कोणास ठाऊक कसे
पण काहो उदास वाटे
राजाही जरी प्रजेचा
मल्लीन दास वाटे
भास्कर डोईवरी जरी
निशाच काहो वाटे
फुलास झाकोळती
विपरीक्ष रुक्ष काटे
पिटाळून त्या काकण्या
माघारी येतील काहो चिमण्या
चिमुकल्या कौलारू घराच्या
गोल कवाडात त्या रमण्या
आज आस त्या उषेची
निशेस दूर सारी
बोथटून कर्कटासी
सुमनास माथा धरी
पळतील काक सारे
रमतील चिमचिमण्या
रामराज्य हि परतेल
आपुल्या अण्णासी वंदण्या
- एक अण्णा प्रेमी
No comments:
Post a Comment