Friday, 26 August 2011

अण्णा काय चुकीचे मागत आहेत ???

जरा बघूया अण्णा असे काय मागता आहेत ज्यासाठी सरकारला एवढा वेळ लागतो!


1) प्रत्येक राज्यात लोकायुक्त असावा,

2) राज्यामधील सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचारी लोकपालाच्या खाली येतील

3) लोकाची काम किती दिवसात झाली पाहिजे?? प्रत्येक कामाची एक वेळ नक्की व्हावी !! उदाहरण- रेशनकार्ड, लायसन्स, जन्म मृत्य प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र या साठी लोकांना किती वेळ लागेल ते नक्की व्हावे,जर लागणारे सर्व कागदपत्रे दिलेली असतील तर,मग ८/१५/३० दिवसात कामे झाली पाहिजेत !! आता यामध्ये अण्णा काय चुकीचे मागत आहेत ??? स्वतःसाठी अण्णा काही मागत आहेत का ??

"लोकपाल बिल"


"लोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे?

"लोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे?


१. केंद्रामध्ये "लोकपाल" नावाची संस्था काढली जाईल आणि प्रत्येक राज्यामध्ये या संस्थेचा "लोकायुक्त" निवडला जाईल.

२. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याप्रमाणेच लोकपाल आयोग हा सुद्धा शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. कोणताही सारकारी अधिकारी किंवा नेता या आयोगावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.

३. भ्रष्टाचाराचा कुठलाही खटला वर्षानुवर्षे चालणार नाही. चौकशी साठी जास्तीत जास्त १ वर्ष आणि खटल्यासाठी १ वर्ष दिला जाईल, जेणेकरून २ वर्षांत शिक्षेची अंमलबजावणी होईल.

४.आरोप सिद्ध झाल्यावर सर्व नुकसान त्या व्यक्तीकडून वसूल केले जाईल.

५. सामान्य जनतेला या बिलाचा फायदा काय? .........आपले कुठलेही सरकारी काम जर सुनिश्चित वेळेत झाले नाही तर लोकपाल विधेयाकानुसार जबाबदार सरकारी अधिकार्‍याकडून दंड वसूल केला जाईल आणि तो नुकसानभरपाई म्हणून आपल्याला दिला जाईल.

६.म्हणजेच, जर तुमचे रेशनकार्ड/ मतदानओळखपत्र/ पासपोर्ट यासाठी निश्चित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला असेल तर तुम्ही लोकपाल आयोगाकडे जाऊ शकता. लोकपाल तुमचे काम १ महिन्याच्या अवधीत पूर्ण करेल. शिवाय रेशनदुकानावर खराब धान्य, खराब रस्ते, पंचायत फंड घोटाळा अश्या तक्रारीही तुम्ही लोकपालकडे करू शकता. लोकपाल आयोग जास्तीत जास्त २ वर्षांत याविषयी पूर्ण निर्णय देईल.

७.पण या आयोगवर आयुक्त सरकार नेमेल का? नाही! आयुक्ताची निवड ही नागरिक आणि न्यायमूर्ती करतील. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय!

८.आणि लोकपालमधलाच एखादा अधिकारी भ्रष्ट निघाला तर? नाही! या आयोगाचे काम पूर्णपणे पारदर्शक असेल. त्या अधिकर्‍याची २ महिन्यात चौकशी करून दोषी आढळल्यास त्वरित हकालपट्टी केली जाईल.

९.मग सध्याच्या भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा बंद पडणार का? नाही... या सर्व यंत्रणा "लोकपाल" मध्ये समाविष्ट कार्यात येतील.

१०.ज्या व्यक्तीने भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला आहे त्याच्या जिविताची काळजी घेण्याची पूर्ण जबबदारी लोकपाल आयोगाची असेल.

११.आणि सगळ्यात महत्वाचे... लोकपाल आयोगाकडे कोणताही अधिकारी, नेता आणि न्यायाधीश यांची चौकशी करण्याचे अधिकार असतील.


आज आपल्या देशाला "लोकपाल" ची नक्कीच गरज आहे... अण्णा हजारे यांना पाठिंबा द्या

बाळासाहेब ठाकरे यांचे अण्णा हजारे यांना पत्र

बाळासाहेब ठाकरे यांचे अण्णा हजारे यांना पत्र

प्रिय अण्णा यांसी,


जय महाराष्ट्र !


एका विशेष नात्याने ही पत्रवजा विनंती आपणास करीत आहे. राजकारणात एकमेकांवर टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. समज आणि गैरसमजाच्या वावटळी उठत असतात. तुम्ही काय आणि आम्ही काय... त्यातून सुटलेलो नाही. काही असले तरी आपल्या सामाजिक व जलसंधारणविषयक कामाविषयी आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आले आहे.

सध्या आपण दिल्लीच्या रामलीला मैदानावर भ्रष्टाचाराच्या रावणाविरूद्ध जबरदस्त युद्ध पुकारले आहे. रामलीला मैदान म्हणजे भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे कुरूक्षेत्र बनले आहे. उपोषणाच्या मार्गाने छेडलेल्या युद्धास देशभरातील जनतेचा पाठिंबा मिळत आहे. जनजागृतीची एक लाटच उसळली असून, वातावरण अण्णामय झाले आहे.

आपल्या उपोषणाचा आठवा दिवस सुरू झाला आहे व आपली प्रकृती खालावल्याच्या बातमीने आम्हाला चिंता वाटू लागली आहे. एका महान कार्यासाठी आपण प्राण पणास लावण्याची घोषणा केली आहे, पण ही लढाई आपल्या प्राणावर बेतू नये व ज्यांच्या विरोधात आपण युद्धाला उतरलात त्या दुश्मनांचे त्यात फावू नये यासाठी आम्ही ही कळकळीची नम्र विनंती करत आहोत. आपल्या उपोषणाने देश जागा झालाच आहे व सरकारही हलले आहे. तेव्हा आता ढासळत्या प्रकृतीक़डे पाहून उपोषण सोडा ! उपोषण सोडले तरी आंदोलन सुरूच राहील. आपल्या उपोषण समाप्तीनंतर आपले सहकारी केजरीवाल, बेदी, सिसोदिया वगैरे मंडळींना उपोषणास बसू द्या व आंदोलन चालू राहू द्या.

देशात राजकीय स्वैराचार आणि भ्रष्टाचाराने टोक गाठले आहे व सामान्य जनता त्रस्त आहे. आपणांस आठवत असेलच, ४ ऑक्टोबर १९९६ रोजी आपण मला मातोश्री या निवासस्थानी भेटलात. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आपल्या दोघांत चर्चाही झाली. तेव्हाही सर्व थरांत व्यापून राहिलेला भ्रष्टाचार मोडून काढण्याचे वचन मी आपणास दिले होते आणि आपणही त्यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाला होतात की, शिवसेनाप्रमुख हाच आता आशेचा किरण आहे. केवळ तेच हा सर्वव्यापी भ्रष्टाचार मोडून काढण्याचे धाडस दाखवू शकतात. अन्य कोणातही हिंमत नाही. आम्ही समन्वयाने एकत्र काम करू. मग यश निश्तितच ! असा विश्वासही आपण तेव्हा व्यक्त केला होता, पण दुर्दैवाने त्याचदरम्यान आमच्यावर काही कौटुंबिक आपत्ती कोसळल्या व आपल्यातला संपर्क तुटला तरी आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत व तुमचाही लढा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हेसुद्धा एक महान योद्धेच होते. समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना दिलेला एक मंत्र असा की धुरेने युद्धासी जाणे, ही तो नव्हे राजकारणे. हा मंत्र सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. शेवटी पुन्हा एकदा आपणांस महाराष्ट्राच्या नात्याने विनंती करतो आहे की, उपोषण आपण थांबवावे, मात्र लढा सुरूच ठेवावा. आपल्या आंदोलनाचा व या लढ्याचा राजकीय फायदा-तोटा काय हे हिशेब आम्ही करत नाही व आमचा तो स्वभाव नाही. पुढील लढ्यासाठी आपले प्राण महत्त्वाचे. आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो, हीच प्रार्थना !

जय हिंद ! जय महाराष्ट्र ! वंदे मातरम !

आपला नम्र

(बाळ ठाकरे)

शिवसेनाप्रमुख

Sunday, 21 August 2011

Prem Kavita


मी तुझ्या सोबतच आहे ....

काल पर्यंत मी तुझ्या सोबतच होतो....


आत्ताही मी तुझ्या सोबतच आहे ....

आणि नंतरही मी तुझ्या सोबतच राहील ....



उन्ह्याळ्यात तुझी तहान बनून,

पावसाळ्यात ढगांतून पडणार्या पाण्यात मी असेन,

आणि हिवाळ्यात थंडी बनून मी तुझ्या सोबत असेन...
 
 
उजेडात तुझी सावली बनून,

तर अंधारातल्या काळोखात मी असेल,

आणि एकटेपणात तुझ्या मनातला विचार बनून मी तुझ्या सोबत असेन...



हसताना तुझ्या गालावरची खळी बनून....

रडताना तुझ्या प्रत्येक अश्रूत मीच असेन...

आणि रागावशील तेव्हा लाल रंग बनून तुझ्या डोळ्यांत मीच असेन ....


बोलताना तुझ्या आवाजात,

तर लिहिताना तुझ्या प्रत्येक शब्दात मी असेन,

आणि नेहमीच तुझा श्वास बनून ....मी तुझ्या सोबत असेन ....



तुझ्या तळ हातांच्या रेषांत,

tension मध्ये कपाळाच्या आटयात ....

आणि तू गुनगुनत असलेल्या त्या प्रत्येक गाण्यात .... मी तुझ्या सोबतच असेन ....

तुझ्या बंद डोळ्यांतल्या स्वप्नात ...

उघड्या डोळ्यातली आशा बनून ....

आणि मनातली इच्छा बनून मी तुझ्या सोबतच असेन ...


तुझ्या ट्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात ....

तू विसरलेल्या त्या प्रत्येक आठवणीत ....

आणि तुझ्या प्रत्येक प्रवासात तुझी ..."Destination" बनून मी तुझ्या सोबत असेन ....


काल पर्यंत मी तुझ्या सोबतच होतो....

आत्ताही मी तुझ्या सोबतच आहे ....

आणि नंतरही मी तुझ्या सोबतच राहील ....

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

प्रेम


एक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण त्यापेक्षाही सुंदर तिचे आपल्या नवर्यावर प्रेम करण्याची पद्धत होती .............. जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात असे तेव्हा तेव्हा ती रोज एक गुलाबाचे फुल आपल्या नवर्याला पाठवत असे, आणि जाणवून देत असे कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच आहे .................... ती दुसरीकडे असताना तिच्या रोज येणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवर्याला आता सुखद सवय झाली होती ........... पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे सुंदर प्रेम देवालाही आवडले असावे म्हणून कि काय पण देवाने तिला आपल्याकडे बोलावून घेतले, तिच्या विमानास अपघात झाला आणि बिचारी आपले प्राण गमावून बसली ..................... हि बातमी ऐकून तिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्यात तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके कोणी एवढे रडले नसेल .................. पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते तर आता सुरु झाले होते, तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते............... हे बघून तिचा नवरा आश्चर्य चकित झाला व ह्या मागाचे कारण शोधण्यासाठी त्याने रोज फुल घेऊन येणार्या मुलास विचारले


तिचा नवरा :- तुला हे फुल कोण देत नक्की, माझी बायको मरून १५ दिवस झाले तरी तू रोज फुल आणून देत आहेस, नक्की प्रकार काय आहे ?

मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप प्रेम करते, तिची विचारशक्ती खूप पुढची होती, म्हणून तिने आधीच विचार करून ठेवला होता कि, "जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण प्रेमाला कधी संपवायचे नाही" आणि ह्या विचाराने तिने मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले आहेत जेणे करून आयुष्यभर ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल .... आणि तिचे नसणे सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव करून देईल

लेखक - अज्ञात

Friday, 19 August 2011

एक अण्णा प्रेमी


कोणास ठाऊक कसे 
पण काहो उदास वाटे
राजाही जरी प्रजेचा
मल्लीन दास वाटे

भास्कर डोईवरी जरी
निशाच काहो  वाटे
फुलास झाकोळती
विपरीक्ष रुक्ष काटे

पिटाळून त्या काकण्या
माघारी येतील काहो चिमण्या
चिमुकल्या कौलारू घराच्या
गोल कवाडात  त्या रमण्या

आज आस त्या उषेची
निशेस दूर सारी
बोथटून कर्कटासी
सुमनास माथा धरी

पळतील काक सारे
रमतील चिमचिमण्या 
रामराज्य हि परतेल
आपुल्या अण्णासी वंदण्या

-  एक अण्णा प्रेमी