंचू त्या साधूला नांगी मारतोय, साधू वेदनेनं विव्हळतोय, तरीही साधू पुन्हा पुन्हा त्या विंचवाला वाचविण्याचा प्रयत्न करतोय... शिकाऱ्यास हे सर्व पाहून राहवलं नाही. त्यानं साधूला सांगितलं, 'महाराज स्पष्ट बोलतोय म्हणून क्षमा असावी, परंतु, तुम्ही त्या विंचवाला वाचविण्याचा प्रयत्न करता आणि तो विंचू तुमचे उपकार विसरून तुम्हाला एक सारखा नांगी मारतोय, तुम्हाला वेदना होतात. तुम्ही त्या विंचवाला वाचविण्याचं सोडून का देत नाहीत, त्याला बुडायाचं असेल तर बुडू द्या, मरू द्या नं!'

शिकाऱ्याचा हा शहाणपणाचा सल्ला ऐकून साधूला हसू आलं, त्यानं शिकाऱ्यास सांगितलं, 'माझ्या मुला, तुझ्या बोलण्याचा मला राग आला नाही. पण हे बघ, विंचू मला नांगी मारतोय हे खरं आहे, परंतु, तो द्वेषानं किंवा दुष्ट हेतूनं मला नांगी मारत नाही. जसा पाण्याचा स्वभाव मला भिजविण्याचा आहे, तसा विंचवाचा स्वभाव नांगी मारण्याचा आहे. मी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, हे ते त्याला समजत नाही. ते त्याच्या बुद्धीला उमगण्याच्या पलीकडचं आहे. परंतु जसा विंचवाचा नांगी मारण्याचा स्वभावधर्म आहे, तसा माझा स्वभावधर्म त्याला वाचविण्याचा आहे. जर तो त्याचा स्वभावधर्म बदलू शकत नसेल तर मी तरी माझा का बदलावा? माझा धर्म, प्रत्येक प्राण्याला, मग तो मनुष्य असो की जंगली प्राणी, वाचविण्याचा आहे, या छोट्या विंचवाच्या वागण्यामुळे तो का बदलू?'

आपण जगात वावरताना आपणास अनेकांच्या विचित्र वागण्याला तोंड द्यावं लागतं. काही आपल्याला मानसिक इजा करत असतात, काही शारीरिक. काही आपला अपमान करीत असतात, आपण साध्य केलेलं यश काहीजण जाणीवपूर्वक हिरावून घेतात. काहीवेळा आपले सहकारी आपल्या कल्पना चोरतात किंवा आपल्याविरुद्ध बॉसकडे कागाळ्या करतात. काही वेळा आपलेच मित्र, नातेवाईक सहकारी अचानक विश्वासघात करतात. कधी कधी आपल्या पाठीमागे आपल्या विरोधात बोलत राहतात.

हळुहळू आपणास असं दिसतं की, आपण स्वत:च रागानं किंवा वेदनेनं एखादी कृती करीत असतो, आपले शब्द वा विचार व्यक्त करीत असतो. कधकधी आपण सूडबुद्धीनं वागण्याचा विचार करतो. आपल्यावर नकळत नकारात्मक विचारांचा प्रभाव पडतो आणि आपण स्वत:चं नुकसान करून घेतो. मनात आणि हृदयात वाईट विचार आणून स्वत:ला इजा करून घेतो. कधी काहीजण कटकारस्थान करून आपल्या यशावर पाणी फेरतात.

आपला धर्म, दया दाखविण्याचा, प्रामाणिकपणे वागण्याचा, दुसऱ्याला मदत करण्याचा, इतरांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा, इतरांची काळजी घेण्याचा आहे. इतर काही अज्ञानापोटी, असमंजसपणे, द्वेषानं, स्वाथीर्पणानं, वैरभावानं वागतात. परंतु, त्यांच्या वाईट वागण्याचा, अज्ञानाचा, त्यांच्या सवयीचा, लोभी वृत्तीचा आपल्यावर प्रभाव पाडू देऊ नये. त्यांच्या अंत:करणातील अंधारामुळे आपल्या हृदयातील प्रकाश विझू देऊ नये, प्रकाशाची ज्योत तेवतच ठेवलीच पाहिजे.


आंतरजालावरून साभार  

इरसाल प्रश्न हटके उत्तरे

 
अनेकदा लोकं असे प्रश्न विचारतात जे अतिशय मुर्खपणाचे असतात...
अशा प्रश्नांना दिलेली ही हटके उत्तर आहेत. पहा काही मस्त नमुने दिले आहेत::

1)हॉटेल मध्ये अनेक जण वेटर ला 'इथे जेवण कसं मिळतं' हे विचारतात....
आता तो काय वाईट मिळत म्हणून सांगणार ? तरी असलाच एखादा
इरसाल वेटर तर....गिर्हाईक: इथे पनीर मसाला चांगला मिळतो का हो ?
वेटर: छे !! बांधकामावरच सिमेंट आणुन कालवतो ते आम्ही त्यात...
कसला चांगला लागतोय

2)प्रश्न- अरे वा! घरीच आहात वाटतं? उत्तर- नाही माझ्या पश्चात ही इमारत
"राष्ट्रिय वास्तु" घोषित झाली तर कसे वाटेल हे बघायला आलोय

3)सकाळी.प्रश्न - पेपर वाचताय वाटतं!
उत्तर- नाही! ओल्या शाईचा (इंक) वास घेतल्या शिवाय मला ताजेतवाने वाटत नाही.

4)सिनेमागृहा बाहेर प्रश्न: काय पिक्चर बघायला आलात वाटतं?
उत्तर: छे! फावल्या वेळात तिकिटे "ब्लैक" करून अर्थार्जन करावं म्हणतोय! पण!
इथेही तुम्ही आमच्या "आधी" हजर!!

5)सकाळी फिरायला निघाला आहात प्रश्न: काय "मोर्निंग वाक्" वाटतं??!!!
उत्तर: काही तरी काय! नगरपालिकेचं कंत्राट घेतलय मैलाचे दगड कुणी पहाटे
चोरून तर नेत नाही ना याची खात्री करतोय!!

6)प्रश्न- प्रवासाला निघालात वाटतं? (हातात लगेज बघून !!!!)
उत्तर- नाही हल्ली व्यायाम करायला सवड मिळत नाही ना!
शिवाय जिम चे पैसे ही वाचतात !!

शिवरायांबाबत जगातील मान्यवरांचे उदगार



मि. अनाल्ड टायबर्न (जगविख्यात इतिहासकार) - "छत्रपती शिवाजी महाराज्यांसारखे राजे जर आमच्या देशात होऊन गेले असते तर, त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन नाचलो असतो."

इब्राहीम-लि-फ्रेडर (डच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाप्रसंगी सोन्याच्या सिंहासनावर बसताच सर्व मराठ्यांनी अत्यंत प्रेमाने "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी गर्जना क...ेली."

मार्शल बुल्गानिन (मा. पंतप्रधान - रशिया) - "साम्राज्यशाही विरुद्ध बंद उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजीमहाराज्यांनी रोवली."

प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे."

ब्यारन कादा (जपान) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानवजातीचे हित केले."

अन्तिनिओ (पोर्तुगीज व्हायसराय) - "छत्रपती शिवरायांच्या नौदलातमुळे सागरी किल्ल्यात वाढ झाली. राज्यांच्या नाविक दलाची शत्रूला भीती वाटते."

मि. मार्टिन मांडमोगरी (फ्रेंच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी राजे त्यांच्या गुप्तहेरांना भरपूर पगार आणि बक्षिसे देत असत. त्यांची तलवार यशासाठी आदीव तत्पर असे."

डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार) - "स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत." (ग्रान्ड रिबेल)

॥जय जिजाऊ॥जय शिवराय॥जय शंभुराजे॥


आंतरजालावरून साभार 

एकदा वाचून पहाच...



एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती. थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला. कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग एरिया’त जाऊन पुस्तक वाचत बसली.

तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते. शेजारी बिस्किटाचा पुडा होता. तिने एक बिस्कीट खाताच त्यांनीही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन खाल्ले. त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून ति...चा पारा चढला. “काय निर्लज्ज मनुष्य आहे हा! माझ्या अंगी थोडी हिंमत असती, तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!’ ती मनात विचार करत होती.

दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते. आता शेवटचे बिस्कीट उरले.

“आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल, का मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’ ती विचार करत होती. “”आता हे अतिच झालं,” असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसली.

थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक ठेवायला तिने पर्स उघडली. पाहते तर काय, तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता.

आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली, याची तिला खूप लाज वाटली. एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली होती. तिने नजर टाकली, तर शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले होते.
(The Cookie Thief - by Valerie Cox)

निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे; पण आपल्याला त्याची जाणीवच नसते. दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का? कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात...

भक्ती...


भक्ती म्हणजे नेमकं काय...

दिवसातून दोन वेळा पूजा, आठवड्यातून एकदा मंदिरात जाऊन देवाचे दर्शन आणि अमुक एक वारी उपवास ...बाकी वेळ दुसऱ्यांचा उपहास, लोकांच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल अपशब्द, अहंकार, गर्व आणि अट्टाहास...

ही भक्ती नाही... ही आहे सक्ती...

सगळे करतात म्हणून आपणपण करायची सक्ती...

भक्तीत शक्ती असावी.. सक्ती नाही...

कुंभाराला मग्न होऊन मडक्याला आकार देतांना पहावं... जोपर्यंत मडक्याला हवा तसा आकार मिळत नाही तोपर्यंत कुंभाराचे हाथ त्याला आकार देत असतात... ती खरी भक्ती...

आईला आपल्या लेकराला गोंजारतांना पहावं .. ती खरी भक्ती...

एखाद्या साधूला बेधुंद होऊन अभंग गातांना पहावं.. ती खरी भक्ती...

चिमणीला आपल्या पिल्लांना भरवतांना पहावं.. ती खरी भक्ती...

'मनापासून' केलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे भक्ती..

अहो ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली त्याला जाऊन तुम्ही 'हे काम झालं तर १ नारळ फोडीन' म्हणून लालूच दाखवता... सृष्टीच्या निर्मात्यालाच तुम्ही चक्क चार भिंतीच्या आत कोंडून ठेवता.. वाह रे माणसा ...

भक्तीच्या सीमा त्या पलीकडल्या आहेत... किंबहुना भक्तीला सीमाच नाहीत...

भक्तीच्या सीमा ठरवायला जातो ना तिथेच आपण फसतो !!!

आंतरजालावरून साभार!!!

कारण तो मोठा झालाय ना......


..

त्याला जन्म देताना तिला वेदना असह्य झाल्या होत्या ....
वेदनेन कळवळून तीन किंकालीच फोडली ....
पण क्षणात तान्हुल्याचा चेहरा पाहून आनंदान देहभानच हरपून गेली ...

त्याच्या मुखातून जेव्हा पहिल्यांदा आई शब्द आला तेव्हा ती कौतुकान ऐकतच राहिली ....
जीभ अडखळत त्याच बोबड बोलन ती सार्यांना ऐकवायची ...

त्यान पहिल्यांदा पाऊल उचललं तो क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा ...
ती पाहतच राहिली ...

तो चिमुकला शाळेतून घरी परतण्याची वेळ झाली कि तिची नजर दरवाजाकडे जायची ...
अन तो आला कि माझ लेकरू आल म्हणून कवटाळायची ......

तीन पतीला सांगितला हवे तर माझे दागिने मोडा...एकवेळ जेवू ...
पण माझ लेकरू चांगल शिकलं पाहिजे ....
आपल्याला कष्ट पडले तरी चालतील ....
आपली फरपट झाली तरी चालेल
पण त्याच्या नशिबात कष्ट नकोत ..त्याची फरपट नको ...


जन्मल्यापासून तीन त्याची काळजी घेतली ..खूप सोसल ....
लहानाचा मोठा केला ...काळजाचा तुकडा म्हणून खूप जपल ...
आता तो मोठा झालाय....
कमाऊ लागलाय...स्वताचे निर्णय स्वत घेवू लागलाय ....
आज त्यान आईला वृद्धाश्रमात ठेवण्याचा एक निर्णय घेतलाय अन आईला ऐकवलाय...
त्याचा निर्णय ऐकून आज तिला पुन्हा असह्य वेदना झाल्या
पण किंकाळी नाही फोडता आली ..
.कारण तो मोठा झालाय ना....

आता त्याने तिला शाळेत टाकलंय...वृद्धांच्या शाळेत ...वृद्धाश्रमात ...
आताहि ती वाट पाहते त्याच्या येण्याची ...पण खिडकीच्या पलीकड्च काही काही दिसत नाही ...

आता तिच्याही तोंडून आई शब्द बाहेर पडतो ..पण पाठीत चमक उठल्यानंतर ...
ऐकायला कोणीच नसत ......कारण तो मोठा झालाय ...

ती पण पाऊल उचलते पुढे टाकण्यासाठी ...
गुढघ्याना भार सहन होत नाही ..कोलमडते ...पण काठीच्या आधारान पुन्हा उभी राहते ..
सावरते स्वताला ...
समजावते ....
येईल माझ लेकरू नक्कीच मला नेण्यासाठी ...
नाही आला तरी चालेल कारण तो आता मोठा झालाय ...त्याचा संसार मोठा झालाय ...

आंतरजालावरून साभार 

Wednesday, 18 January 2012

वा रे वा मराठी हुशारी...!!!



एकदा बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट साठी नवा चेअरमन शोधायचा असतो..!!!

तो तशी पेपरात एड देतो...!!!
५००० जन इंटरव्यूसाठी येतात...!!

त्यातला एक असतो आपला “प्रमोद ”

बिल गेट्स :धन्यवाद आल्याबद्दल
(आता बिल गेट्स हे सर्व इंग्लिश मध्ये बोलतो पण मी ट्रान्सलेट करून लिहीत आहे समजदार समजून जातील)

ज्यांना कोणाला “जावा” लेन्ग्वेज येत नाही त्यांनी रूम सोडावी...!!!

लगेच २००० लोक कमी होतात...!!

प्रमोद (मनातल्या मनात):मला “जावा” तर येत नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!

बिल गेट्स:ज्यांना कोणाला १०० लोक एकाचं वेळेस मेनेज करायचा अनुभव नसेल त्यांनी रूम सोडावी...!!!

लगेचच २००० लोक बाहेर जातात..!!

प्रमोद (मनातल्या मनात):मी कधीच कोणाला मेनेज केले नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!
आणि तो थांबतो...!!!

बिल गेट्स: ज्या कोणाजवळ एम.बी.ए. डिग्री नाही त्यांनी बाहेर जावे...!!!

लगेचच ५०० लोक बाहेर जातात...!!!


प्रमोद (मनातल्या मनात):मी शाळा १५ वर्षांचा असतांनाच सोडली पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!

आणि शेवटी
बिल गेट्स:ज्यांना कोणाला सेब्रो कोट ही भाषा बोलता येत नाही त्यांनी बाहेर जावे...!!!


मग काय ४९८ लोक निघून जातात...!!!

प्रमोद (मनातल्या मनात):मला सेब्रो कोट भाषेतील एकाही शब्द येत नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!
आणि तो थांबतो...!!!

आणि शेवटी प्रमोद आणि फक्त एक जन तेथे शिल्लक राहतो...!!!

बिल गेट्स त्या दोघांजवळ येतो आणि बोलतो,तुम्हा दोघांना फक्त सेब्रो कोट ही भाषा येते तर बोला एकमेकांशी...!!!


शांतपणे प्रमोद वळतो आणि बाजुच्याला विचारतो...!!

प्रमोद :कुठून आला आहेस...???

तो दुसरा हळूच हसत बोलतो....
.
.
.
.
“महाराष्ट्रातून”


नेटवरून साभार

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

 
एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

कोळ्यांची मुम्बादेवी, हौसेने नटली,

बघता बघता इकडे, मुंबा नगरी वसली.

मराठमोळी माणसांची, मराठमोळी वस्ती.

कोणाची नाही फ़िकर, कोणाची नाही धास्ती.

मुंबईच्या नावाने, उजळला मराठी माथा.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईच्या सुखापासुन, लांब तिथे दूर.

बिहार आणि यूपी मध्ये, होता भ्रष्टासुर.

त्यांच्या लोकांचे होते, जेवणाचे हाल.

सर्वांनी साद घातली, "बंबई हमें पाल".

मराठीने त्यांना दिला आपला अर्धा वाटा.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईमध्ये हळुहळु, झाली भरभराट,

सर्वांना दिसे इथे, भाग्याची पहाट.

देशाच्या सर्व भागांतून, लोक इथे आले.

मुंबईने सर्वांना आपलंसं केले.

सारी तिची लेकरे, सर्वांची ती माता.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

टॅक्सीवाला सरदारजी, कलईवाला खान.

मुम्बईत पहायला मिळे, सगळा हिंदुस्तान.

मुंबईने सर्वांना, घेतलं आपल्या कुशीत,

घर दिलं, माया दिली, सगळे होते खुशीत.

मुंबईचे गुण गायी, सर्व येता जाता.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

आधी आधी वाटले, सारे मुंबईकर.

हळुहळु पाहुणा बसला छातीवर.

जिथे हवं थूंका, जसं हवं रहा,

मुंबई गेली खड्ड्यात, पैसा तेवढा पहा.

"यूपी बिहार के लियेही बंबई बना था."

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

बघता बघता मुंबईत, वाढु लागली गर्दी.

"गर्दीने तो बम्बई की, हालत पतली कर दी."

मुंबईत सगळीकडनं, माणसांचा लोंढा आला.

मुंबईतला मराठी, दिसेनासा झाला.

"तुम्ही कोण? मराठी? अंबरनाथला राहता?"

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईतुन मराठी, झाली कुठे गुल?

मराठींनाच दाखवी बोर्ड "हाउस फ़ुल".

जे जे आले मुंबईला कामधन्द्यासाठी.

सीमापार केली त्यांनी माय मराठी.

मराठी मातीमध्ये, बाकीच्यांच्या बाता.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

म्हणायला मुंबई होती आर्थिक राजधानी.

पण तिची झोळी, सदैव रिकामी.

साद घाले दिल्लीला, बनवुन द्या हो रस्ते.

दिल्ली म्हणे नाक उडवुन, "माफ़ करो, नमस्ते.

सारा धन हमारा, पहलेही कहा था!"

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

मुंबईच्या जमीनीवर, गर्दी गेली वाढत.

बघवेना फुगलेल्या मुंबईची हालत.

जागोजागी फ़ेरीवाले, पावलोपावली घाण.

एकेकाळी होती जिथे सोन्याची खाण.

ज्यांना दिली माया, त्यांच्याच खाई लाथा.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

अमराठी वोटेबँकने रोवले इथे पाय.

तेव्हा त्यांच्या नेत्यांना, सुचला एक उपाय.

"चला आता मुंबईतुन आपले खिसे भरु.

मुंबईचे सुद्धा आता, यूपी बिहार करु.

मुम्बाईच्या जमीनीला नासवुया आता."

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

दिवसेंदिवस वाढत गेली, बाहेरच्यांची नशा.

बघता बघता मुंबईची, झाली दुर्दशा.

"अश्रू कोणी बघु नये, डोळे तिचे झाका.

दु:ख तिने सांगु नये, तोंड शिवून टाका."

चालु राहिला अखंडीत, लुटण्याचा सपाटा.

एक होती मुंबई. तिची ऐका गाथा.

मुंबईने जेव्हा आपली, व्यथा सांगितली,

मिडियाने देशामध्ये, जी आग ओतली.

आपल्या जागी मराठीच, झाला बंडखोर.

शिवरायांच्या जमिनीवर, मराठीच चोर?

मुंबईची कैफ़ियत, आता पुढे वाचा.

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.

आजही मराठी भाकर अर्धी अर्धी खाईल.

तुमच्या बरोबर मुंबईच्या, पदराखाली राहील.

पण आदर तिचा केला नाहीत, तर याद राखा!

सपाटुन पडेल, मराठी तडाखा.

घाईघाईत पकडायच्या, घराकडच्या वाटा.

एक होती मुंबई, तीची ऐका गाथा.

काय म्हणता नितिशजी, पासवान आणि लालु?

मराठींच्या व्यथेवर, राजकारण चालु?

बिहारमध्ये लावली तशी आग नका लाऊ.

संतांच्या महाराष्ट्राचा, अंत नका पाहु.

तुका म्हणे "नाठाळाच्या काठी हाणु माथा."

एक होती मुंबई, तिची ऐका गाथा.


-------नेटवरून साभार

Friday, 6 January 2012

जागो रे!

डोळ्यात अंजन घालणाऱ्या 'टाटा टी'च्या या जाहिराती गदागदा हलवून जागं करतात. पण आपणच झोपलेल्याचं सोंग घेतलंय बहुतेक.

'हर सुबह सिर्फ उठो मत, जागो रे!' निवडणुका आल्या की 'टाटा टी'च्या अॅड्स टीव्हीवर दिसू लागतात. डोळे उघडायला लावणारी ही कॅचलाइन. आधी मतं मागणाऱ्या पुढाऱ्याचा इंटरव्यू घेणारा तरुण यात दिसला. नंतर मतदानाच्या दिवशी सिनेमा बघणाऱ्यांना जागं करणारी अॅड आली.

आता विधानसभा निवडणुकीच्या आधी नवी जाहिरात आलीय. 'खिलाना बंद, पिलाना शुरू'. यात वेगवेगळ्या प्रकारे पैसे खाणारे दिसतात. पुढे 'लेकिन आपको पता हैं, ये लोग इतना खाते क्यों हैं?', हा प्रश्न विचारला जातो. उत्तर डोळ्यांत अंजन घालणारं, 'क्योंकि हम खिलाते है'. हे ऐकताना अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो, हे गांधीजींचं वाक्य आठवतं. गांधीजींनी प्रत्येक गोष्टीला मूळापर्यंत खणून समजून घेतलं होतं. त्यामुळे ते एकदम वेगळ्या चौकटीतून जगाकडे बघू शकले. जागे होऊन.

पण आपण झोपलोय. खरं तर झोपेचं सोंग घेऊन पडलोय. भ्रष्टाचार आपण स्वीकारलाय. त्याच्याशिवाय आपली कामं होणारच नाहीत, असं आपल्याला ठामपणे वाटतं. एकदम क्रूसेडर बनावंच, असं नाही. पण शेकडो नव्वद कामं भ्रष्टाचाराशिवाय होऊ शकतात. अनेकदा आपणच उशीर करतो. फॉलोअपला वेळ नसतो. सिस्टम, नियम समजून घेतलेले नसतात. त्यातून आपण भ्रष्टाचाराचा शॉर्ट कट शोधतो. बथ्थड नोकरशाह पैशाच्या वजनाशिवाय हलायला तयार नसतात, हे शंभर टक्के खरं. पण अनेकदा आपणही दोषी असतो. ठरवलं तर आपण त्याला आळा घालू शकतो. त्यांना पैसे खायच्या सवयी आपणच लावतो, आपणच त्या सोडवूही शकतो. खरं तर पैशानंही जी कामं होत नाहीत. ती प्रसन्न वागणं, प्रेमळ शब्द आणि समोरच्यातल्या माणूसपणावर विश्वास असेल, तर होऊ शकतात.

मुळात फक्त पैशांची देवाणघेवाण म्हणजेच भ्रष्टाचार नाही. भ्रष्टाचार चहाच्या पेल्यापासून सुरू होतो आणि बाईच्या शरीरापर्यंत पोहोचतो, असं म्हणतात. त्याच्याही अलीकडे पलीकडे खूप भ्रष्टाचार आहे. आपण पूर्ण पगार घेतो, पण आठ तास नेमलेलं काम करत नाही. हा भ्रष्टाचार नाही का? सार्वजनिक गणपती बघायला वशिला लावून घुसतो, हा भ्रष्टाचार नाही का? मूळ पुस्तकातून अभ्यास न करता गाइड वाचून पास होतो, हा पण भ्रष्टाचारच नाही का? अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी. चिमूटभर खाल्लं, तरी त्याला शेण खाणंच म्हणतात. पण या सगळ्यातून आपला फायदा होत असतो. वेळ वाचतो, पैसे वाचतो. त्यातच आपण खूश असतो. मात्र यातून आपण नकळत आतल्या प्रामाणिकपणाच्या आगीवर राख टाकत असतो. हळूहळू ती आग विझत जाते आणि आपण कोणत्याही भ्रष्टाचाराच्या विरोधात नडायचा अधिकारच गमावून बसतो. आपल्या नकळत. अशा वेळेस आपण फार तर उठू शकतो. जागू शकत नाही.

सिर्फ उठो मत जागो, ही लाइन 'उत्तिष्ठित जाग्रत प्राप्यवरान्निबोधत' या वेदवचनावरून सूचलीय, हे उघड आहे. उठा, जागे व्हा, ध्येय मिळेपर्यंत थांबू नका, असं हे वचन सांगतं. खरा बोध मिळवण्यासाठी जागं होणं गरजेचं आहे. जागं होणं दूरच, आपण उठायला तरी तयार आहोत का? की असंच सोंग घेऊन झोपून राहणार? आता तरी उठूया ना!

- सचिन परब

एक उंदीर

एक चित्ता सिगरेट पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो ........
"मित्रा चित्त्या , माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,...
चित्ता थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो........
... ...पुढे हत्ती दृग्स घेत बसलेला असतो, त्याला सुद्धा पाहून उंदीर म्हणतो,
"मित्रा हत्ती, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,
हत्ती सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो........
थोडं पुढे गेल्यावर एक सिंह विस्की चा पेग भरत असतो............
त्यला हि पाहून न घाबरता उंदीर त्याला म्हणतो......
"मित्रा सिंहा, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,
सिंह त्याचा ग्लास बाजूला ठेवतो आणि उंदराच्या कानाखाली ७ ८ वेळा जाळ काढतो........
हे पाहून हत्ती सिंहाला म्हणतो "अरे सिंहा उंदीर चांगले सांगतो, का मारतोस त्याला"
सिंह म्हणतो "ह्याच्या सोबत ४ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय. हा हरामखोर जेव्हा भांग पितो तेव्हा असाच बोलतो..........

प्रेमात पडलं की

प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारख ंच वागतात...

... यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं...

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधी ल आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात...

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात....

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात...

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात

Sunday, 1 January 2012

जावे कॉमर्सच्या गावा


प्रगती फास्ट टीम

तुमचं स्पेशलायझेशन कॉमर्समध्ये असेल, तर तुम्हाला फायनान्स क्षेत्रात भरपूर संधी आहेत. अनुभवी लोकांसह अगदी फ्रेशर्सनाही करिअरचे खूप मार्ग मोकळे आहेत. या क्षेत्रातल्या वाढत्या संधींचा घेतलेला वेध...

सामान्य माणसाच्या दृष्टीने फायनान्स म्हणजे पैशाचं व्यवस्थापन आणि अकाउण्टिंग म्हणजे व्यवहारांची योग्य पद्धतीने ठेवलेली नोंद. परंतु, यात विविध प्रकारची काम आणि त्यासाठी विविध प्रकारची कौशल्यं आवश्यक असतात. पूवीर्च्या काळात सध्यासारखी व्यवहाराच्या प्रत्येक क्षेत्रात अकाउण्टन्सी किंवा फायनान्स क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज लागत नव्हती. मात्र, बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे अनेक संस्थांना अशा तज्ज्ञांची सेवा घेण्याची गरज भासू लागली. सध्याच्या काळात फायनान्स आणि अकाउण्टिंग या शाखा कंपनीच्या लाइफलाइन बनल्या आहेत. म्हणूनच कंपन्याही तज्ज्ञ आणि कुशल व्यक्तींचीच निवड करतात.

संधी कोणत्या?

बीकॉम किंवा बीबीएच्या पदवीनंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री करू शकता. यात एमकॉम, एमबीए फायनान्समध्ये पीजीडीएम, कॅपिटल माकेर्टमधील कोसेर्स, वेल्थ मॅनेजमेंट, इन्शुरन्स, रिस्क मॅनेजमेंट, सीए, आयसीडब्ल्यूए, सीएस, सीएफपी, सीएफए असे बहुविध पर्याय उपलब्ध आहेत.

चार्टर्ड अकाउण्टंट (सीए)

सीए हे खूप आव्हानात्मक आणि तुमच्या क्षमतांना वाव देणारे असे करिअर आहे. अकाउण्टन्सीचे नियमन करणारी प्रत्येक देशाची स्वतंत्र संस्था यासाठीचे नियम ठरवते. चार्टर्ड अकाउण्टन्सी हा अकाउण्टन्सीमधील प्रोफेशनल कोर्स भारतात १९४९ मध्ये सुरू झाला. हा कोर्स चार्टर्ड अकाउण्टंट अॅक्टनुसार चालविण्यात येतो. हा अभ्यासक्रम म्हणजे थिअरी आणि पॅक्टिकलचे मिश्रण आहे. अभ्यासक्रमाच्या तीन वर्षांत विद्यार्थ्यांना दोन्ही शिक्षण एकदमच (पॅरलल) घ्यावे लागते. तीन वर्षांच्या काळात विद्यार्थ्यांना प्रोफेशनल अकाउण्टंट बनण्यासाठी आवश्यक ते ज्ञान, कौशल्यं आत्मसात करता येतात आणि त्यांच्या क्षमतांचाही विकास होतो.

आयसीडब्ल्यूए

कोणतीही संस्था टिकून राहण्यासाठी अथवा सुरळितपणे चालण्यासाठी कॉस्ट मॅनेजमेण्ट महत्त्वाची असते. जागतिक स्तरावरील वाढत्या स्पधेर्मुळे कंपन्यांवर कमीत कमी दरात सेवा देण्यासाठी दबाव येत आहे. कॉस्ट अकाउण्टन्सीच्या कोर्सला बारावी किंवा पदवीनंतर (कॉमर्सला प्राधान्य) प्रवेश घेता येतो. इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अँड र्वक्स अकौंटंट्स ऑफ इंडिया (आयसीडब्ल्यूए) ही संस्था कॉस्ट अकाउण्टन्सीचे कोसेर्स चालवते.

सीएफए

सीएफए या अभ्यासक्रमात अकाउण्ट्सची मूलभूत तत्वे, व्यवसायांच्या विविध प्रकारांची माहिती, वित्तीय धोरणे आदी गोष्टींची इत्थंभूत माहिती दिली जाते. सीएफए अभ्यासक्रमासाठी पदवी (कॉमर्स विथ मॅथ्सला प्राधान्य) ही किमान पात्रता आहे.

एमबीए (फायनान्स)

एमबीए (फायनान्स) ही एक सर्वसमावेशक पदवी आहे. यात नेहमीच्या वित्तीय व्यवस्थापनासोबतच गुंतवणूक, शेअरमधील गुंतवणूक आणि ब्रोकरेज, अर्थशास्त्र, माकेर्ट अॅनलिसिस आणि व्यवस्थापनाशी संबंधित अन्य गोष्टी शिकविल्या जातात. यासाठी तुम्ही किमान पदवीधर असणे गरजेचं आहे.

एनएसई सटिर्फिकेशन

ज्यांना शेअर (स्टॉक) ट्रेडिंगची माहिती आहे, अशांसाठी एनएसई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) सटिर्फिकेशन हा चांगला पर्याय ठरतो. यामध्ये १०० तासांचं प्रशिक्षण आणि २० तासांचं प्रत्यक्ष ट्रेडिंगचं प्रशिक्षण याचा समावेश आहे.

सीएफपी

बँकांमध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून; तसेच वेल्थ मॅनेजमेण्ट कंपन्यांमध्ये, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्समध्ये किंवा अन्य वित्तीय संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती सटिर्फाइड फायनान्शियल प्लॅनिंग प्रोगॅम (सीएफपी) हा अभ्यासक्रम करू शकतात. भारतासारख्या देशात ५० हजारांहून अधिक सीएफपींची गरज असताना प्रत्यक्षात केवळ १३०० सीएफपीच उपलब्ध आहेत. सीएफपी या सटिर्फिकेटला जगातल्या २३ देशांमध्ये मान्यता आहे. फायनान्शिअल प्लॅनिंग स्टॅण्डर्ड्स ऑफ इंडिया (एफपीएसबी) तफेर् हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. हा अभ्यासक्रम १६५ ते १८० तासांचा असून, एफपीएसबीच्या एज्युकेशन पार्टनर्समार्फत शिकविला जातो. सीएफपी उमेदवाराला अन्य व्यक्तींपेक्षा ३० टक्के जास्त पगार मिळतो; तसेच काही कंपन्यांकडून नोकरीसाठी प्राधान्यही दिले जाते.

काय दिवस होते ते...!

कधी कधी मला माझ्या जुन्या आठवणी एक वेगळाच आनंद देऊन जातात.. नाही म्हटलं तर थोडा का होईना - एक फ्रेश मुड.... तुम्हाला आठवतयं:

१. तो दुरदर्शनचा गोल-गोल फिरत येणारा लोगो
२. दुरदर्शनचा तो पट्ट्या-पट्ट्याच स्र्कीनसेव्हर
३. मालगुडी डेज
४. देख भाई देख
५. रामायण
६. मिले सुर मेरा तुम्हारा
७. टर्निंग प्वाइंट
८. भारत एक खोज
९. आलिफ लैला
१०. ब्योमकेश बक्षी
११. तहकीकात
१२. ही मॅन
१३. सलमा सुलताना - ती दुरदर्शनवरची न्युज रीडर
१४. विको टरमरिक, नहीं कौस्मेटीक.... विको टरमरिक आयुर्वेदिक क्रीम
१५. ट्वँ.........ग!
वाशिंग पाउडर निरमा.. वाशिंग पाउडर निरमा.
दुध सी सफेदी, निरमा से आयी...
रंगीन कपडेभी खिल-खिल जायें!
१६. आय ऐम कौम्प्लॅन बौय [शाहिद कपुर] आणि आय ऐम कौम्प्लॅन गर्ल [आयेशा टाकिया]
१७. "सुरभि" वाले रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ
१८. आणि त्यानंतरचे - "मुंगेरीलाल जे हसिन सपने", करमचंद, विक्रम वेता़ळ आणि असे बरे........च!

८० आणि ९० सालचा काय काळ होता तो!
नो सिटबेल्टस् ... नो एअरबॅग्ज .... ट्रकच्या मागच्या 'फाळक्यात' बसणेही एक मेजवाणी असायची!
लहाण मुलांच्या त्या रंगबिरंगी "बाबा-गाड्या" ... "टॅपरप्रुफ बौटल टौप्स" चा आता-पता ही नाही!

सायकलच्या मागच्या चाकाला कार्डबोर्डचा तुकडा लाऊन त्याचा फटरररररार - मोटार सायकल सारखा - आवाज करत तासन् तास फिरायचे.. त्या सायकलच्या शर्यती... नो सेप्टी हेल्मेट्स, नो क्नी / एल्बो पॅड !

तहाण लागली की नळालाच तोंड लाऊन पाणी पिणे.. बौटल्ड वौटर - एक रहस्यच होते!

ते पोष्टाची तिकीटं... काडीपेटीचे कव्हर्स आणि बरंच काही जमा करण्याचा आणि जोपासण्याचे छंद!

सुट्टीच्या दिवशी, दिवसभर उनाडक्या - खेळ.. मात्र अंधार व्हायच्या आत घरी, ब-याचदा अगदी जेवणाच्याच वेळी!

खेळाच्या नादात अनेकदा पडलेले दात, खरचडले हात - पाय ... मात्र कुणीही तक्रार करायची नाही!

मित्रांसोबत चालत शाळेत जाणं... मोबाईलशीवायही आम्ही एकमेकांना नेहमीच शोधुन काढत असू! कसं? काही माहित नाही..!

खाण्यात अगदी केक, ब्रेड, चौकलेटस्, निंबुपाणी, साखरेचा तो आले-पाक... सगळं चालायचं... नो डायट - नथिंग!!

मित्रांना खेळायला बोलवाची ती ट्रीक - बेल न वाजवता अगदी चुपचाप मागच्या रस्त्याने जाणं...

बॅटच्या जागी ते लाकडी फळीचे क्रीकेट, त्या आट्या-पाट्या, सुरपारंब्या... डौक्टर - डौक्टर, लपाछपी ... असे किती तरी खेळ....

परीक्षेत नापास झालो तरी त्याच ग्रेडवर - वरच्या वर्गात ढकलला - अशी सोय..... नो नीड टु विजिट सायकॅट्रिस्ट, सायकोलोजिस्ट वा कौन्सेलर्स...

..... काय दिवस होते ते...!

स्वातंत्र्य, यश, अपयश , जबाबदा-या ... आणि या सर्वांसोबत एकमेकांबद्दल कमालीचा आदरही द्यायला अन् घ्यायलाही शिकलो..

................
.........................
................................

तुम्ही ही याच 'कालखंडातील' आहात का? .. हो..! तर मग मित्रांनाही याचा उल्लेख करा.... काय सांगावे कदाचित हे वाचुन तुम्हाला - तुमचा अन् मित्रांचा थोडा स्ट्रेस कमी होईल... नाहीच झाला तर वाढणार नाही हे मात्र नक्की... :)
 आंतरजालावरून साभार

आयुष्य जास्त सुंदर वाटत..


गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव
आयुष्य जास्त सुंदर बनत..

भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल पूर्ण कराव भूतकालातल रंगवून पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

कायमच मागण्या करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं
आयुष्य नक्कीच सुंदर वाटत..

चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....

-अनामिक