Sunday, 20 November 2011

मराठी माणूस आणि व्यवसाय


मराठी माणूस आणि व्यवसाय
खरे खोटे मला माहिती नाही पण पुढे सांगीतलेल्या कथेतील घटना अगदिच अशक्य आहे असे मात्र नाही.
एका सरकारी खात्याचे एक टेंडर निघालेले असते , नेहेमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या अंदाजाप्रमाणे त्याचे बजेट ठरवलेले असते, की या प्रोजेक्ट्चा खर्च रू.१५ लाख येइल .
अनेक जणांच्या कोटेशन मधून तीन जणांना साहेब चर्चेला बोलावतात .
पहीला येतो आमचा मराठी माणूस...............
साहेब-

आता बघा आमचा अंदाज होता १५ लाखाचा पण तुमचे कोटेशन आहे २० लाखाचे ,सांगा कसे काय करायचे?
सांगा किती कमी करताय?
मराठी माणूस—

हे बघा साहेब जे काय कोटेशन भरले आहे ते अगदी बरोबर आहे यात काही कमी होणार नाही ,आ्म्ही क्वालीटीत काहीही तड्जोड करत नाही, सर्व पार्ट अस्सल वापरतो आमच्याकडे डुप्लिकेट माल वापरत नाही, अहो आमचा ख्रर्चच मुळी १८ च्या घरात जातोय ,त्यामुळे यामधे काहीही कमी होणार नाही.

साहेब –

बर तुम्ही जरा बाहेर बसा मी इतर लोकांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो.

यानंतर येतो एक सरदारजी

साहेब-

बोला ! तुमचे काय …..तुमचे कोटेशन आलय २५ लाखाचे काय म्हणणे आहे तुमचे ?

२५ लाख म्हणजे फारच जास्त होतात नाही का ?

सरदार-

क्या साहबजी समझ लो महंगाइ कितना बढ गया है ,हर चीज का दाम बढ गया है, हमे पता है आपको टाँप क्वालिटी चाहिये ,तो हम भी टाँप क्वालिटी का माल देंगे,और आप्को भी मालूम है आपके ऑफ़ीस मे भी हर जगह देना पडता है

साहेब-

फिर भी हे जरा जास्तच होतात

सरदार-

क्या साहबजी समझ लो आपको भी इसमे दो रखा है

साहेब –

बर तुम्ही जरा बाहेर बसा मी इतर लोकांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो.

यानंतर येतो एक मारवाडी

साहेब-

बोला ! तुमचे काय …..तुमचे कोटेशन आलय ३० लाखाचे काय म्हणणे आहे तुमचे ?

३० लाख म्हणजे फारच जास्त होतात नाही का ?

मारवाडी-

सायेब ते सर्व जरा बाजूला ठेवा आणि आमचे ऐका कोणि काय कोटेशन भरलय आम्हाला सगळं म्हायतीय

आपण असे करा तुम्ही ऑर्डर आमच्या नावाने काढा आम्ही त्या मराठी माणसाकडून काम करून घेतो त्याचे त्याला पैसे देवून टाकतो ,तुम्ही पेमेंट्चे काम त्यवढे लवकर करा ,त्या मराठी माणसाकडून आम्ही १५ लाख देवून काम करून घेतो वरच्या १५ तले निम्मे तुमचे निम्मे आमचे.

पुढे काय झाले ते सांगायला नकोच नाही कां???
 आंतरजालावरून साभार

Friday, 18 November 2011

आपली माणसे

जवळच वृद्धाश्रम आहे पण कधीच तिकडे जाण्याचा विचार हि मनात आला नव्हता आला नव्हता..कविता अशीच जमणार नाही म्हणून मग मी विचार केला लिहायचे असेल तर खरेच त्यांची कथा व्यथा जाणून घेतली पाहिजे ;म्हणून मग मी आतमध्ये गेले.तिथे एक आजी बसलेल्या दिसल्या ,मी त्यांचाशी बोलण्याचा प्रयत्न केला... . आजी जेवण झाले का? नाही ग पोरी मला नाही जाणार आज जेवण ........ पण कसे काय आज या आजीबाई कडे केले येणे.... माज्या म्हातारी शी बोलायला वेळ नसतो कोणाला इकडे ... कधी तरी फोन ची रिंग वजते इकडे ... हेल्लो हेल्लो मनी ऑर्डर पोहचली का?.. म्हणून फोन बंद पडतो ...अन डोळ्यातील अश्रू गालावर पोहचून कंठ दाटतो .... . पुन्हा मी म्हणाले आजी थोडसे तरी खाऊन घ्या... नाही ग पोरी मला नाही आज जाणार जेवण .... माझ्या लेकाचा आज वाढदिवस आहे... मन माझे त्याला आशीर्वाद देण्यासाठी तडपते आहे .... मन त्याचे का माज्यापर्यंत येण्यासाठी अडवत आहे.. पूर्वीसारखे दिवस नाही राहिले आता.. म्हणून प्रेम माझे त्याचाव्रचे अजूनही संपले नाही.... पूर्वीसारखी मन तक्रार नाही करत आता.. म्हणून तो मला घेऊन जाईल विचार करणे अजूनही सोडले नाही ... . थोडा वेळ डोळ्यातले अश्रू पुसत स्तब्ध शून्यात बघत राहिल्या.. लहानपणी एक घास चिऊ चा एक घास कौऊ चा करत घास भरवायचा.. आयुष्यभर एक एक पैसा जपून वापरायचा.. हौस होतीना लेकाला डॉक्टर बनवायचा.. आता रोज एक च विचार करायचा.. एकदा तरी माझ्या पिल्लाला आमची आठवण येते का? एकदा तरी माज्या पिल्लाला आमची काळजी वाटे का? पण अपेक्षा नी आता कसली,इछाच नाही आता उरली.. आई बापांची किंमत नाही ज्याने केली..मजबुरी त्याने सांगितली.. आपली माणसे ज्याला अडगळ वाटली ...आपली माणसे त्याला परकी झाली. .... थोडेसे रागवत.. तुज्या बाबांना मात्र तुज्यावर राग आहे बरे का ,,' आपल्या आईला का कोणी असे वेगळे करते , रक्ताच्या नात्याला का कोणी क्षणात परके करते,, नाही आठवत का रे तुला आम्ही घेतलेले कष्ट..? बरे आहे न सगळे तिकडे? कसे काय फोन विचारायचं नुसते.. इथे सर्वे काही ठीक आहे ,मजेत आहे बाळा .. तू मात्र सुखी रहा ,आनंदात राहा नेहमीच आशीर्वाद असतील बाळा.. फक्त एकच गोष्ट आहे.. आपल्या माणसाच्या प्रेमापासून तू मुकला आहेस.. आपली माणसे कोण ते आता आम्हाला हि उमजले आहे..

आंतरजालावरून साभार

राग आणि स्पर्श (वाचनात आलेला लेख)


त्या दिवशी ‘तो’ आपल्या एका मित्राला घरी जेवायला घेऊन आला. तो असा अचानक एक पाहुणा आणणार आहे, हे त्याने तिला फोन करून सांगितलेही नव्हते. अगदी जेवणाच्या वेळी ‘तो’ आल्याने तिची खूप गडबड उडाली. पुन्हा भाताचा कुकर लावायला लागला. भाजी करावी लागली. मनातून ती खूप चिडली होती; पण त्या मित्राच्या समोर तिने राग दाखवला नाही. त्याला आग्रहाने जेवायला वाढले. वहिनींची चौकशी केली. मित्र निघून गेल्यानंतर मात्र ती ‘त्याच्या’ बेजबाबदारपणाबद्दल खूप बोलू लागली. ऐनवेळी उडालेल्या धांदलीचा सर्व राग तिच्या बोलण्यातून बाहेर पडत होता. सुरुवातीला ‘त्याने’ही काही कारणे देण्याचा प्रयत्न केला; पण नंतर तो शांत राहिला. तिचे बोलून झाल्यानंतर ‘त्याने तिच्या खांद्यावर हळुवार हात ठेवला आणि म्हणाला, ‘सॉरी, चुकलं माझं, चल तू जेवून घे. मी वाढू का तुला?’ त्याच्या या वाक्यानं आणि प्रेमळ स्पर्शानं तिचा सगळा राग कुठल्या कुठं निघून गेला. तिनं डोळे पुसले. ती मनापासून हसली आणि आपल्या जेवणाची तयारी करू लागली.
असं का घडतं?

बहुसंख्य स्त्रिया स्पर्शाची भाषा जाणतात. त्यामुळेच दोन मैत्रिणी एकमेकींना भेटल्या की, एकमेकींचा हात हातात घेतात. एखादे गोंडस बाळ दिसले की, त्याला उचलून त्याची पप्पी घेतात. तिची त्वचा त्याच्या त्वचेपेक्षा अधिक पातळ आणि संवेदनशील असते. त्याला स्पर्शाची भाषा वगैरे समजणे थोडे कठीणच, तिला मात्र स्पर्शाची भाषा समजते. त्यामुळेच त्याने तिच्या खांद्याला केलेला स्पर्श खरा आहे, त्याला खरच स्वतची चूक जाणवली आहे, हे तिला जाणवलं आणि तिचा राग पळाला. तिच्या, संवेदनशील नाजूक त्वचेला स्पर्शाची अपेक्षा असते. ‘त्याने’ कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेमाने स्पर्श करावा. हातात हात घ्यावा, पाठीवर थोपटावे असे तिला वाटत असते. त्यालाही स्पर्शाची भूक असते; पण ती ठराविक कारणासाठीच! असा उगाचच निर्हेतूक स्पर्श त्याच्या लक्षातच राहत नाही; पण तिच्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी तो लक्षात ठेवायला हवा.

त्याची दुसरी हुशारी म्हणजे तो पटकन ‘सॉरी’ म्हणाला. आपली चूक मान्य करतो तो आदर्श माणूस; पण चूक नसतानाही सॉरी म्हणतो तो आदर्श नवरा ! ‘ती’ काही वाद घालू लागली की कोणतेही आग्यरुमेंट न करता ‘सॉरी’ म्हटले की वाद संपूनच जातो, हे आता त्याच्या लक्षात आले आहे. बायकोला ‘सॉरी’ कसं म्हणायचं हा पुरुषी अहंकार बाजूला ठेवला, तर भांडणाच्या प्रसंगाचाही शेवट गोड होऊ शकतो.
- डॉ. यश वेलणकर

माझा महाराष्ट्र


या नावातच सारं काही आलं!
महाराष्ट्र !
या राष्ट्रात विवधता अगदी ठासून भरलेली आहे!
इतिहास, निसर्ग, कला, साहित्य, पाककला ह्या सगळ्यात इतकं वैविध्य क्वचितच जगात आढळेल!

ह्या राष्ट्राची माती पवित्र आहे! ह्याच मातीतून शिवाजी, संभाजी जन्माला आले! ह्याच मातीत स्वराज्याचे बीज परले गेले! इथेच ते फळाला आले! इथेच अनेक अनामी वीर स्वराज्यासाठी लढले आणी कैक धारातीर्थी पडले! इथली माती त्यामुळेच लाल असेल का?

जेव्हा मुजोर औरंग्या ३ लाख सैन्य घेउन टीचभर स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा संभाजी नावाच्या एका 'पोराने' पहिली नऊ वर्षे आणी नंतर इथल्याच संताजी-धनाजी ह्यानी मोगली बकासुरास इथेच गाडले! पुढल्या काही वर्षातच त्याच मोगलांच्या दिल्लिचं तख्त काबिज़ करून ह्या महाराष्ट्राचा भगवा अगदी अटकेपार फडकला! ही ताकत आहे इथल्या मंनगटातली!
जितका रंजक इथला इतिहास तितकाच इथला निसर्ग वैविध्यपूर्ण!

इथला कोंकण किनारा,इथला समुद्र, इथले सह्याद्री पर्वत, इथली घनदाट अरण्ये...
इथली वन्यजीवसृष्टी देखील विविधतेने नटलेली आहे! इथली फळ ही जगप्रसिद्ध आहेत! सर्व दुनियेला वेड लावणारा फळांचा राजा हापूस आंबा देखील महाराष्ट्राचाच!

हा राकट, कणखर महाराष्ट्र कलाकारांचा देश देखील आहे! ह्या मातीला कलादेवतेच वरदान आहे! सतार इथेच जन्माला आली! वारली कला, बिद्रि कला, सावंतवाडीची लाकडी खेळणी, कोल्हापुरी चपला हे सारे प्रसिद्ध तर आहेतच पण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग हा अगदी पूर्वापार चालत आलेला आहे! पैठणी, नारायणी पेठ ह्या साड्या म्हणजे इथली शान आहेत!

इथली झणझणीत लावणी, खडे पोवाडे, कोळी गीत, भारुड हे सर्वांना भुरळ घालतात! इथली रंगभूमी, इथली नाट्यगीत सारी जगावेगळी!

भारतातील पहिला चित्रपट देखील ह्याच भूमीत तयार झाला!
अशी आहे महाराष्ट्राची कला परंपरा!

मराठी साहित्य म्हणजे रत्न-हिरे ह्यानी खचून भरलेली खाण आहे.
पु.ल. देशपांडे,कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, रणजीत देसाई, शिवाजी सावंत, कवी ग्रेस, बालकवी ही ह्या खाणीमधली काही रत्ने!

विनोदी, ऐतिहासिक, विडंबनात्मक .... जी जी श्रेणी तुम्ही शोधाल त्या त्या श्रेणीत तुम्हाला मराठी पुस्तक सापडतील!


७०० पेक्षा अधिक वर्षांचा वारसा लाभलेली ही आमची मायबोली ह्या प्रचंड साहित्य परिवाराने आणखीच खुलते!

महाराष्ट्रीय जेवण म्हणजे तर स्वर्गाहून सुंदर!
इथली पुरणपोळी, थालीपीठ, चकली ,चिवडा, श्रीखंड सगळ्यांना तौक आहे पण इथल्या प्रत्येक शहराला आपली एक पाक संस्कृती लाभलेली आहे.

मुंबईचा वडा पाव,नागपूरच्या सावजी समुदायाचे तिखट जेवण,वडे-भात, कोल्हापुरचा तांबडा-पांढरा रस्सा,मिसळ, सातारी कन्दी पेढे, पुणेरी मिसळ, कोंकणी आणी मालवणी जेवण....अहाहा! पाणी सुटल तोंडाला! हे तर फक्त मोजके नमुने आहेत!

तर असा आहे आमचा महाराष्ट्र! कणखर आणि राकट तरी सर्वांस माया लावणारा आणि जपणारा.....!!!!
 
आंतरजालावरून साभार

Saturday, 5 November 2011

समजत नाही मी घडलो की बिघडलो !!

हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो..
समजत नाही मी घडलो की बिघडलो !!
तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो..
पैसा हीच सक्ती समजून इश्वरभक्ती विसरलो !!
सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो..
सुखासाठी साधने वापरताना साधना विसरलो !!
भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलो..
धन जमा करताना समाधान विसरलो !!
तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलो..
परिक्षार्थी शिक्षणात हाताचे कौशल्य विसरलो !!
टी.व्ही. आल्यापासून बोलणं विसरलो..
जाहिरातीच्या मार्‍यामुळे चागलं निवडणं विसरलो !!
गाडी आल्यापासून चालणं विसरलो..
मोबाईल आल्यापासून भेटीगाठी विसरलो !!
कॅलक्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो..
संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो !!
संकरीत खाल्यामुळे पदार्थांची चव विसरलो..
फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो !!
ए.सी. मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो..
परफ्युमचा वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलो !!
चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो..
जगाचा भूगोलात गावाचा इतिहास विसरलो !!
बटबटीत प्रदर्शनात सौंदर्यचे दर्शन विसरलो..
रिमिक्सच्या गोंगाटात सुगमसंगीत विसरलो !!
मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो..
स्वतःमध्ये मघ्न राहून दुसर्‍याच्या विचार विसरलो !!
सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो..
जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो !!
आंतरजालावरून साभार

शाळेतील ती मजा

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे,कोणे एके काळी मी देखील शाळेत जात होतो.
शाळेबाहेर लागलेल्या रांगेमध्ये ,मी देखील मिसळून जात होतो.

इतिहास आणि भूगोल ,शिक्षकांच्या नजरेने पाहत होतो.
मराठीच्या कवितेत अन धड्यांमध्ये, तासंतास रमून जात होतो .

पायथागोरस आणि न्यूटनला , मनापासून शिव्या घालत होतो.
"अनु" आणि "रेणू" ला मात्र तिरक्या नजरेने बघत होतो .

पुस्तक तोंडासमोर धरून, हळूच डुलकी घेत होतो,
कांटाळवाण्या तासाला, मित्रांसोबत फुल्लीगोळा खेळत होतो.

मधल्या सुट्टी मध्ये एकत्र जमून, सर्वजन डब्बा खात होतो,
डब्यामधली गोड पोळी मात्र, लपून छपून ठेवत होतो .

तो माझा निरागसपणा कोठे तरी हरवला आहे,
शाळे मधला तो समीर आता एम्प्लोइ बनला आहे,

शाळेसारखी मजा आता कशी काय येणार ,
आता मीटिंग शेड्यूल मध्ये सार जीवनच अडकून राहणार .

काल कॅन्टीन मध्ये बर्गर खाताना शाळेतील न्याहरी आठवली ,
शाळेच्या हूरहुरीने हि कविता सुचवली.

शाळेतील ती मजा, अजून ठसली आहे माझ्या मनी,
खरंच मित्रांनो ..... निघून जातात ते क्षण अन राहतात त्या फक्त आठवणी..
आंतरजालावरून साभार